Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

SURYAKANT MAJALKAR

Others


2  

SURYAKANT MAJALKAR

Others


प्रेरक आई, शिक्षक, storymirror

प्रेरक आई, शिक्षक, storymirror

1 min 758 1 min 758

लहानपणी घरी चांदोबा मासिक यायचे. विविध आध्यात्मिक आणि उद्बोधक कथांनी वाचनाची आवड लागली.'सकाळ' नावाचे वर्तमानपत्र घरी यायचे. तेही वाचले जायचे. छोट्या छोट्या गोष्टी, बोधकथा, संपादकीय वाचले जायचे. यातूनच पुढे शब्द रुंजी घालू लागले. माझी पहिली लिहीलेली कविता अजूनही आठवते.

स्वप्नात दिसली गाय,

तिच माझी माय,

मी तिला नमस्कार

करतो हाय (आहे)

अशीच सुचली. लिहीली. १९९० साली. अजुन लक्षात राहिली आहे.

मराठी विषयांत गोडी निर्माण होण्यासाठी आईबरोबरच मराठी विषयाच्या शिक्षकाही प्रेरक ठरल्या. विषयाचा अभ्यासक्रम संपविण्याच्या मागे शिक्षक जरी असले, तरी मराठीचा विषय रुची ते अभिरुची हा प्रवास आमच्या 'श्री. एन.डी. भुता हायस्कूल' च्या सांगलेबाई, नाटेकरबाई यांच्यामुळे शक्य झाला. पुढे शाळेचे वाचनालय, काॅलेजच्या मतकरी मॅडम , वर्गमित्र, काॅलेजचा ग्रुप सगळेच नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले.

समाजमाध्यमावर प्रामाणिकपणे मी 'story mirror'चा उल्लेख करीन. स्पर्धेतील नावीण्यता आणि प्रेरकता, वाचकांचा प्रतिसाद लेखनातील हुरुप वाढवीत आहे.


मी नेहमी आपल्या परिवाराचा कृृृतज्ञ राहीन.

धन्यवाद.Rate this content
Log in