यारिया
यारिया
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते. हेच ' नवरस ' आपल्या कथेतून नवरात्री डायरी मध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दिवस ४: पिवळा - पिवळा रंग आनंद आणि आनंदाचे प्रतीक आहे. असाच आनंद आज कथेतून साजरा करते आहे.
कथा : यारिया
स्थळ: कल्याण पश्चिम काळा तलाव
काळा तलाव जवळ सगळेजण जमा झाले होते. आज सगळ्यांनी ब्लॅक जीन्स आणि ब्ल्यू टी शर्ट घातला होता. त्या टी शर्टवर पांढऱ्या अक्षरांमध्ये 'येड्यांची जत्रा' असं लिहिलं होतं. प्रत्येकाच्या डोक्यावर पांढरी हॅट होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. ते सगळे त्यांच्या कॅप्टनची वाट बघत ताटकळत उभे होते.
"यार आतमध्ये तरी बसूया. निदान मासे तरी बघता येतील." नीता जी त्या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त समजूतदार होती, ती वैतागून म्हणाली.
"हो यार. ती आली की कॉल करेल ना आपल्याला." रितिका जी त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान होती ती म्हणाली.
"अरे ती ड्रायव्हिंग करत असणार. मग ती कॉल कशी करेल?" त्रिवेणी म्हणाली.
"करेल. खाली उतरल्यावर आपण दिसलो नाही की बरोबर कॉल करेल." नितीन, जो त्यांच्या ग्रुपमधला सगळ्यात हँडसम मुलगा होता, तो म्हणाला.
"ठीक आहे. आपण आत बसूया. जवळच बसू म्हणजे तिला लगेच कळेल." अलका म्हणाली.
सगळेजण आतमध्ये गेले. जास्त गर्दी नव्हती. फक्त कुठे कुठे फ्रेंड्स लोकांचा घोळका दिसत होता. आज फ्रेंडशिप डे असल्याने सगळेजण भटकायला निघाले होते. त्रिवेनीता मासे खात नाहीत पण त्या माश्यांना बघण्यात व्यस्त होत्या. नितीन त्याच्या फोनमध्ये कवितासोबत बिझी होता. मृणाल, प्रीती, अलका, सखी, युक्ता, दीप्ती, नेहा, मानसी, प्रीती, अनुष्का तोंडाचा चंबू करून सेल्फी काढत होत्या.
तेवढ्यात काळा तलावच्या मुख्य गेटवर एकच कल्ला सुरू झाला. ज्या व्यक्तीची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते ती आली होती. पण तिची येण्याची स्टाईल सगळ्यात वेगळी होती. तिनेही ब्लॅक जीन्स आणि जत्रेची प्रिंट असलेलं ब्लु टी शर्ट घातलेलं आणि डोक्यावर हॅट घातलेली. पण ती हवेत उडत होती! तेही एका झाडूवर बसून! उडणारा झाडू बघून सगळ्यांचे डोळे विस्फारले होते. तिने हवेत एक कोलांटी उडी मारली आणि गेटवर उतरली. तिने पाय जमिनीवर टेकवले. आजूबाजूचे सगळे लोक तिच्याभोवती जमा झाले. पण तिने एकाच धक्क्यात सगळ्यांना बाजूला सारलं आणि आत शिरली.
जत्रेच्या पब्लिकने तिला येताना पाहिलं. तिच्या हातात तिचा उडणारा झाडू होता. बघणाऱ्याला ती काळा तलावची साफ सफाई करणारीच वाटली असती. सगळेजण धावत धावत तिच्याजवळ गेले.
"अरे किती उशीर! उडत यायचं असतं तरी एवढा उशीर लावते! चालत यायचं असतं तर पुढच्या फ्रेंडशिप डेलाच भेटली असती." नीताने बडबडायला सुरुवात केली.
"तू नक्की झोपून आली असणार! आणि विसरली असणार खरं सांग काऊ!" त्रिवेणी दरडावून म्हणाली.
"खरय त्रिवा ही नक्कीच आजचा दिवस आणि प्लॅन विसरली असणार!" नितीननेही टोमणा मारला.
"जाऊद्या रे आली ना आता." सखीने तिची बाजू घेतली.
"तूच एकटी समजूतदार आहेस गं सखे!" ती म्हणाली.
"बरं मग तू ती वस्तू आणली का?" रितीकाने हाताची घडी आणि भुवई उचकावत विचारलं. तसा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. सगळ्यांचं लक्ष तिच्यावरच असल्याने त्यांना ते लगेच कळलं.
"काऊ!" सगळेजण एका सुरात ओरडले आणि कावेरीने कान हाताने झाकले.
"सॉरी सॉरी! मी विसरली यार! मला खरंच लक्षात आलं नाही. मी सकाळी न उठता दुपारी दोन वाजता उठली आणि माझ्या लक्षात आलं की आज फ्रेंडशिप डे आहे आणि आपल्याला भेटायचंय. मी काल रात्री डोक्याला तेल लावून झोपलेली त्यामुळे एक तास लागला केस धुवायला. त्यानंतर अर्धा तास गेला ही जीन्स आणि टी शर्ट इस्त्री करायला. त्यानंतर एक तास मेकअप आणि हेअरस्टाईल करायला लागला. मग सगळी तयारी झाल्यावर आठवलं की मी काही खाल्लंच नाहीये. मग झाडूवरून इकडे यायच्या ऐवजी मी अंबर वडापाव पर्यंत उडत गेले आणि तिथे एक ब्रेड कटलेट, एक वडा पाव खाल्ला. मग रस्त्यात मधुरीमाची पाणीपुरी दिसली आणि मग माझ्याच्याने काही राहवलं गेलं नाही. माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मग एक प्लेट पाणीपुरी, एक प्लेट शेवपुरी खाल्ली आणि उडत उडत इथे आली." कावेरीने तिची राम कथा संपवली आणि सगळ्यांकडे पाहिलं. सगळेजण तिच्यावर नजर रोखून रागाने बघत होते. आता ते कोणत्याही क्षणी कावेरीला धुवायला सुरुवात करतील का काय, हा प्रश्न बघणाऱ्याला नक्की पडला असता.
"सॉरी ना यार! जाऊद्या ना आता या गरिबाला. आपण घेऊया ना रस्त्यात केक!" कावेरी केविलवाण्या चेहऱ्याने म्हणत होती.
पण तिच्या मित्रांना मात्र अजिबात तिची दया येत नव्हती. ते कॉन्स्टंटली तिच्याकडे रागाने बघत होते आणि एका क्षणाला मोठमोठ्याने हसू लागले. कावेरी गोंधळली. तिला कळत नव्हतं की हे सगळे अचानक असे का हसताय.
"फसवलं... फसवलं... गरम डोक्याच्या मालकीण बाईंना फसवलं." नितीन मोठमोठ्याने म्हणू लागला.
"येईई... रोड रोलरवालीला उल्लू बनवलं." त्रिवेणीही नितीनला साथ देत होती.
"काय झालं सांगाल का? काय फसवलं तुम्ही?" कावेरीने गोंधळलेल्या चेहऱ्याने विचारलं.
"अरे आम्ही आधीच केक आणून ठेवलाय. तुला काय वाटलं? आम्ही तुझ्या भरोशावर राहू का?" सखी दात दाखवत हसत म्हणाली. कावेरीने तोंड वाकडं केलं.
"हा का? चला मग आता. केक कट करूया." कावेरी काहीच रिऍक्ट न करता म्हणाली.
"हा बघा बघा कशी लगेच चला चला म्हणतेय... स्वतः विसरते ते चालतं पण आम्ही आणलं तर आमचं एका शब्दाने कौतुक नाही करत..." युक्ता आणि नितीन एकसाथ म्हणाले
"अरे ठिके... सोड तू... आता कुठे शांत झाली ए... नाहीतर अजून डोकं तापायचं बाईचं... मग हे एवढं पाणी पण कमी पडेल..." त्रिवेणी तलावाकडे नजर टाकत बोलली.
"हो हो चला... चला रे केक कट करूया बस झाल्या सेल्फी काढणं... बिचारा मोबाईल ही म्हणत असेल जेवढ्या वेळा मी माझं तोंड नाही पाहत तेवढ्या वेळा ह्या माझं पाहतात आणि मला त्यांचं जखिणीचं रूप बघायला लावतात..." नितीन ने टुकार जोक मारला (सवय हो सवय)
"हुह्ह हा नितीन दादू नेहमी असाच करतो... आता काय चला..." मृणाल
"अय्य नित्या तुला मरायची घाई झाली आहे का रे?" त्रिवेणी बोलली.
नितीन म्हटला, "का? काय केलं मी?"
"अरे अजून प्रीती, मेघा, संध्या यायच्या आहेत..त्यांना सोडून केक कापला तर सगळ्यांना मारून टाकतील त्या." त्रिवेणी बोलली.
लगेच रितिका, नीता अन अलकूने त्या तिघींना कॉल केला..कॉल केल्यावर समजलं त्या तिघी कुठंतरी ट्राफिक मध्ये अडकल्या आहेत..मग सगळे निराश झाले..एकतर उन्ह लागत होतं खूप अन अजून यांची गॅंग नीट जमा पण झाली नव्हती..फ्रेंडशिप डे होतोय की फरफट डे होतोय असं वाटतं होत सगळ्यांना..तो बिचारा आईस केक पातळ होत होता तसं त्यांचं अवसान गळून पडत होतं....इतक्यात कावेरी आली अन तिने विचारलं,
"4 दिवस उपाशी असल्यासारखी का तोंड केलेत तुम्ही?"
नीताने तिला काय झालं ते सांगितलं...
इतक्यात रितीकाच्या मोठ्या डोक्यातील छोट्या मेंदूत एक आयडिया आली..ती कावेरील म्हटली
"कावू ये कावू..आपण तुझ्या झाडूवरून उडत जाऊ.."
ती काय बोलतेय कुणालाच काय समजलं नाही...
मग रितिका समजावून सांगू लागली..
आपण दोघी तुझ्या झाडूवरून जाऊया अन त्यांना घेऊन येऊया ना..प्लिझ्झझ्झ!!! मला उडायचं आहे झाडूवरून..
सगळ्यांना आयडिया चांगली वाटली मग कावू पण तयार झाली तिने तिचा झाडू हवेत तरंगत ठेवला अन ती त्यावर स्वार झाली अन रितीकाला बोलली मागे बस..
रितिका तोंड आवळत म्हटली "मला पुढं बसायचं हाय"
यावर कावेरी जरा संतापली अन म्हटली
"या..बसा नाहीतर परत सगळ्या मला म्हणतील एकतर उशिरा आली आणि आता त्या लेकराला पुढं बसू देईना..."
रितिका अन कावेरी दोघी झाडूवरून गेल्या त्या तिघींना आणायला...
तोवर बाकीचे सगळे तलावाकडे फिरायला गेले..
काही वेळात कावेरी अन रितिका मेघा प्रीती संध्याला घेऊन आल्या....
समजूतदार वागणाऱ्या नीताने मस्त तोंडसुख घेतलं त्या तिघींवर...भरीत भर म्हणून त्रिवेणी होतीच...
नितीन अन अलकू मज्जा बघत होते फक्त..मग त्या तिघीनी सॉरी म्हटलं..
यावर नितीन म्हटला, "नुसता सॉरी नाही चालणार...आम्हा सगळ्यांना तुम्ही तिघीनी तलावामधल्या बोटीतून फिरवायचं." नाही होय करत शेवटी त्या तयार झाल्या... यावर अलकू बोलली
"रितिका, बोटीमध्ये पण पुढं बसणार का?" यावर एकच हशा पिकला...
"बरं लय झाला टाईमपास..आता केक कापूया का? की पूर्ण वितळल्यावर डायरेक्ट प्यायचा केक?" वैतागलेली कावेरी बोलली..
"हो...हो...." बाकी सगळे बोलले
सखी "मी आधीच सांगते ते केक फासाफासी करायची नाही... केक वाया घालवू नका...."
"बर कवडे तुझी दत्तक मम्मी कुठंय गेली? स्पेन का इटली? कुठं शिलगली? मासिमोच्या स्वप्नात अडकली का?" त्रिवेणी
"तिला आताच पितांबरीचा स्टॉक पाठवला आहे, ती भांडी घासत असेल.." नितीन
सगळे नितीनकडे
"सॉरी ते नेहमी बोलतो म्हणून बोललो.." कावेरीचा राग बघून नितीन गपगार होत मान खाली घालतो..
तसे सगळे एक साथ त्याला हसतात
युक्ता "उल्लू बनाया बडा मजा आया "
नितीन युक्ताकडे बघत "ये चिमणे तुला बघतोच नंतर"
नीता "झाले तुमचे पांचट जोक्स केक कापायचा का? एकतर एवढ्या लांबून आलोय त्यात जवळचे मेंबर सगळ्यात लेट आवरा आम्हाला निघायचं आहे..."
तिकडून कीर्ती पळत आली "हे थांबा रे मी पण आले"
नेहा "बर झाले केक कटिंग झाल्यावर हॉटेल मध्ये जेवायला जायचं होत... प्रश्न पडला होता नितीनला की पैशे कोण देणार आता तू लेट आलीस तर तू पैसे भर आमचे"
कावेरी "इथे क्युबा रेस्टॉरंटमध्ये जाऊ"
सगळे एक साथ चालेल म्हणून ओरडले...
त्रिवेणी "ऐकाना आता आपण एवढे भेटलो तर ह्या रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया का? त्याला सांगू आमच्या मित्र मैत्रिणींना कायम सुखी आनंदी यशस्वी समाधानी ठेव..."
नीलम "चांगली आयडिया आहे त्रिवा चला जाऊ"
कावेरी "त्रिवेणी तुझं लग्न पण ह्याच मंदिरात झाले होत ना"
तशी त्रिवेणी लाजत हो म्हणाली...
नितीन "त्रिवेणी राहू दे नको लाजू तुला लाजता पण येईना "
त्रिवेणी "ते लिपी वाचायला लागल्यापासून लाजण्याचे धडे घेते पण डोंबलाच लाजायला येईना झालंय...
