SURYAKANT MAJALKAR

Romance

0.2  

SURYAKANT MAJALKAR

Romance

ये प्यारभरा दिल...

ये प्यारभरा दिल...

3 mins
3.4K


प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी प्रेमात पडतो. ते वयचं तसं असत.प्रत्येकाला आवडणारी मुलगी राजकुमारी वाटत असते. आणि प्रत्येकीला आवडणारा मुलगा राजकुमार वाटत असतो. हल्लीच्या भाषेत हिरो-हिरोईन वाटत असतात. काहीजण त्याला क्षणिक आकर्षण म्हणतात, तर कोणी त्याला खरं प्रेम म्हणतात. खूप थ्रिल आणि एक्सईटमेन्ट असत. समोरच्यावर इम्प्रेशन मारण्यात आपली बुद्धी आपण खर्च करतो. बऱ्याचवंशी निर्बुद्धपणे आपण प्रेम करतो. प्रेमाच्या व्याख्येत मला पडायचे नाही. प्रत्येकजण प्रेमाची भाषा आपल्या दृष्टिकोनातून मांडत असतो. ते प्रेम, त्या आठवणी अलुवारपणे आपल्या मनात रुंजी घालत असतात. ती प्रकरण आपण एकतर कुठेतरी लिहुन ठेवतो किंवा जिवलग मित्राशी share करतो. खूप छान वाटत त्यावेळी. अश्याच काही आठवणी मी आज सांगणार आहे.

आम्ही तेव्हा लहान होतो. नुकतेच बालपणातून पौगंडावस्थेत प्रवेश करत होतो. आठवीत होतो मी. माझा मित्र आणि मी रोज तिच्या पाळतीवर असायचो. ती बहुतेक सातवीत असावी. तिची शाळा सकाळची आणि आमची दुपारची. वेळेची सांगड घालण्यासाठी थोडं लवकरच घरातून निघायचो. गोरी गोमटी, काळ्याभोर डोळ्यांची, लांबसडक केसांची प्रिया मला खूप आवडायची. पण तिने कधी ढुंकूनही पाहिलं नाही. एकदा पाहिलं होत , पण ते रागाने. ती चांगली मुलगी होती. म्हणून सरळ यायची. सरळ जायची. कधीतरी मैत्रीण सोबत असायची. एकेदिवशी ठरवलं की हिला प्रपोज मारायचा. सांगितलंना आम्ही सेटिंग लावून होतो. ती काहीतरी कामाने आमच्या जवळच्या रस्त्यावरून जात होती. आम्ही पाठलाग केला. थोड्या दूरवर तिला गाठलं.आम्ही मागून येतोय हे तिला बहुतेक समजलं होत. तिने मागे न वळताच ' आला तसाच निघून जा ' असं सांगितलं. आम्ही घाबरलो आणि पळ काढला. आजच्या मुलांसारखी डेरिंग नव्हती माझ्याकडे. झालं. त्यानंतर नुसतंच बघण्यापलीकडे काही करता आलं नाही. पहिलं प्रेमप्रकरण इथेच संपलं. एकतर्फी प्रेम. प्रेम कसलं हे माहित नसलेल्या वयातलं प्रेम.

शाळेतही आपल्याला कोणी न कोणी आवडत असत. मलाही बऱ्याच मुली आवडायच्या. त्यात अलका खूप आवडायची. आपल्या वयापेक्षा ती बरीच प्रौढ दिसत होती. आताच्या सोनाक्षी सिन्हा सारखी म्हणाना. हिरोईन वाटायची. रोज शाळेच्या मधल्या सुट्टीत तीच दर्शन व्हायचं. पण कधी विचारलं नाही. शाळेत होतो ना. आणि त्यात sincere विध्यार्थी. अचानक नवीतून गायब झाली. पुढे अत्यंत वाईट झालं तीच. ती डिव्होर्सी झाली. ती चेहऱ्यावरची लकाकी कुठे हरवली कोण जाणे.

कॉलेजमध्ये तर विचारू नका. मी काही प्रेमवेडा पंछी नव्हतो. तरुण झालो होतो आणि कुठली मुलगी या वयात आपल्याला आवडली नाही तर. काय उपयोग त्या कॉलेज लाईफचा. बारीक अंगकाठीची,एक कोवळी काकडी मला खूप आवडली होती. लेक्चर्स चालू असताना मध्ये मध्ये बघण्यात मजा काही औरच होती. माझा ग्रुपमधून मला प्रपोज करण्यासाठी फोर्स होत होता. पण मी 'रोज डेला प्रपोज करायचे ठरवले.कॉलेज डेचा वीक चालू होता. आणि तो दिवस उजाडला. वेगवेगळे परफॉर्मन्स झाले. आशुतोष स्टेजवर आला. आणि त्याने 'जिवाशिवाची बैल जोडी ' हे गाणं इतकं सुंदर गायलं कि सर्वजण ' वन्स मोर' बोलू लागले. तो गाणं गात स्टेजवरून खाली आला. त्याने ऋतिकाला हात पुढे केला आणि स्टईलमध्ये गुलाबांचा गुच्छ पुढे केला, तिनेही हात पुढे केला. आणि माझा पत्ता कट झाला.

कॉलेजच्या दुसऱ्यावर्षी म्हणजे SYJC ला मराठीच्या प्रोफेसर मॅडमनी मला 'मराठी वाङ्मय मंडळाचा ' अध्यक्ष केलं. माझी वट वाढली. आणि एक मुलगी मला पटली गोरी गोमटी प्रमोदिनी माझ्यावर फिदा झाली होती. अश्याच एका दिवशी लेक्चर बंक करून मी आणि माझा ग्रुप बाहेर थांबलो होतो. तेवढ्यात ती समोरून आली. तेव्हा जरी मी अध्यक्ष होतो. तरी खूप साधा राहायचो. खरं सांगतो. तिने चाल फिरायला जाऊया असे म्हटले. पण जाणार कसा ? हाय राम ! माझी चप्पलच तुटली.आणि छोकरीही सुटली. फिरायला न गेल्यामुळे ती परत कधी माझ्याकडे फिरकली नाही.

हि माझ्या दुर्दैवी प्रेमप्रकरण. त्याला मी प्रेमभंग वैगरे फालतू नाव देणार नाही. त्या खुपश्या छान आणि थोड्याश्या दुःखद आठवणी होत्या.

त्यानंतर मी प्रेम नावाच्या वाटेला गेलो नाही. आपलं कवितेतून आणि कथेतूनच व्यक्त करीत राहिलो.

पण अजूनही कोणावरतरी प्रेम करायची खुमखुमी आहेच. ये प्यारभरा दिल किसे पेश करू.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance