आई
आई
आई पेक्षा मोठा नाही
कुठं जगात खजाना,
जिने तुला जन्म दिला
दुःख नको तीच्या मना!
आधी तीने नवमास
पोटी वागवलं तुला,
दुध पाजवले बेटा
जेव्हा जेव्हा तू रडला!
रात दिवस मातेने
केला पाळणा हाताचा,
किती रात्री जागवल्या
तुझ्या झोपेसाठी तीच्या!
तुला काही झालं बाळा
तिच्या डोळा होत पाणी,
तुझ्या साठी प्रेमाने ती
गात होती गोड गाणी!
तिच्या चरणापुढे
नाही गरज स्वर्गाची,
तिर्थ नको फिरू अन्य
कर पूजा तू आईची!
