STORYMIRROR

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

2  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

व्यथा वडराजाची..!

व्यथा वडराजाची..!

2 mins
115

कालपासून सगळ्यांच्या स्टेटस वर झळकणारा मीच तो वड बरं का....झाली एकदाची वटसावित्री पौर्णिमा ! खरंच या दिवशी आपण खूप स्पेशल असल्याचा फील मला नेहेमीच येतो.मागच्या वर्षी करोना मुळे जास्त कोणीच आलं नव्हतं पूजेला पण मी सगळयां बायकांच्या मागच्याच वर्षीच्या प्रार्थना पोहचवल्या बरं का...! म्हणजे ' जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे आणि त्याला चागलं आयुष्य मिळू दे असा...'( प्रत्येकीचा प्रत्येकीला )


तर एरवी माझ्या सावलीत फक्त खेडेगावात लोक बसतात...पार बांधलेला असेल तर तिथे लोकांची मस्त मैफिल जमलेली असते आणि फार फार तर रस्त्याच्या कडेला माझं एखादं भावंडं असेल तर लोक तिथे फोटो वगेरे काढतात...आणि एखादं आमचं पूर्वज असेल खूप जुनं तर त्याचेही फोटो पब्लिश होतायत कधीकधी...पण माझं खरं महत्त्व पटत ते फक्त ' वटपौर्णिमेलाच ' आणि आजकाल तर फोटोसेशन सुद्धा अगदी जोरात होतं...


नटून थटून येणाऱ्या बायका एका हातात पूजेचं ताट घेऊन येतात, आपल्या मैत्रिणी भेटल्या की त्यांच्या गळ्यात पडतात.. साडी , दागिने , हेयर स्टाईल , सोज्वळता असे अनेक कॉमप्लीमेंट यांची देवाण घेवाण होते आणि मग पूजेला सुरुवात...अगदी साग्रसंगीत पूजा होते...हळदी कुंकू , विड्याची पानं , अगरबत्ती , दिवे , अक्षदा , फुलं , आंबे , गहू , तांदूळ , नैवेद्य या सगळ्यांनी माझं अस्तित्वच बदलून जातं...मग मस्तपैकी आरती होते आणि मग त्या दोऱ्याच्या विळख्यात मी बंदिस्त होतो...आगदी सगळे सोपस्कार व्यवस्थित पूर्ण झाले की स्त्रिया एकमेकींच्या ओट्या भरतात.आंबे गहू किंवा तांदूळ अगदी भरपूर प्रमाणात इकडून तिकडे फिरत असतो...त्या आशेने आलेले गरीब मुलं , बायका यांना हुसकावून लावले जाते.


मस्तपैकी फोटोसेशन होते आणि मग सगळे आपल्या घरी जाऊन ते फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करून लाईक आणि कॉमेंट ची वाट बघत दिवस आनंदात घालवतात... काही जणी माझ्या फांद्या तोडून मला ओरबडतात तेव्हा खूप त्रास होतो.आजकाल बऱ्याच ठिकाणी माझं झाड घरीच लावून त्याचीच पूजा करतात त्याचाही आनंद आहे.ज्यांना शक्य नसेल ते अगदी माझा फोटो किंवा रांगोळी काढून त्याचीही पूजा करतात पण आम्हा ' वडा ' ला पर्याय नाहीच...आहोतच आम्ही बहुगुणी ! वटपौर्णिमा वृक्षारोपण करून साजरा करण्याचा प्रगाध ज्यांनी पाडला त्यांचे खरंच खूप खूप आभार !

आता वर्षभर आम्ही दुर्लक्षित राहणार...एक सांगू का दररोज नाही पण अधून मधून तरी माझ्याजवळ येत चला... माझ्या गुणांचा लाभ घ्या आणि निरोगी व्हा.


पुढच्या वेळी त्या गरीब बिचाऱ्या जीवाना प्रत्येकीने जमतील तितके आंबे आणि धान्य दया आणि त्यांनाही याचा आनंद मिळू द्या... तुम्ही सगळ्या जेव्हा पूजेला येता ना तेव्हा मी खूपच आनंदी आणि प्रफुल्लित असतो...फुलांचे , उदबत्तीचे ,आंब्यांचे , नैवेद्याचे सुंदर सुवास अगदी दरवळत असतात ....पण पण दुसऱ्या दिवशी मात्र मी त्या बदललेल्या वासानी हैराण होतो.तुम्ही केलेला कचरा सगळा अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत आणि मी गुदमरलेल्या अवस्थेत निमूटपणे सहन करत असतो.... परंपरा आणि प्रथा नक्कीच जपा पण त्या बरोबर पर्यावरणाचा सुद्धा विचार करा. पुढच्या वर्षी नक्कीच माझी ही व्यथा कमी करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल अशी आशा करतो...

( लेख लिहिताना कोणाला दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही...)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational