Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Inspirational

3  

नासा येवतीकर

Inspirational

मुलगी झाली हो .....

मुलगी झाली हो .....

5 mins
2.4K


मुलगी झाली हो…

सुमन चिंपाझीला एक गोष्ट सांगू लागली,



गावातील सगळ्या लोकांना पेढे वाटत रामराव मोठ्या आनंदाने बोलत सुटला "मुलगी झाली हो... मुलगी झाली हो... " लोकांनी सुद्धा तेवढ्याच आनंदात त्‍याचे पेढे घेत होते आणि त्‍याचे अभिनंदन ही करत होते. बरं झालं एकदाचं रामरावच्‍या घरात मुलगी आली असे लोकं एकमेकांना बोलू लागली. कारणही तसेच होते. रामरावाच्‍या मागील सात पिढ्यात मुलगी जन्‍मालाच आली नव्‍हती. तेव्‍हा रामरावला मुलींच्‍या या जन्‍माने अत्‍यानंद झाला परंतु त्‍यासाठी पाच मुले जन्‍माला घालावी लागली. गावात रामरावाला पांडवाचे वडील पंडू आणि त्‍याची पत्‍नी जानकी हिला पांडवांची आई कुंती या टोपणनावानेच ओळखले जायचे. आज त्‍यांच्‍या घरात मुलींच्‍या रूपात साक्षात लक्ष्‍मीच आली. मुलगी व्‍हावी म्‍हणून त्‍यांचा लक्ष्‍मीदेवीला नवस ही होता. म्‍हणूनच बारश्‍याची दिवशी सा-याजणी मिळून तिचे नाव लक्ष्‍मी असेच ठेवले. लक्ष्‍मीच्‍या येण्‍याने सा-या घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आनंदासाठी ज्‍यांनी हट्ट धरला होता ती रामरावची आई मात्र नव्‍हती. नुकतेच चार महिन्‍याखाली तिची देवाज्ञा झाली. न राहवता शेजारणीने म्‍हणूनच टाकली लक्ष्‍मीच्‍या रूपात आई परत आपल्‍या घरातच आली.

तळहाताच्‍या फोडाप्रमाणे रामराव व जानकी आपल्‍या मुलीची काळजी घेवू लागले. घरात ती सर्वांचीच लाडकी झाली होती. पौर्णिमेच्‍या चंद्रकलेप्रमाणे लक्ष्‍मी हळूहळू मोठी होऊ लागली. तिचे पाय फुटले तसे ती इकडे तिकडे चालू लागली. तिच्‍या बोबड्या बोलाने घर सर्व हरखून जात होते. बघता बघता लक्ष्‍मी दहा वर्षाची झाली. मुले ही मोठी झाली. घर संसाराचा व मुलांवरील खर्चामूळे रामरावाच्‍या डोक्‍यावर कर्जाचे डोंगर उभे राहत होते. कर्जाच्‍या काळजापायी त्‍याचा चेहरा सुकून चालला होता. कर्ज कसे फेडावे याचाच तो नेहमी विचार करायचा मात्र त्‍याला उत्तर सापडत नव्‍हते.


रामराव एका कंपनीत नौकरी करीत होता. जेमतेम दोन हजार रूपायाच्‍या तुटपुंजी पगारावर त्‍याची नौकरी चालू होती. रामराव तसा सोज्‍वळ, हुशार, मनमिळावू, आणि इतरांना सहकार्य करणारा होता. त्‍यामूळे कंपनीकडून दरवर्षी त्‍याच्‍या पगारात थोडी थोडी वाढ केल्‍या जात असे. जानकीसोबत विवाह झाला. त्‍यावेळी त्‍याच्‍या घरात ते दोघे आणि आई असे तिघेच जण त्‍यामूळे त्‍यांचा खर्च ही कमी व्‍हायचा आणि पगारीतून काही शिल्‍लक ही राहायचे. जानकीला पहिला मुलगा झाला त्‍यावेळी घरातील सर्व आनंदमय वातावरण झाले होते. मुलाच्‍या येण्‍याने खर्च थोडा वाढला परंतु रामरावला त्‍याची काळजी नव्‍हती. जानकी दुस-यांदा जेव्‍हा गरोदर होती तेव्‍हा सगळ्यांना वाटले की आत्ता मुलगी व्‍हावी. परंतु त्‍यांच्‍या सात पिढ्यात मुलगी झालीच नाही त्‍यामुळे रामरावच्‍या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होती. अखेर तसेच झाले दुस-यांदा ही मुलगाच झाला. आपल्‍या पिढ्यात मुलगी होणारच नाही त्‍यामूळे दोघांनाही ऑपरेशन करून घ्‍यावं असं वाटत होतं. एक तर आपला पगार कमी आणि ना शेती ना बाडी म्‍हणून त्‍यांनी ऑपरेशन करण्‍याचं ठरवलं. परंतु त्‍याच्‍या आईने मात्र तीव्र विरोध केला. भावंडांना ओवाळायला एक तरी बहीण रहावी अशी तिची मनोमन ईच्‍छा होती.


आईच्‍या या इच्‍छेमूळे त्‍याला काही एक करता येईना. मुलीची वाट पाहता पाहता त्‍याला पाच मुलेच झाली. संसाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता, पगारातील एकही रूपाया शिल्‍लक राहत नव्‍हता. घर आणि मुलांच्‍या शिक्षणावरील खर्च यामूळे तो अगदी त्रस्त झाला होता. आईच्‍या हट्टापायी त्‍याला काही सुचेना. कंपनीकडून उचललेल्‍या कर्जामूळे त्‍याला पगारसुद्धा कमी मिळत होता. त्‍यातच आईने अंथरूण धरले. ती आज-उद्यामध्‍ये जगत होती. जाता जाता तिने लक्ष्‍मी देवीजवळ नवस केला की या वेळेला तरी घरात मुलगी येऊ दे. हा नवस तिने आपल्‍या मुलाला व सुनेला सांगितले. एक-दोन महिन्‍यात तिची देवाज्ञा झाली आणि जानकीला परत दिवस गेले.

आईनं केलेल्‍या नवसामूळे साक्षात लक्ष्‍मीच घरात आली. मुलींच्‍या येण्‍यानं सारं घर आनंदून गेले. सात पिढ्याचं ऋण या क्षणी त्‍यांना मिळालं होतं. मुलींच्‍या जन्‍माने तो आनंदी झाला परंतु कर्जाच्‍या डोंगरामूळे त्‍याचा चेहरा नेहमी उदास दिसायचा. मुले आता मोठी झाली. नदीचे पाणी उताराकडे वहावी तसे मोठ्या मुलांचे कपडे, दप्‍तर, पुस्‍तक, वह्या सारं काही छोट्या भावांकडे येत होती. नवीन खरेदी करायला त्‍यांच्‍याकडे तेवढा पैसा सुद्धा नव्‍हता. कर्ज कमी करण्‍यासाठी तो कंपनीत जादा काम करू लागला. मुलांच्‍या शिक्षणाकडे त्‍याचे अजिबात लक्ष्‍ा नव्‍हते. मुलं शाळेला जात आहेत का ? रोज अभ्‍यास करीत आहेत का ? या गोष्‍टीकडे लक्ष्‍ा द्यायला अजिबात वेळ नव्‍हता. प्रत्‍येकाचं मागणं वेगळं, कसेबसे त्‍यांचे दिवस सरत होते. त्‍या संसारात ना तो खुश होता ना त्‍यांची मुलं, सगळ्यांची नुसती परवड चालू होती. घरात एखादा सण, समारंभ साजरा करायचे म्‍हटले की त्‍याच्‍या काळजात धस्‍स करायचं. घरात खाणारी तोंड झाली जास्‍त आणि कमावणारा हात फक्‍त एक, त्‍यामूळे त्‍याच्‍या संसाराच्‍या जमाखर्चाचा हिशोब काही केल्‍या जुळतच नव्‍हता.


आर्थिक दारिद्रयामुळे एकाही मुलाचं शिक्षण पूर्ण झाले नाही. रिकामटेकडे पोरं खाऊ लागली फिरू लागली. एकानंतर एकाचे असे पाचही जणाचे लग्‍न झाले. शे-पाचशे रूपयांची नौकरी त्‍यांना कशी बशी मिळाली. ते पैसे त्‍यांच्‍याच संसाराला पुरत नव्‍हते तर रामरावाच्‍या परिवारांसाठी ते काय करतील. उलट त्‍याचेच खाऊन त्‍यालाच उलटे बोलत होती. काय दिलं आम्‍हाला ? गरिबीच्‍या पलिकडे आम्‍हाला काही दिलेच नाही असं रोजच त्‍यांच्‍यात वाद व्‍हायचा. त्‍यांच्‍या अशा वादाने तो पुरता वैतागला होता. आईचं बोलणं ऐकून एवढा संसार वाढविला याचा त्‍याला राहून राहून पश्‍चाताप होत होता. दोन पोरांवर ऑपरेशन झालं असतं तर हे दिवस पहायला मिळालं नसतं असं मनोमन विचार करत होता. लक्ष्‍मीच्‍या तोंडाकडं पाहून तो सारे दु:ख विसरून जात होता.


शेवटी एके दिवशी व्‍हायचे तेच झाले. वाद घालून मुलांनी आपली चूल वेगळं मांडण्‍याचा निर्णय घेतला. डोक्‍यावरचे कर्ज वाढवून ते मोकळे झाले. लक्ष्‍मी वयात आली असतांना त्‍यांनी साथ सोडली, यामूळे तो अजून चिंताग्रस्‍त बनला होता. मुलीची कन्‍यादान करण्‍याची जबाबदारी ही शेवटी पित्‍याचीच. मुलीच्‍या लग्‍नाच्‍या काळजीत त्‍याला रात्रीची झोप येत नव्‍हती. काय करावं हे त्‍याला सुचेना. दिवाळी झाली. तुळशीचं लग्‍न झालं. त्‍या रात्री तो या कुशीवरून त्‍या कुशीवर होत होता तरी ही त्‍याच्‍या डोळ्याला डोळा लागत नव्‍हता. राहून राहून त्‍याच्‍या मनात एकच गोष्‍ट मनाशी पक्‍की केली आणि शांत झोपी गेला. सकाळी लवकर उठला. स्‍नान करून चहा घेतली आणि बाहेर पडला. तास दीड तासानंतर तो परत घरी आला एका युवकाला सोबत घेवून. जानकीला चहा ठेवायला सांगितलं. लक्ष्‍मीची ओळख करून दिली आणि म्‍हणाले, “लक्ष्‍मी, तुला हे शिवाजी मालक म्‍हणून पसंद आहे का ?” लक्ष्‍मी लाजली आणि आत पळाली. तेव्‍हा जानकीनं त्‍याची विचारपूस केली. शिवाजी एक अनाथ मुलगा होता. कामात हुशार. रामरावच्‍याच कंपनीत कामाला होता. स्‍वभाव सुद्धा त्‍याच्‍यासारखाच. दोघाचं बोलणं पूर्वीच झालेलं होतं. अखेर लक्ष्‍मीनं होकार दिला. मुले तर त्यांना पोसायला तयार नव्हते म्हणून शिवाजीला घरजावई घेण्‍याचा विचार पक्‍का झाला. त्‍या दोघाचं मोठ्या थाटामाटात लग्‍न झालं. अखेरचा सल्‍ला म्‍हणून रामरावाने जावयाला एक कानमंत्र दिला. मुलगा असो वा मुलगी दोनच्‍या नंतर नको रे बाबा! हम दो हमारे दो….. यावर शिवाजी फक्‍त स्मित हास्‍य दिला आणि आपल्‍या सुखी संसाराला प्रारंभ केला.

ही गोष्ट एकूण दोघे ही हसायला लागले.


नागोराव सा. येवतीकर,

येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.

9423625769



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational