माझी प्रेमळ आजी
माझी प्रेमळ आजी
प्रेमाचा निर्मळ झरा,
लावे सर्वांना लळा...
वाटे हवाहवासा सर्वांना,
तिचा मायेचा आधार...
बाबांची ती सावित्री तर,
सर्वांची लाडकी विमल...
बहिणाबाईंसम गोड तिचा गळा,
होता तिच्यावरी सरस्वतीचा आशीर्वाद...
वाटे ती मला सखी,
डोळ्यांत तिच्या वात्सलतेची नमी...
वाटे हवाहवासा अजूनही तिचा सहवास,
का गेली सोडुनी तू तुझ्या नातवंडास...
झाले किती मोठी तरी पापा तुझा हवा,
येतोय गं प्रत्येक सण पण तुझा फोन का नसावा..?
ये गं पुन्हा आजी तुझी उणीव खूप भासते,
तुझ्या लेकरांना तूच जीव लावते...
तू नाही म्हणुनी घराचा पाया घसरला,
रक्ताच्या नात्यातील गोडवाच संपला...
