व्यक्ती स्वातंत्र्य (लघुकथा)
व्यक्ती स्वातंत्र्य (लघुकथा)
आरशात स्वतःला न्याहाळत नेहा विचारते
"आई कशी दिसतेय मी?"
छानच पण मला सांग तु जिन्स आणि हे स्लीवलेस टॉप घालुन लग्नाच्या खरेदीसाठी येणार आहेस
का? हो..
पण तुझी सासरची माणसं काय म्हणतील?
लग्नाच्या आधी सर्व काही चालतं बाळा..पण लग्नानंतर तुला त्यांचा मान ठेवावा लागेल.
"आई तुच म्हणायची ना?? व्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा हक्क आहे..पण लग्न ठरताच आपल्याच आया मुलीला त्यांच्या मनासारखे कपडे परिधान करण्याआधी सासरच्या मंडळींची संमती पडताळुन पाहण्यासाठी का सांगतात?"
अगदी बरोबर तेवढ्यात नेहाची होणारी सासु दरवाज्यातुन आत येत बोलते "आपण आपल्या मुलींना स्वावलंबी बनवतो, त्यांच्या स्वप्नांना पंख देतो.पण लग्न ठरताच त्यांचे हे स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा प्रयत्न करतो..जे एकदम चुकीचे आहे."
