इष्टरुप
इष्टरुप
‼️आद्य गुरु मायबाप
शिक्षकची गुरुवर्य
भविष्यास घडविती
खरेखुरे ब्रम्हचर्य. ‼️१‼️
‼️गुरुशिष्य परंपरा
पौराणिक अभिनव
भारतीय गुरुकुल
हिन्दू राष्ट्राचं वैभव. ‼️२‼️
‼️गुरु माता पिता गुरु
बंधू सखा तोचि एक
पैलू पाडी तेजोमय
गुरु एकटा अनेक. ‼️३‼️
‼️फिरवितो चाकावर
देतो विविध आकार
निर्विकार माती गोळा
करी इप्सित साकार. ‼️४‼️
‼️मुखी तेज विद्वत्तेचे
नेत्रीं बाणेदार भाव
उठणा-या वादळाची
दिशा परिणाम ठाव. ‼️५‼️
‼️गुरु पूजनीय जनी
मनोमनी वंदनीय
खरा समाजाभिमुख
इष्ट अनुकरणीय. ‼️६‼️
‼️कालौघात बदलले
पालटले संदर्भही
शिक्षकांचे स्थान मात्र
अबाधित जगातही. ‼️७‼️
‼️बदलली युगे जशी
आले युग विज्ञान
सुधारणा आमुलाग्र
झाले विश्व सज्ञान. ‼️८‼️
‼️देश घडवावा त्यांनी
कर्तुत्वे,आचरणानी
" शिक्षक दिन " मुहूर्त
निवडावा शिक्षकांनी.‼️९‼️
‼️"धन्यवाद शिक्षक" हो
स्थान तुमचे अढळ
ईश्वराने तुम्हा द्यावी
कळकळ,तळमळ. ‼️१०‼️
