आई
आई
*जन्म दिला मातेने*
*रक्षण केले पित्याने*
*करू कशी उतराई*
*कोणत्या करणीने*
*घडविण्या मजला*
*घेतले कष्ट अपार*
*जगी या निरंतर*
*राहील टिकून संस्कार*
*पाजले बाळकडू असे*
*करूनी नैतिक संस्कार*
*लढण्या प्रत्येक संकटी*
*केले मज तयार*
*जपूनी तळहातावरील फोडाप्रमाणे*
*दिले प्रेम, सहानुभूति अन माया*
*एक मागणे परमेश्वरा*
*कधीही दूर न होवो जन्मदात्यांची छाया*
*शिकवूनी कार्यतत्परता*
*रूजविली समयसूचकता*
*नसावा मनी धर्मभेद कधी*
*असावी कायम मानवाप्रती एकता*
*हेच मागणं देवा तुला*
*आशीर्वच हाच द्यावा*
*प्रत्येक जन्मी मला ह्याच*
*मातेच्या पोटी जन्म मिळावा*