नीता "बर चला रे आता.... मंदिरात प्रार्थना करू, आणि मग केक कट करू"
सगळे मंदिरात जातात तेव्हा पाठून आवाज येतो "आम्हाला विसरलात ना "
सगळे आवाजाच्या दिशेने वळून बघतात तर मयूर अमर दत्ता तृप्ती पूजा योगिता वैदेही आणि विनय असतात...
कावेरी "अरे तुम्ही तर नाही म्हणला होता ना.."
अमर "इमोशनल ब्लॅकमेल करत आम्हाला बोलावलं आहे विचार त्या त्रिवेणीला"
तसे सगळ्यांनी त्रिवेणीकडे बघितलं..
"हो ह्या सगळ्यांशिवाय ग्रुप आहे का आपला म्हणून त्यांना दोस्तीचा वास्ता देऊन बोलावलं... म्हणून तुम्हाला मंदिरात जाऊ हे बहाणे केले..."
नीता "गुणी ग माझी मैत्रीण ती"
अमर "हे बघा घेतली bf ची बाजू लगेच"
तस नीता आणि त्रिवेणीने त्याला लुक दिला..
नीलम "मस्त धमाल करूया आज सगळ्यांनी"
बर झाले अमर तू आलास माझं सामान तेवढं तू उचल बाबा प्रवास करून कंटाळले.. " नीता
विनय "आवरा लवकर आम्हाला निघायचं आहे अभिवाचनाची तैयारी करायची आहे "
"हो रे, मला तर खूप काम आहेत.. ड्रेस पण सिलेक्ट करायचा आहे" कावेरी
" झालं हिचं परत ड्रेस आणि मेकअप पुराण सुरू.. " नितीन
" मला भूक लागली आहे लवकर चला.. " सखी
" पण बिल कोण भरणार आहे त्याच्यावर ठरणार ना किती खायचं ते.. " प्रभू
" चिटपाखरू.. तू कुठून उडत आलास.." युक्ता
" काकू तुमची कृपा.. " प्रभू
" जेवण... " त्रिवेणी ने परत सगळ्याना काय चाललंय त्याची आठवण करून दिली..
" मला इटालियन पास्ता द्या फक्त.. " कीर्ती
" तुला इटली चा मासिमो आवडायचं आता पास्ता पण.. " त्रिवेणी बोलली तसे सगळे हसायला लागले..
" अरे माझं ऐका आपण एक काम करूया.. तस पण आताच अडमिन्स चा बिर्थडे झालाय मग त्यांनाच कापूया का.. " सखी ने प्लॅन सांगितलं तसे सगळ्यांचे डोळे चमकले.
" तुला मी थोड्यावेळापूर्वी समजूतदार बोललेली.. " कावेरी
" आता आम्हाला पटलं ते.." नितीन
" ठरलं मग आजचं जेवण दोन्ही अडमिन्स कडून.. " नीता बोलली
"मला अँकरिंग करताना छोट्या भावाचा हेडफोन मागून घ्यावा लागतो.आणि माझ्या पॉकेटमनीतून साधा नेकबँड चा हेडफोन ही येत नाही आणि बर्थडे ला सगळयांना सांगितलं होतं कोणाला गिफ्ट द्यायायचं असेल तर हेडफोन द्या नेकबँडच,पण नाही दिलं कुणीच..! तुम्हा सगळ्यांचे जेवणाचे बिल कशी पे करू मी..?आता पापानी उलट पॉकेटमनी सुद्धा कमी केले..माझ्याकडे मी शोध लावलेल्या झाडु असल्याने मी झाडुवर बसून उड़त आली नाहीतर सगळे पैसे तिकीटामध्येच गेले असते"कावेरी
सगळेजण ऐकून कावेरीच्या बोलण्याने इमोशनल झाले.
"सॉरी काऊ अगं मी तुला ह्यावेळेस खरच तु मनशील ते गिफ्ट देणार होते पण तुझे जिजु घरीच असतात म्हणून पैसे हडपायला नाही भेटलं मला यंदा.."त्रिवेणी
सगळ्यांचा हसण्याचा आवाज एकदाच जोरात झाला..कावु ही हसायला लागली..
"अरे वेळ नका करु माझ्या चिल्लेपिल्ल्यांना घरी झोपवुन आले.ते उठण्याच्या अगोदर परत जाव लागेल मला.." नीता
"आता विनय दादाच एकटे अडमिन ग्रुपचे, बिल पे तुम्हीच करणार.."पभ्या हसत म्हणाला.
"बिलचे टेन्शन नका घेऊ मीआणि अमर भरू" दत्ता म्हणाला
सगळेजण खुदुखुदु हसु लागले..
"अरे नका काळजी करु मी बिल भरतो आज तुम्ही मनसोक्त जे जे आवडेल ते ते खा पण कोणीही पार्सल नाही घेयायचं बरं का खास महिला मंडळ" विनय पण हसत म्हणाला.
"नीता कडे बघत हसत ओ हो नीता ही तुझी बॅग तर खाली खालीच वाटतेय" अमर
"नीता अमर कडे पाहते"
रितीका, अल्कु आणि पल्लवी हळुहळु ऐकून हसायला लागतात..
तिघींकडे नीता पाहताच तिघी शांत होतात..
"ओय, चला या सगळेजण केक कट करु मला खूप जाम भुक लागली "कावेरी
"खाऊन खाऊन एक दिवस तु कॉमेडी क्वीन भारती सारखी होणार (मिम्स क्वीन कावु..)"नितीन
बाजूला असलेल्या हिरवळी ठिकाणी असलेल्या झाडाचा छोटा टेबलासारखा गोलाकार खोडाकडे सगळेजण गोल जमाव करुन थांबतात..
"लहान असल्याने उत्साहात रितीका म्हणाली.. पण केक कापायचा कुणी.."
"कावेरी तु कट कर ग्रुप अडमिन आहेस "त्रिवेणी
"हो आणि मी ग्रुप अडमिन चा फ्रेन्ड म्हणून मी पण सोबत कट करणार" नितीन
"अरे रितीका लहान आहे तिच्या हाताने कट करु द्या " सखी
"अरे,थांबा अल्कु कट करेल केक कारण तीच बनवुन आणली स्वतःच्या हाताने..!"मृणाल
"अल्कु लाजत खाली पाहत..मी नाही नको"
"अरे थांबा सगळेजण केक कट करायचं एकदाच सगळेजण सारखेच आपण" विनय दादा(समुहाचे अडमिन आणि समजूतदार असल्याने सगळ्याना समजून घेऊन योग्य निर्णय देत असतो नेहमी)
सगळ्यांचा एकदाच होकार येतो.."हो"
"अल्कु केक चा बॉक्स त्या लाकडी खोडावर ठेवते आणि ओपन करुन पाहते तर काय.."केक...!!!
तो बटरस्कॉच फ्लेवर केक कमी न दुधात भिजवलेला भात जास्त वाटत होता.. कावेरी, कीर्ती न रितिका ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं तो केक बघून त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं
सगळ्यांची तोंडे पाहण्यासारखी झालेली ...
तेवढ्यात नितीन पुढे अन ओठांवरून जीभ फिरवत बोलला तो केक आता खाण्या सारखा नाही राहिला तर मी पिऊन टाकू का??? तस पण मला दूध भात जाम आवडतो मृणाल , प्रीती आणि अलका ने एकदा त्याच्या कडे बघून परत एकमेकींकडे पाहिलं "असा कसा हा" अशे त्यांच्या नजरेत भाव होते...
"ढयान टॅ ढयान" मागून आवाज आला तशे सगळ्यांनी आपल्या माना जीराफासारख्या वळवून मागे पाहिलं तर मेघा हातात केकचा बॉक्स घेऊन उभी होती.
परत संध्या आणि नीताचा चेहरा बघून नीता बोलली तोंडाला पाणी सुटलं"
जाऊदे मी ह्यांना सकाळीच सांगून आलेय पाणी आलं तर भरून घ्या नाही तर रात्री जेवण नाही भेटणार" , भरतील ते बरोबर त्रिवेणी बोलली
येड्यांच्या जत्रेत खरंच नमुने भरलेत अस बोलून सखी ने आपली hairstyle बिघडणार नाही अशा तऱ्हेने हळूच कपाळावर हात मारून घेतला युक्ता ने धावत जाऊन मेघा च्या हातातील केक घेतला न तूच ग फक्त तूच अस बोलून तिच्या गळ्यात पडली
पण नितीन च्या चेहऱ्यावर बारा वाजले त्याला वाटलं आपण हिला रात्री घाबरवलं होतं भूत म्हणून तर ही केक नाही देणार आपल्याला पण तरी नसलेली हिम्मत करून तो बोलला ओय रामपूर के मेले मे बिछडी हुई दो बेहनो तुमचं झालं असेल तर आणा तो केक इकडे , एकतर आज पार्टी म्हणून मी रात्री फक्त दोनच चपात्या खाल्ल्यात आणि सकाळी तर नाश्ता पण नाही केला जेव्हा सगळ्यांनी आपले डोळे वटारले " अरे चला लवकर केक कट करु बोलून तत्याने लगेच विषय बदलला
सगळयांनी केक कापला..आणि एकमेकांना भरवू लागले..
तर ह्यात सखी कुठेतरी बघत होती..आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते..एरवी दुसऱ्याची खेचणारी सखी,भांडणारी सखी आज चक्क रडत होती...आणि हेच त्रिवेणी च्या लक्षात आलं..
