Neelima Deshpande

Inspirational Children

3  

Neelima Deshpande

Inspirational Children

यूनिफॉर्मने दिली रंगांची ओळख!

यूनिफॉर्मने दिली रंगांची ओळख!

1 min
249


बालवर्गातील चिमुकल्यांच्या पालकांना साधनाने पालकसभेत वेगवेगळ्या गणवेशात बोलावले. "वकील असल्याने 'काळाकोट' घालून जिशाची आई, तर 'खाकीवर्दीत' अमेयचे इन्स्पेक्टर बाबा, 'लालशर्ट पँटमधे' एअरहोस्टेसअसलेली स्मिताची मावशी व स्काऊटच्या करड्या रंगाच्या गणवेषात तिचा भाऊ हजर होते. पांढरा नर्सचा युनिफॉर्म घालून राहूलची आई, असे प्रत्येकाकडे त्यांच्या व्यवसायानुसार जो यूनिफॉर्म आहे तो सगळे घालून आल्याने विविध रंगाचे यूनिफॉर्म मुलांना जवळून पाहता आले. 


"ह्या सर्व आपल्या समाजातील विविध क्षेत्रात-व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. यांची आणि यांच्या कामाची ओळख आपण आज करुन घेणार आहोत" असे सांगत एकेका पालकाला साधनाने समोर येवून ती माहिती सांगण्याची विनंती केली. मागच्या आठवड्यात शिकवलेले रंग मुलांना लक्षात आहेत का? हे तिने मुलांना युनिफॉर्मचा रंग विचारत चेक केले. प्रोफेशन, रंग, मित्रांच्या पालकांची ओळख करुन देणे अशा अनेक गोष्टी एकाच

वेळी साध्य झाल्या.


लहान मुलांना शिकवताना थोडी कलात्मकता वापरली तरी शालेय शिक्षणात बदल घडून येतील व शिकणे व शिकवणे सोपे होईल हे तिने दाखवून दिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational