Anuja Dhariya-Sheth

Fantasy Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Fantasy Inspirational

वर्दीमधील देव...

वर्दीमधील देव...

1 min
261


सुधाताई खूप उदास होत्या, लॉकडाउन आल्यापासून प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवत होता.. पण, यांची दोन्ही मुले त्यांच्या जबाबदारी पार पाडण्यात व्यस्त होते. घरात हे दोघेच.. त्यांना खूप काळजी वाटत होती... एक पोलिस ऑफिसर आणि एक डॉक्टर... दोघेही तहान-भुक विसरून या परिस्थितीशी लढत होते... आज रंगपंचमी.. मुलांना आवडते म्हणून पुरणपोळी करायच्या त्या नेहमीच.. मुलाना रंग खेळायला खूप आवडायचं.. लहान असल्यापासुनच मस्त धमाल करायचे तें सर्व... एकत्र खेळायचे.. त्यांना जुन्या आठवणी आठवत होत्या.. त्यांचे डोळे भरून आले.. 


सुरेशराव त्यांची समजूत घालायचे.. अगं रडू नको.. आपली दोन्ही मुले देशसेवा करतायत... तू कशाला वाईट विचार करतेस? पण आईचं मन ते... त्यांना खूप भीती वाटायची.. मागच्या वर्षी पासून ह्या कोरोनामुळे आपली मुले आपल्या वाट्याला येतच नाही आहेत.. माझ्या मुलांना काही झाले तर?? आपल्या आयुष्याचा रंगच उडून जाईल... त्या रडवेल्या व्हायच्या...


तेवढ्यात टीव्हीवर बातम्यांमध्ये त्या ऐकतात, सामान्य माणसांच्या आयुष्यात सप्तरंगाची उधळण व्हावी म्हणून स्वतः पांढऱ्या आणि खाकी रंगात रंगून, आपली तहान-भूक विसरून देशसेवेची चोख जबाबदारी बजावणार्या ह्या वर्दीमधल्या देवांना सहकार्य करा... हे ऐकताच त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy