STORYMIRROR

Samiksha Bhusari

Inspirational

3  

Samiksha Bhusari

Inspirational

आज पाहिलं..

आज पाहिलं..

1 min
194

माती विकून माती पायाला लागणार नाही !

अशा बिल्डिंग बांधणाऱ्यांना! 

 मी कौलारू घराची स्तुती करतांना आज पाहिलं.. 

जंगलांना उध्वस्त करून शहरे वसवली ज्यांनी! 

त्यांना मी गावाकडे वळताना आज पाहिलं.. 

आनंदाने कु-हाडीचे घाव द्यायचे झाडाला! 

त्यांना मी श्वास गुदमरतो तेव्हा सावली शोधताना आज पाहिलं.. 

प्लास्टिक वातावरणात फेकणाऱ्यांना! 

मी प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकतांना आज पाहिलं.. 

मदतीसाठी हात ज्यांचे कधीच सरसावले नव्हते! 

त्यांना मी हात जोडतांना आज पाहिलं.. 

काहींना आवर घालता येत नव्हता अश्रुंवर ! 

त्यांना मी स्वतःच तोल स्वतःला सावरतांना आज पाहिलं.


Rate this content
Log in

More marathi poem from Samiksha Bhusari

Similar marathi poem from Inspirational