Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Alka Jatkar

Tragedy

2.4  

Alka Jatkar

Tragedy

काळे मणी

काळे मणी

1 min
1.2K



लग्नात मोठ्या हौसेने नवऱ्याकडून बांधून घेतलेले काळे मणी आता सुरेखाला बोचू लागले होते.


दिवसरात्र नवऱ्याचा छळ सहन करता करता थकून गेली होती बिचारी. दिवसभर घराच्या कामाचा रगाडा, त्यात नुसत्या बसून खाणाऱ्या नवऱ्यामुळे संसाराचा गाडा चालवण्यासाठी दहा बारा घरची धुणीभांडी, पदरात असलेलं एक पोर या साऱ्यात दिवस कसा उगवायचा अन कसा मावळायचा कळायचंच नाही बिचारीला.


रात्री सारं उरकून जरा कुठं अंग टेकलं जमिनीला कि दारू ढोसून आलेला नवरा यायचा नवरेगिरी करायला. 'दारू पिऊ नको. जरा संसाराला हातभार लाव ' असं खूप समजावून सांगूनही काही फरक पडत नव्हता. कामाचं काही नाही वाटायचं तिला पण रोजचा नवऱ्याकडून मार खाणं आणि त्याच्या शिव्या झेलणं अगदी असह्य होऊ लागलं होत आता. बरं बिचारीला माहेरचाही आधार नव्हता.


शेवटी रोज सकाळी देवालाच एक मागणं मागायची ती ... 'नवऱ्याला मारून टाक एकदाचं. हे काळे मणी तोडून टाकले कि सुटेन मी या जाचातून.'


आणि एक दिवस खरंच ऐकलं कि देवाने तिचं. दारूच्या नशेत एका गाडीसमोर येऊन मरुनच गेला नवरा तिचा.


मनातून खरं तर आनंदाने पण साऱ्यांसमोर अतिशय दुःखाने तिने काळे मणी ओरबाडून काढले गळ्यातून. हायसं वाटलं तिला एकदम.


आता एक एक जण येऊ लागला समाचाराला आणि तिच्या मोकळ्या गळ्याकडे सहेतुक पहात तिचे खोटे सांत्वन करू लागला. त्या नजरेचा अर्थ लक्षात येताच ओरबाडून काढलेले काळे मणी मुठीत घट्ट आवळले सुरेखाने. दुर्दैवाने या मण्यांमुळेच आपण किती सुरक्षित होतो या जाणिवेने सुन्न झाली बिचारी.




Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy