STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others Children

3  

Priti Dabade

Inspirational Others Children

आई प्रेमरूपी झरा

आई प्रेमरूपी झरा

1 min
199

आई प्रेमाचा ओलावा

आई संस्कारांचा ठेवा


आई क्षमेची मूर्ती

आई गरजेची पूर्ती


आई एक उदाहरण

आई मनन, चिंतन


आई वात्सल्याचा सागर

आई भावनांची झालर


आई स्वप्नपूर्तीचे पर

आई सदैव तत्पर


आई ज्ञानाचे भांडार

आई मायेचा पाझर


आई उपदेशाचे बोल

आई व्यक्ती अनमोल


आईची प्रचंड सहनशिलता

आईची वाखाणण्याजोगी कुशलता


आई अंगाई गाई

बाळाला निद्रा येई


आई स्त्रीशक्तीचं रूप

काळजी करते खूप


आईच्या श्वासात मूल

बाळाच्या सुखाची चाहूल


आईचा चेहरा तृप्त

गुण अंगी सुप्त


आई जाणी भाव

नसे मनी हाव


आई चुकांवरील पांघरूण

कसे फेडू ऋण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational