Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Namita Dhiraj Tandel

Tragedy

3  

Namita Dhiraj Tandel

Tragedy

सुपरमॉम दाटलेले अश्रु

सुपरमॉम दाटलेले अश्रु

2 mins
331


निशाच्या आईची देहबोली सगळचं काही सांगून जात होती.. कंठ गळ्याशी अगदी दाटून आला होता.. लेकीने रडत मिठी मारली असती तर त्या ढासळून पडणार होत्या एवढं मात्र नक्की.. परंतु लेक खुपच खुश होती म्हणुन आईने अश्रू लपवले होते.. दुपारी लग्न उत्तमरित्या पार पडले आणि निरोप घेण्याची वेळ आली.. निशा अगदी हसत आईला मिठी मारत म्हणाली, "निरोप कसला माझा घेता.. जेथे राघव तेथे सीता.." सर्वत्र मांडवात हशा पिकला..

हसतच निशा सगळ्यांचा निरोप घेत कारमध्ये बसली.. जेव्हा आई दिसेनाशी झाली तेव्हा तिच्या मनाचा बांध मात्र फुटला.. समीर तिला जवळ घेत म्हणाला,"आई कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजवर आहे.. तिला त्रास होऊ नये म्हणून तू तुझे हक्काचे अश्रू तिच्यापासून लपवून ठेवले होतेस ना.."


रडतच निशा उत्तरली.."मी पाच वर्षाची असताना बाबांना देवज्ञा झाली.. आईने स्वकष्ट करून मला लहानाची मोठी केली.. चांगले शिक्षण देऊन मला डॉक्टर बनवले.. आणि ह्या घडीला ती मरणाची पायरी चढत असताना मी तिला सोडून चालले.."


समीर तिचे डोळे पुसत बोलू लागला.. "अगं वेडे.. ज्या आईने तिचं अख्ख आयुष्य तुझ्यासाठी बहाल केलं.. त्या आईपासून तुला मी हिरावून घेऊ शकत नाही.. दोन दिवसानंतर आपण आईला भेटायला जाऊ या.. "


दोन दिवसांनी निशा माहेरी परतली.. आईच्या डोळ्यांतील दाटलेले अश्रू पाहून तिला बिलगली.. दोघींच्या अश्रूधारा भरभरून वाहत होत्या.. 

"जीवन हे क्षणभंगुर आहे.. आईच्या सोबतीस राहून तुला जेवढे क्षण जगता येतील तेवढे जगून घे.. ज्या सुपरमॉमने तुला घडवलं तिच्यासाठी काहीपण.." समीर शांत स्वरात व्यक्त झाला..


आईने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत हसत आशीर्वाद दिला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy