STORYMIRROR

वंदना विटणकर

Romance

4  

वंदना विटणकर

Romance

आभास..........

आभास..........

1 min
445

वैशाख वणव्यानी उन्हाची पसरे काहिली ,

अश्यात त्या गुलमोहोरा खाली वाट तुझी पाहिली


नेहमी प्रमाणे तु आलीस नाही येथे ,

तुझ्या केसातील मोग-याचा सुगन्ध पसरे तेथे 


पायातील पैजणाचा झंकार दुरवरी उमटला,

 हातातील कंकणाचा आवाज कानी भासला 


तुझे सौंदर्य झळके त्या सरीते काठी,

गळ्यातुन गोड स्वरांचे गीत उमटले ओठी


घेत गेलो पुढे पुढे मागोवा तुझ्या गीताचा,

क्षणात इकडे क्षणात तिकडे खेळ हा कुणाचा


वाळवंटा तील मृगजळा परी अस्तित्व तुझे भासे,

कळले मला तु माझ्या जीवनाचा भाग कधी नसे,


भास अभासाचा खेळ मनी असा दाटला,

कुणाला मात्र हा वेडेपणा वाटला


हो आहे मी वेडा तिच्या सौन्दर्याचा

पण तीला नाही मागमुस कशाचा, मागमुस कशाचा.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance