STORYMIRROR

वंदना विटणकर

Romance Others

3  

वंदना विटणकर

Romance Others

प्रीत*****

प्रीत*****

1 min
132

तू धरता ह्रदयी सखया

सुहास्य ओठी उमटले

डाळींबा सव गाल हे 

आरक्त गुलाबी झाले.......

श्वासात श्वास मिसळे

तव चुंबन उमटे भाळी

हृदयात चमकुनी बिजली 

पडे मना प्रितीची जाळी.....

नको सारू क्षणात दुर 

तुझ्या मिठीत चंदनी फाया 

करता दूर असा तू 

जळी अंग अंग ही काया.....

जोडिता हृदयाशी हृदय 

तव स्पर्श मनी हा कळला 

मोहरुन अशी मी गेले

जणू तनी गुलाब फुलला..... 

आठवण गोड भेटीची 

पुसली कधी न जावी 

मूर्ती अशीच माझी 

हृदयी तुझ्या वसावी...... 

हृदयी तुझ्या वसावी.......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance