STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Fantasy Inspirational

3  

SURYAKANT MAJALKAR

Fantasy Inspirational

ती

ती

1 min
8

प्रस्तावना

ती'च का? 'तो' का नाही. तो तुझ्या कथेचा विषय होऊ शकत नाही. प्रत्येक दुरचित्रवाहिन्यावरील मालिकांप्रमाणे तुलाही ती केंद्रस्थानी हवी. तिच्या भोवतीने विचारांच्या मुंग्या फिरायला हव्यात.
तिच्या वेदना खोलवर रुततात आणि भळाभळा वाहू लागतात. खरं म्हणजे हे कण्हन विचित्र विखारी आनंद देते आणि आतल्या राक्षसाला सुखावते. भावनांचा बाजार, स्री सन्मान वाचण्यापुरत ठिक आहे पण स्रीची तिची समस्या ही समाजपुरुषाची उणी बाजू दर्शवते. 
माझ्या पाहण्या, वाचण्यात अशा स्रिया आहेत, ज्या फिनिक्स पक्षाप्रमाणे सामाजिक बधने झुगारत आकाशी झेपावल्या आहेत. सर्वसामान्य असल्यातरी कर्तुत्वाने खुप मोठ्या आहेत. तुम्हाला आपल्या वाटतील अशा आहेत.
तुम्ही का लिहीता तिच्याबद्दल तर माझ्याकडे उत्तर नाही.
मनात घर केलेल्या 'ती'च्या कथा तुमच्यापर्यंत पोहचवायच्या आहेत. तुमच्या मदतीने नव्हे मार्गदर्शनाने.
मग द्याल ना साथ?
©सुर्यांश


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Fantasy