तिने जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला..तरी मॅडम अजून भानावर नव्हत्या...
त्रिविणीं देखील तिथेच पाहत होती...
हळू हळू सगळ्यांच लक्ष तिकडे गेलं...मन भरून येत होतं पुढच दृश्य पाहून..पण त्या पेक्षा अधिक राग येत होता पुढच दृश्य पाहुन..
सगळे तलावाजवळ मनमुरादपणे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करत होते..आणि ती लहान लहान चिमुरडी त्यांच्या तोंडकडे आपल्याला ही काहीतरी खायला मिळेल आशेने पाहत होती...
पण आपल्या या मैत्रीच्या सेलीब्रेशन मध्ये त्यांच्या कडे कुणाच लक्षच नव्हतं...तोंडाला केक लावून अर्धा मुर्धा केक वाया घालवून खाली पडलेल्या त्या केक प्लेट वरचा केक त्याबरोबर ते खाण्याचे पदार्थ ती मूल उचलून खात होती...
शेवटी भूक ओ..त्यात ती चिमुरडी पोर..आई-बापाविना राहत असलेली, जगत असलेली..आयुष्य म्हणजे काय ह्याची अजून ओळख नसताना त्यात होरपळून निघत होती...
कस असत ना वाईट काम चार चौघात लगेच गाजत..पण चांगल्याच तस होत नाही..म्हणजे चांगलं समजण्याआधी वाईट गोष्ट चप्पल घालून गावभर फिरुन आलेल्यातल्या प्रकार झाला होता...
हे सर्व पाहून गलबलून येत होतं प्रत्येकाला..नीता तर आई होती..तिला तर अधिक गलबलून येत होतं..बाकीच्यांच्या ही मनातली माया सहज कृतीत उमटत होती... ते म्हणजेआपल्या ग्रुपला ते बघवल नाही..आणि ते नुसते पाहत ही बसले नाहीत...सगळे मिळून तिकडे गेले..आणि त्यांना आपल्यातला चांगला केक खायला दिला...
हीच होती त्यांची मैत्री...न सांगताही खूप काही सांगून जाणारी,न बोलताही खूप काही बोलून जाणारी,एकमेकांच्या मनातलं फक्त डोळ्यात बघून ओळखणारी...दिवसाच्या सुरुवातीला चहा आठवतो तशी मैत्री होती ह्यांची.. प्रत्येक क्षणी आठवणारी...पावसात भिजताना पाऊस,माती,ढग आणि मनमुरादपणे जगणार सुंदर आकाश अस कॉम्बिनेशन होत त्यांच्या मैत्रीचं...अनोख, निर्मळ निस्वार्थी, स्वच्छंदी...
त्यातली एक छोटी मुलगी नीलम कडे आली..आणि तिला खाली वाक अस सांगून तिच्या गालाला पापी दिली..
नीलम:पिल्लु तू किती क्युट आहे ग..नाव काय तुझं?
ती-शलावणी..
सखी:ओ..कसलं क्युट नेम आहे श्रावणी..
अस करत सगळयांनी त्यांचे लाड केले..त्यांच्या समोर ही तीन जण होते जे आशा मुलांना मदत करत होते..
आपल्या कावेरी मॅडम लगेच तिथे गेल्या आणि ओळख करून घेतली...
कावेरी:हाय मी कावेरी..
पहिली व्यक्ती:हाय मी पल्लवी चर्पे..
दुसरी व्यक्ती:हॅलो मी पल्लवी म्हस्के..
तिसरी व्यक्ती:हाय मी शशी..
अस म्हणत आपल्या ग्रुप सोबत ही ओळख झाली..
आणि बोलता बोलता त्यांची एनजिओ मध्ये ओळख असल्याचं समजलं..ज्याने ह्या मुलांना छान उज्वल भविष्य मिळणार होत..
" चाल मस्त पैकी आपला friendship day तर साजरा झाला... खरंच पल्लवी पल्लवी... तुम्ही दोघी पण खूप छान काम करत आहे... आवडल आपल्याला..." नीता...
" BTW ... तुमचा याच्यानंतर काय प्लॅन आहे.... मिन्स फ्री जर असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता ...? " त्रिवेणी..
" तसं काही स्पेशल प्लॅन नाही आमचा... पण माझी एक मैत्रीण येत आहे... ती आली की आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला जाणार होतो..." पल्लवी.
" होका...मग कुठे आहे ती..." सखी
" डोन्ट नॉ... नेहमीप्रमाणे उशीरच करेल..." पल्लवी.ची
" तू तिला फोन करून बघ ना विचार ना कुठे आहे...? " पल्लवी
" हा..लावते..( ती तिला कॉल करते..) अग किती वेळ इतका उशीर असतो.का...." पल्लवी
" सॉरी यार आलेच मी तुला माहित आहे ना...ट्रॅफिक त्यामुळे थोडासा लेट झाला...पण मी आता आले आहे.. तुम्ही कुठे आहे आहात..? " ती
" हे आम्ही तिथे थांबलो...झाडा जवळ..." पल्लवी
" हां दिसला दिसला थांब मि आलेच..." ती
त्यांच्याजवळ जाते...आणि पल्लवीच्या खांद्यावर हात ठेवून बोलते..
" सॉरी ...थोडा उशीर झाला.. .." ती
" इट्स.." पल्लवी
" हा पण आम्ही सर्वजण कोण आहे...? ती
" मी तुम्हाला माझी ओळख करून देते...आग हे सर्व येड्यांची जत्रा चे मेंबर आहेत.. आणि हि आमची मैत्रीण प्राजक्ता..." पल्लवी
" Hi... कसे आहात सर्व... चला ना आपल्याला उशीर होतोय फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला..." प्राजक्ता.
" हो चला आम्ही येतो... बाय... खरंच खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून.." पल्लवी
" आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून... पण आम्हाला कळू शकेल का तुम्ही कुठे जातंय.." सखी
" आम्ही का...? आता वृंदावन वृद्धाश्रमात जात आहे.. तिथे पण आमचे भरपूर मित्र मैत्रीण आहे... त्यांच्यासोबत फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचं आहे.. सो
आम्ही तिथेच जात आहात सेलिब्रेट करायला.." प्राजक्ता
" काय आहेना... वृंदावन हे आमच्याच एन जिओने तयार केलेला आहे....खूप जण त्यांच्या आई-वडिलांना तिथे सोडून जातात... त्याबद्दल दुःख तर होतं... जेव्हा रक्ताची नाती आपली साथ सोडतात.. तेव्हा मैत्रीची नाती आपल्याला साथ देतात... तसेच काही नाते व्रंदावन माझी यांनी तयार केल आहे.. आमच्या वृंदावन मध्ये एक कुटुंब तयार झाला " पल्लवी 1
" तुम्हाला माहिती वृंदावन मध्ये खूप भारी भारी जण आहेत... खूप मस्त आहेत.... त्या सर्वांची मैत्री तर खूपच झाली... आमची पण त्यांच्यासोबत खूप छान मैत्री झाली... तर अशा मित्रांसोबत... फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायलाच हवा ना..." प्राजक्ता
" तुम्ही वृंदावनबद्दल इतका भरभरून सांगतात.. मलाही तिथे येऊ वाटत आहे.." रितिका
" येऊ वाटत आहे का आमच्या बरोबर... आम्ही तुम्हाला सोबत नाही असं थोडंच बोलणार आहे... चला तुम्ही पण..." पल्लवी
" चला मग वृंदावनला..." सगळे सोबत ओरडतात
आणि येड्यांची जत्रा वृंदावन आश्रम कडे निघते...
मग आपल्या येड्यांच्या जत्रेने हा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलाच पण एक संकल्प ही केला या गोड दिवसाच्या निमित्ताने.
आपली ही गँग कितीही मस्तीखोर असली..तरीही आशा सामाजिक गोष्टींची त्यांना जाण होती..
त्यांनी ठरवलं मदत करायची आणि दर महिन्याला आपल्याकडून आर्थिक मदत ही करायची..आत्ता जे आपल्या ग्रुप मध्ये लहान आहेत,कमवत नाहीत..त्यांनी पॉकेट मनी मधून किंवा साठवून जशी जमेल तशी मदत करायची...
त्यांना एन्जॉय करताना या सामाजिक गोष्टीच भान होत.. आणि त्यांची मैत्री समुद्र ,ओहोटी आणि भरतीसारखी सोबत राहणारी होती..जस कमळ चिखलात उमलत..बाहेर काढलं तरी त्याच ठिकाणी ते शोभून दिसते..अस अनोखा बंध आपल्या ग्रुपच्या मैत्रीचा...
सगळे खूपच इमोशनल झाले होते...तेवढ्यात विनय दादा बोलला.." चलो रे चिल्ली पिल्ली आपण आज मस्त या सगळ्यासोबत आजचा दिवस साजरा करू...आता खाऊन झाल आहे तर मस्त खेळू...या छोट्या छोट्या पिल्लांना आपल्या छान छान गमती जमती सांगू "
सगळ्यांना त्याच बोलण पटलं आणि सगळे एक सुरात हो बोलले...मग काय जिथे येड्याची जत्रा तिथे मस्ती नाही अस होऊच शकत नाही...सगळे जण लहान होऊन त्या लहान मुलांसोबत खेळत होते...हीच ती मैत्री असावी...नात्याला जपणारी...हीच ती मैत्री असावी...न सांगता ओळखणारी...हीच ती मैत्री असावी डोळ्यातलं पाणी न बघवणारी...हीच ती मैत्री...दुसऱ्या हसवणारी..
आज खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मैत्री दिन साजरा केला होता..त्या छोट्या छोट्या पिल्लांना खुश करून..त्यांच्या हसूच कारण बनून...सगळेच खुश झाले...
मग काय कावेरीने सगळ्यांना तिच्या जादूच्या झाडू वरून मुलांना फिरवून आणलं... सगळ्यांनी खूप एन्जॉय केला.
सायंकाळी समुद्रावर फिरायला जायचं ठरवलं होतं... त्यामुळे छोट्या मुलांना गिफ्ट्स देऊन आश्रमातून प्रस्थान केले... आणि वे टू चौपाटी... हु... हु...
फुटबॉल खेळले आणि सगळ्यांनी भरपेट भेळ खाल्ली...
आणि नेहमी प्रमाणे कावेरी समोर हाताचा माईक घेऊन उभी राहिली.
" माझ्या सगळ्या येड्यांनो... मी सांगितलं की असे सगळे एक शब्दावर सगळे जमा होतात त्याबद्दल ... "
नितीन विनय... त्रिवेणी... कीर्ती तिला मारायला कुदनार तोच तिने तिचे शब्द फिरवले...
" त्याबद्दल मी तुमचे अजिबात आभार मानणार नाही ... नालायकानो तुमचं ते आद्य कर्तव्य आहे..."
" ओह गॉड.. आली बाई कावेरी पुन्हा तिच्या जागेवर... मला वाटलं शिकागो सभेत बसतोय आम्ही आता..." संध्या हळूच पुटपुटली.
" तिला तू मोर्मिसिया मध्ये नेऊन सोडलं तरी ती नाय सुधरायची... लागली 500 ची... " नितीन ने हळूच पिल्लू सोडलं...
" माझी पण 500 घ्या... " कीर्ती.
" अय गाढवांनो... बेट नंतर लावा माझ्यावर... इकडे लक्ष द्या आधी..."
सगळे पुन्हा शांत झाले.
" तर बबड्यांनो... आपण आज खूप चांगलं काम केलं की जे आपल्याकडे बघून लोकांना वाटणार नाही की ही लोक पण अशी चांगली काम करू शकता.."
सगळे दात काढून फिदीफिदी हसायला लागले... येड्याच्या जत्रेतले येडेच आहे शेवटी...
" आपल्याला अजून एक काम करायचं आहे..तर ते अस की... चिपळूण ला खूप लोक खूप बेघर झाली... जी गेली त्यांची मुलं अनाथ झाली... पूर परिस्थिती त काय हाल होतात मी जाणून आहे... "
तिच्या डोळ्यांची कड तिने अलगद कुणाला न समजता बोलता बोलता पुसली .
" तर आपल्या कडे इतका पॉकेट मनी नसतो पण कुठून पण पैसे जमतात... आपल्यात काही लोक जॉब करतात... आणि निवडणुकीच्या वेळेत जे मत मागायला येतात... "
" दे ग माय करत..." नितीन मध्येच बोलला.
" हो पण आता आपण त्यांच्या कडे जायचं दे ग माय करत... आणि अगदीच मदत करयला आढेवेढे घेतले तर आपण दुसऱ्या आयडिया ने मदत मिळवायची "
" साम दाम दंड भेद..." संध्या
" दाम तर आपण मागणार आहोत... नाही दिले तर धान्य मागू ... आपल्या परिने जितकं होईल तितकी मदत गरजुना करायची ... "कावेरी.
" आणि त्यांना आपण अमिश दाखवायचं... तुमचं आर्टिकल वगैरे प्रकाशित करु... इंटरव्ह्यू घेऊ... किंवा काहीतरी कार्यक्रम ठेऊ ऑनलाइन जसा आपण नवोदित लेखकांसाठी स्फुट वाचन ठेवतो... " विनय.
तर आजचा कार्यक्रमाची सांगता आपण भेळ खाऊन करु.. पुढील सूत्रे नितु सांभाळेल... "
तसा नितीन गळा खाकरत उभा राहिला...
सगळ्यांनी नो म्हणत एकच कल्ला केला.
" ठीक आहे... मी जास्त काही बोलत नाही...आता संध्या ने सकाळी सांगितल्या प्रमाणे आपण शिप वर जाणार आहोत... "आणि सगळे पायीच मस्ती करत पायाने धुरळा उडवत बंदरावर निघाले...
सगळे गाऊ लागले
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया...
हर फ़िक्र को धुवे मे उडाता चला गया...
आणि सगळे शिपवर एकमेकांचा हात धरून चढले... सगळे खूप हॅपी होते... आणि हातांची जाळी करून सगळे समुद्राच्या दिशेने मुख करून उभे राहिले...
हॅप्पी फ्रेंड शिप डे ....
समाप्त...
