STORYMIRROR

Vasudha Thakur

Inspirational Others

3  

Vasudha Thakur

Inspirational Others

"आई"

"आई"

1 min
118

आई म्हणजे माया

आई म्हणजे आपल्यावर सदैव असलेली छाया


आई म्हणजे श्र्वास 

आई म्हणजे आपल्यावर असलेला निस्वार्थ दृढविश्र्वास


आई म्हणजे संस्कार

आई म्हणजे कुटुंबाचा मुख्य आधार 


आई म्हणजे संवाद 

आई म्हणजे आपणास सहज मिळालेला आशीर्वाद


आई म्हणजे त्याग

आई म्हणजे आपण हक्काने दर्शविणारा राग


आई म्हणजे प्रेमाचा वर्षाव 

आई म्हणजे सदैव आपल्या मनात असलेला सदभाव


आई म्हणजे सर्वस्व

आई म्हणजे आपल्या चुका पोटात घालून कायम असते क्षमस्व 


अशी ही आपली आई आपल्यासाठी असते खास

जीवनाच्या शेवट पर्यन्त सदैव राहावी सुदृढ आणि आनंदी एवढीच आहे आस.


Rate this content
Log in

More marathi poem from Vasudha Thakur

Similar marathi poem from Inspirational