STORYMIRROR

Pooja Ranalkar

Abstract Others

3  

Pooja Ranalkar

Abstract Others

आई तुझे असणेच...

आई तुझे असणेच...

1 min
363

आई तुझे असणेच,

माझ्यासाठी आशिर्वाद असते

तुझे नुसते अस्तित्वच,

माझ्यासाठी जीवनदान ठरते।


नको बोलूस तू काही,

रागव हवे तर माझ्यावर

नको राहूस सोबत माझ्या,

मात्र हक्क असुदेत माझ्यावर।


नको तुझे लाड मला,

नको तुझा लळा

तरीही तुझाच मी एक अंश आहे,

माहीत आहे गं मला।


रुस तू आमच्यावर,

हक्क आहे तुझा

पण अशी सोडून जाऊ नकोस,

नातवंडांना हवाय तुझा लळा।

-तुझाच मुलगा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract