भेट...
भेट...
तुफानापरी येऊन तु
भेटुन गेला क्षणात
प्रितीच्या त्या पाऊलखुणा
ठेवुनी माझ्या मनात .......
तो प्रेमाचा वर्षाव
जणु प्राजक्ताचा सडा
कुंजवनी कृष्ण जसा
राधेसाठी वेडा......
हिरवा चाफा मनी फुलोनी
सुगंध पसरे तनात
प्रीतीचे ते रोम उठले
घेता तु मिठीत.....
ती गोजिरी सायंकाळ
आठवणीत राहील
पुन्हा सख्या तू
भेटण्या कधी येशील....
नको काही बहाणा
हवी थोडी उसंत
प्रेमाच्या त्या सुरांनी
झाकळू आसमंत....
थोडे तुझे क्षण
हवे वाटे मजला
सांग सख्या तू
देशील ना मजला....
सोबतीने चालेल तुझ्या
जणू चाल सप्तपदीची
करून पुजन वडाचे
मागणी सात जन्माची......

