आई जगण्याचे बळ!
आई जगण्याचे बळ!
आई तू दिलास हात
पाठीशी उभी राहिली
आठवणींना देऊन उजाळा
लहानपण कधी सरलेच नाही!
कोणत्याही अडचणींशी सामना करायला
सहज शिकवले तू
रस्ता कसा पार करून
प्रगति करायची हेे दावलेेेस तू!
तू दिसली नाही की कासावीस होते
क्षणभर जरी दिसली नाही की चुकीचे वाटते
तुला पाहून जगायला पंंख नवे मिळाले
क्षेेत्र असू दे कोणतेही जिंकायची उमेद लाभतेे!
