आज पुन्हा
आज पुन्हा
आज पुन्हा पावसान
रिमझिम बरसाव
तू अन् मी पावसात
चिंब चिंब भिजाव
स्मरणातील आठवणींना
आज नव्याने सजवाव
तुझ्या मोहक स्पर्शान
सर्वांग मोहराव
सैरभैर पावसान
आज बेभान होऊ नाचाव
अल्लड वाऱ्याने
गोर्या अंगाशी खेळाव
आज पुन्हा पावसान
रिमझिम बरसाव
ओल्याचिंब सरीत
चिंब चिंब भिजतांना
मी हळूच आज
नव्या नवरीसारख लाजाव
तुझ्या श्वासातील
सुगंधाने धुंद होऊन जाव
मोरपंखी आठवणींना मन पिसाऱ्यावर लिहाव
आज पुन्हा पावसान
रिमझिम बरसाव
निरोप घेता, पावसाला
चिंब पापण्यांनी पहाव
असतांना सख्यासवे
पुन्हा एकदा बरस म्हणाव
आज पुन्हा पावसान
रिमझिम बरसाव तू अन् मी पावसात चिंब चिंब होऊन
मनसोक्त भिजाव..