STORYMIRROR

Ujwala Devi

Romance

3  

Ujwala Devi

Romance

विरहाचे चांदणे

विरहाचे चांदणे

1 min
339

तोच, चंद्र कालचा,

माझ्या मनाला पोळतो 

लखलखाट चांदण्यांचा,

आज मजला जाळतो !


अमृतमयी चांदणे हे

विष मजला वाटते,

विरहाच्या काहिलीने

प्राण कंठी दाटतो !


हात हाती घेऊनी तुझा

जे गीत होते गाईले,

गीत तर ओठी माझ्या

सूर नाही ‌राहीले. !


 चंद्र साक्षी तू न मी जे

स्वप्न होते पाहिले ,

स्वप्नपूर्ती राहीली रे

जीवन तुजला वाहीले !


चांदण्यांचे गीत गाण्या

इथे मैफील रंगली ,

सोडला तू हात माझा ,

कविता माझी भंगली !


पाहुनी चंद्रात तुजला,

माझी निर्जीव स्पंदने,

तूच माझा चंद्र जीवलगा,

तूच माझे चांदणे, 

तूच माझे चांदणे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance