Neelima Deshpande

Inspirational Children

2  

Neelima Deshpande

Inspirational Children

वऱ्हाडकार देशपांडे

वऱ्हाडकार देशपांडे

1 min
119


"या वर्षी तीळगूळ घ्यायला आपण थोडेसे दूर, म्हणजे हेडगेवार हॉस्पिटलपर्यंत गेलो तर चालेल का तुला? आपल्या भुगोलाच्या मॅडम व वऱ्हाडकार श्री. लक्ष्मण देशपांडे सर हे नवरा बायको आहेत. किती मज्जा येईल ना जर मॅडमसोबत आज. त्यांचीही भेट घरी झाली तर! मला खूप इच्छा आहे त्यांना एकदा तरी प्रत्यक्ष बघण्याची... खूप प्रसिद्ध आहेत ना ते... भेटतील का गं आपल्याला?"


"हो, जावूत ना त्यात काय. मलाही आवडेल त्यांना परत भेटता आले तर. माझी एकदा भेट झालीय त्यांच्याशी त्यांच्या 'वऱ्हाड निघालय लंडनला' या नाटकाची जेव्हा गिनिज बुक ऑफ़ वल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती, त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता आपल्या शाळेच्या म्हणजे सरस्वती भुवन संस्थेकडून. त्या एकपात्री नाटकाचा प्रयोगही पाहिला आहे मी. प्रयोग संपल्यावर आम्ही सारे मग आवर्जून त्यांना बॅकस्टेजला जावून भेटलो होतो. खूप थोर कलाकार आहेत ते ! 


केवळ साडीच्या एका ओढणीसारख्या कपड्याचा प्रॉपर्टी म्हणून उपयोग करत. कितीतरी पात्र ते केवळ वेगवेगळ्या आवाजाने उभी करत. माणसांच्या स्वभावाचे कितीतरी पैलू आणि चालण्या-बोलण्याच्या लकबी त्यांनी इतक्या बारकाईने रंगवल्या आहेत की ती पात्रं आपल्या मनात सतत रेंगाळतात. एका कलाकृतीलादेखील खूप मनापासून घडवले, मेहनत घेऊन त्यात अधिक पारंगत होता आले आणि चिकाटीने ध्येयावर नजर ठेवून प्रयत्न केले तर माणूस जगप्रसिद्ध होऊ शकतो हे त्यांनी आपल्याला दाखवून प्रेरित केले आहे. चल भेटूच आज परत, असे म्हणत दोघी मैत्रिणी निघाल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational