Meenakshi Kilawat

Tragedy

4.5  

Meenakshi Kilawat

Tragedy

वृक्षांचा श्राप

वृक्षांचा श्राप

2 mins
1.4K


   हमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीवर कश्याला आलास धरनीवर भार व्हायला जंगले तोडली वसवले घरे, अंगनामध्ये कचरा होतो म्हणुन मोठीमोठी झाडे तोडली, आता स्लैपची घर गरम होतात म्हणुन थंड हवेच्या ठिकाणावर जावून सुट्ट्या घालतात,सर्व पैसेवाल्यांची खेळी आहे.आम्ही गरीब लोकांनी कुठे जायचे सांगा.      

 म्हणुन मी विचार केलाय की आपल्या घरा भोवतालच्या थोड्या जागेवरच बाग फुलवायची,मी वेडावल्यागत वृक्ष लावायला सुरवात केली. तिथे कडू लिंबाचे झाडे लावली. सोबत अशोका,डांळींब,निंबू,अंजीर,चाफा,जाई जुई चमेली कृष्णकमळ,मधुमालती,मोगरा त्या छोट्या जागेत सुंदर मोहक बाग फुलवला,वृक्ष कशी सुंदर हिरवीकंच डेरेदार झाली होती.मध्ये मध्ये वाल, कारली, चावळी, अळू,इत्यादि छोटी मोठी वृक्ष लावली,माझी बाग कशी डोलायला हसायला लागली.बादाम वृक्षाचे मोठाली पाने मनाला मोहून टाकायची आणि छान बदामा निघायला लागल्या होत्या,शेवग्याचे झाड, सोबत पेरूचे झाड लावले होते.छान गोड पेरु खायला मीळत होते.त्या परिसरात एकही बाग नव्हता,माझी बाग एका टापूसारखी दिसायची,ती फुललेली हिरविगार बाग माझा जीव की प्राण होवून बसली,त्या बागेला मी खुप मेहनतिने आपल्या बाळाप्रमाणे वागविले,मला तीचा ध्यास लळा लागला होता ,माझा पुर्ण वेळ बागेतच जायचा. थोड्या पाण्यात म्हणजेच ,घरची भांडी धुतलेले पाणी,कपडे धुतलेले विना साबनिचे पाणी,दाळ तादुंळ  

धुतलेले पाणी,सर्व पाणी जमा करून मी वृक्षाचे पोषण केले,पाल्यापाचोळ्याचे खत तयार करून त्यात शेणखताचा आहार द्यायची,द्रिष्ट लागन्यासारखी माझी हिरविगार बाग तयार झाली,कित्येक महिने वर्ष त्यात राबून मी माझ्या मुलासारखे त्यांना वाढविले.पण काय झाले ना,शेजारच्या लोकांना त्रास व्हायला लागला.म्हणे यांच्या झाडांचा कचरा आमच्या घरी येतो, कचरा निरसन व्यवस्थित वेगळ्या एका खड्डात केला होता,पण वारा अाला की ,सुकलेली पाने उड़ुन इकडे तिकडे जायची, शेजारच्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा,त्यांना कंबर वाकुवून झाड़ावे लागायचे.मग काय रोजची कुरबूर सुरू झाली ,पण एवढी फुललेली हिरविगार त्या बागेची मी अंतकरणाने जीव लावून त्याची जपनुक केली होती,ती बाग मोडन्याचे धैर्य माझ्यात नव्हते, लोकांना त्रास व्हायचा पण माझा काहिच इलाज चालत नव्हता, भांडने विकोपाला गेलीत.

    आणि एक दिवस मी झाड तोडन्याची परवानगी दिली.झाड तोडनाऱ्यांना बोलवून माझ्या समोर एक एक झाड तोडले.एकेक फांदी धराशाही पडली.माझे अश्रृ काही थांबेना माझ्या घरी मरणकळा पसरली होती.तेव्हा तीच भांडनारी लोक माझे सांत्वन करायला आली.कित्येक दिवसरात्र मी रडून काढले होते.माझ्या मनी स्वप्नी ती हिरवीगार वृक्ष दिसत होती.ती आजही मला सारखी दिसते,व म्हणते,आमचा काय दोष होता. आमचा काय दोष होता.का आम्हाला मारलय,आम्ही सतत तुमचे भले करतोय आणि तुम्ही आमच्या जिवावर उठले.तुम्हास त्याची फळ याच जन्मात भोगावी लागेल.तुम्ही थेंब थेंब पाण्यासाठी मोहताज व्हाल,हा आम्हा वृक्षांचा श्राप आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy