आई
आई
जगात येण्याआधी
जन्म घेतला तुझ्या गर्भात
तुझ्या श्वासाचे ठोके
अजूनही माझ्या कानात
खूप रडलो ग
तुझ्या स्पर्शासाठी
पण तू नव्हती जवळ
मला कवटाळण्यासाठी
कशी दिसत असशील तू
खूप विचार केला
स्वतःला आरशात बघत
विचारले मनाच्या दर्पणाला
शोधलं खूप तुला
जीवनाच्या वास्तवात
भेटलीस तू फक्त
पहाटेच्या स्वप्नात
सतत वाटत रहाते
स्वप्न उतरेल का सत्यात
माझी आई मला भेटेल का
खऱ्या आयुष्यात
