कविता.... मनीचे गुज
कविता.... मनीचे गुज
मनीचे गुज
उबंरठयात साजणी तु उभी राहता अशी
भासे पोर्णिमेची चमचमती चांदणी जशी
शब्द झाले मुके सांग बोलू कसे
अबोल मनी मंजुळ गाणी गुंजती अशी
आसमंत होता इंद्रधनु सोनेरी असा
मोरपंखास का वाटे असुया अशी
सांज उन्हात अशी न्हाऊन काया
लाजे मनी प्रीतीची गोड शिरशिरी अशी.
काळोखातील कवडसा हालता जरासा
चांदनी ही थरथरली अंतरी अशी...