SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

एक जाम..राजूके नाम .

एक जाम..राजूके नाम .

4 mins
2.5K


अजूनही राजूची आठवण स्मृतीपटलावर कायम आहे. पंधराएक वर्षांपूर्वी राजू मला एका डिस्ट्रिब्युशन कंपनीमध्ये भेटला होता. तेव्हा तो ३२ वर्षाचा असावा. शाहरुख खान सारखी केशभूषा, टिळकांसारखी झुबकेदार मिशी आणि जाडसर चष्मा. नेहमी हसतमुख असायचा. पण त्या हसण्यामागे लपलेली खिन्नता कधीतरी जाणवायची. मी, दत्ता असे आम्ही तिघेजण त्या liquor च्या कंपनीत अकाउंट डिपार्टमेंट सांभाळत होतो. रोजच कंपनी सेल्समेनची भेट व्हायची. मजा, मस्करी, नॉन-व्हेज जोकमध्ये दिवस झर्रकन निघून जायचा. काम कितीही असलं तरी ताण जाणवायचा नाही.कंपनीचे तीन पार्टनर होते. दत्ता अकाउंट हेड असल्याने कधी कामाची व्यक्तीगत जबाबदारी घ्यावी लागली नाही. दत्ताचं सगळं सांभाळून घ्यायचा. कंपनीचे मॅनेजर तरी जॉली होते. सेल्समेनही चाळीशीच्या घरात असल्याने खूप धम्माल व्हायची. राजुही सहभागी व्हायचा. मी नवीन असल्याने तो मला सांभाळून घ्यायचा.

राजूचे आणि माझं ट्युनिंग छान जमलं होत. तो बऱ्याच गोष्टी माझ्याशी share करायचा. राजू married होता. पांच वर्ष झाली लग्नाला पण अजूनही मुलबाळ नव्हतं. राजू जसा हसतमुख होता, तसं रागावला कि प्रचंड लालेलाल व्हायचा. त्यातच तो गोरा असल्याने अधिक जाणवायचं. त्याच दुःख, त्याच्या समस्या त्यावेळी उफाळून यायच्या. हळूहळू त्याच मानसिक संतुलन बिघडू लागलं होत. कामामध्ये ते जाणवायचं.

हल्ली राजुच्या कपाळावर मोठा लांबलचक टिळा दिसला.मी त्याला विचारलं. पण त्याने त्यावेळी उत्तर दिल नाही. त्या आठवड्यात राजुने सलग दोन-तीन दांड्या मारल्या. तो आला तो थेट शनिवारी. मी त्याला विचारलं. तो कुठल्यातरी शिबिराला गेला होता. अध्यात्मिक शिबीर असावं. राजुच्या तुटफूटक बोलण्यातून ते जाणवत होत. तो आला त्या दिवशी खूप थकल्यासारखा दिसत होता. कदाचित प्रवासाचा त्रास असावा. शनिवार असल्याने आम्ही सर्व एका बारमध्ये बसलो. राजू त्या दिवशी जरा जास्तच प्यायला. नीट चालायलादेखील त्याला जमत नव्हते. दत्ताने त्याला घरी पोचवले.

राजूचे हे वागणं आकलनपलीकडे होत. का राजू असं वागत होता, काही कळायला मार्ग नव्हता. समस्यातर सर्वानाच असतात. राजुच्या समस्या मात्र आता अधिक तीव्रतेने जाणवत होत्या. त्याच्या चेहरा निस्तेज पडू लागला होता.

त्या दिवशी राजू आला नव्हता. बॉसही काही बोलत नव्हते. लंच टाईममध्ये दत्ताने कधी नव्हे तो राजुचा विषय काढला. राजुचा वागणं आजकाल जरा जास्तच आक्रस्ताळी होत चाललं होत. आदल्या रात्री राजुने घरातला टीव्ही फोडला. घरातला सामानाची नासधूस केली. ओरडाओरड केली. त्यात बायकोला त्याने मारझोडही केली. शेवटी थकून रडून एका कोपऱ्यात तो झोपी गेला. सांगताना दत्ताचे डोळे पाणावले होते.

टेन्शनवर कोणताही रामबाण उपाय नाही.डोकं शांत ठेऊनच जीवन जगायला लागत. मेडिटेशनसारखे प्रकार राजुच्या उपयोगाचे नव्हते. दोन दिवसाने राजू ऑफिसला आला. आम्ही कोणीही विषय काढला नाही. राजुही शांतपणे काम करत होता. जसकाही झालंच नाही.

वर्षअखेर आली. ३१ डिसेंबरच प्लांनिंग करायचं होत. जवळचे सर्व बार पालथे घालून झाले होते. कंपनीचे सप्लाय होत असल्याने आम्हाला खान-पिणं फ्री असायचं. यावेळेला कुठेतरी लांब पार्टी करायचं ठरलं. पण जागा निश्चित होत नव्हती. शेवटी राजूनेच त्याच्या घरी अंबरनाथला पार्टी करायचं ठरलं. अनलिमिटेड नॉन-व्हेज, ड्रिंक आणि धम्माल. सर्व खर्च राजुचा. मला थोडं आश्चर्यच वाटलं. ठरलं, ३१ फर्स्ट राजुच्या घरी.

३१ फार्स्टच्या दिवशी आम्ही दुपारीच राजुच्या घरी पोहचलो. थोडा चहा नास्ता झाला. थोड्या दूरवर तिघेही फिरायला गेलो. तिथेच तीनचार सिगरेटची पाकीट संपली. राजू भडाभडा बोलत होता. प्रचंड ताण घेतला होता त्याने. मध्येच हसत होता, मध्येच डोळे ओले करत होता. घरातही वातावरण दूषित झालं होत. बायकोच्या वागण्यातही बदल दिसत होता. डॉक्टरी तपासणीत दोष राजुत आहे हे निष्पन्न झालं. त्यात तीच प्रकरण राजुला कळलं होत. त्यामुळे तो त्रस्त झाला होता. खरं काय, खोटं काय. राजुवर विश्वास ठेवण्यापलीकडे पर्याय नव्हता. सध्यातरी त्याच्याच बोलण्यावर विश्वास ठेवावा लागणार होता.

त्या रात्री पार्टीला उशिराच सुरुवात झाली. सिगरेटची दहाएक पाकीट संपली असतील. अचानक लाईट गेल्याने कोण किती प्यायलं, ते कळच नाही. मी बियर पिणारा. पण त्यातही अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी व्हिस्की मिक्स केली. डोकं जड झालं होत. अलिखित नियमाप्रमाणे फर्स्ट जानेवारीला सुट्टी होती. दुपारच्या दरम्यान आम्ही निघालो. राजू अजून झोपलाच होता. त्याला उठवले नाही.

संपूर्ण फेब्रुवारी महिना मी त्या कंपनीत काम केले. दुसरीकडे चांगला जॉब लागला. दुःखी अंतः करणाने बाय केले, कारण या सर्व मस्त कंपनीला, पार्टीला मी मुकणार होतो. न जाणो तिकडे कसे सहकारी मिळतील.

जाताना दत्ताला भेटायचं प्रॉमिस केलं होत. पण वर्षभर भेट झालीच नाही. त्यानंतर एकदा त्याला फोन केला तेव्हा तो घरीच होता. काही खास कारण नव्हतं. नालासोपाऱ्याच्या त्याच्या घरी खूप गप्पा मारल्या. छानपैकी जेवण झालं. अर्थातच राजुचा विषय निघाला. आणि वाईट वाटलं. त्याचवर्षी मे मध्ये त्याने आत्महत्या केली होती. बॉडी सुद्धा ओळखता येत नव्हती. त्याच्या LIQUOR LICENCE वरून आणि रेल्वे पासावरून ओळख पटली. माझा मोबाईल नंबर बदल्याने मला कळले नव्हते.

मृत्यूपूर्वी एक दिवस अगोदर त्याने सर्वांशी प्रेमाने गप्पा मारल्या. रात्री शांतपाणी झोपी गेला.

राजू राहिला नव्हता.पण त्याच्या बरोबर घालवलेले क्षण अजूनही आठवतात. देवाने दिलेले आयुष्य लोक असं का संपवतात.पर्यायी मार्गांचा कोणी विचार करत का ? सल्लागार खूप भेटतात. त्या बहुतांशी MISGUIDE करणारेच असतात. वेळीच स्वतःला आवरले नाही कि मनोधेर्य खचत. आणि आयुष्याची राख होते. आपलं कुणीच नसत. आपणच सुखाच्या मागे धावत असतो. काही बाबतीत खूप POSSESSIVE होतो.

मी दत्ताला भेटून निघालो. पण राजू काही मनातून गेला नाही. उलट मनाच्या एका कोपरात तो घट्ट रुतून बसला आहे. कायमचा. एक जाम दार ३१ फर्स्ट प्रेमाने या वेळीही राजूसाठी बाजूला भरून ठेवला आहे.


Rate this content
Log in