पराधीन
पराधीन
वाईट कोण काही
वागून काय गेले
सोडून देऊ सारे
बोलायचे नव्याने.
गेला तसाच काळ
सांगून हेच आम्हा
सारून ते दुरावे
भेटायचे नव्याने.
माहित ना उद्याचे
भविष्य आपलेरे
आयूष्य संगतीने
जोडायचे नव्याने.
संपून जाई सारा
वाईट काळ आता
मनातली घुस्मटे
खोलायचे नव्याने.
आपूले भोग आहे
भोगून संपवावे
हातात काय आता
सांगायचे नव्याने.
