Sanjeev Bhide

Abstract Others

3.2  

Sanjeev Bhide

Abstract Others

विस्मृती

विस्मृती

10 mins
1.3K


बराच वेळ तिथे उभी होती, तिच्या लक्षातच येत नव्हतं, किती तरी वेळ ती कशा करता तिथे उभी आहे तिला काही सुचत नव्हतं आणि आठवत ही नव्हतं.

वाहणार रस्ता, धावती गर्दी, तिला काहीच सुचत नव्हतं ..! आपण कशासाठी इथे उभ्या आहोत हे ही तिला समजत नव्हतं, तिला स्वतःचं नावही आठवत नव्हतं, घरचा पत्ता तर फार दूर ची गोष्ट होती.

तिने एकदा स्वतःच्या हाताकडे बघितलं हातात फोनची रिंग वाजत होती फोनवरती "आशिष" असं कॉलर नेम आल होत. पण तिला हेच आठवत नव्हतं की हा "आशिष", आहे तरी कोण तिने एकदा सगळीकडे बघितलं तिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतंच, जो तो आपल्या गडबडीमध्ये होतं. 

तिला आपण नक्की स्टेशन वर कशाकरता आलो आहोत हेच समजत नव्हतं, गोंधळ झालेला होता, खूप आठवण्याचा प्रयत्न करून बघितला पण काहीही आठवत नव्हतं. रेल्वे स्टेशन च्या बाहेर एका चहाच्या टपरी जवळ ती उभी होती दुसऱ्या हातात चहाचा ग्लास होता, तो रिकामा होता. अचानक टपरीवाला तिच्याकडे आला आणि म्हणाला, 

"मॅडम चहा पिऊन किती वेळ झाला. . .", ग्लास परत द्या ना", तिने ग्लास टपरीवाल्या च्या हातात दिला. 

"पैसे. . .?". 

ती मख्ख पणे डोकं चालत नसल्या सारखे त्याच्या तोंडाकडे बघत होती 

"मॅडम चहा चे पैसे. ..पैसे.."

टपरी वाला दोन-तीन वेळेला म्हणाला नंतर तिच्याकडे विचित्र नजरेने बघत परत त्याच्या कामाला लागला कारण टपरीवर ती गिराहीकांची गर्दी होतीच. ऊन तापायला लागलेलं होतं, डोक्यात कसेतरी होत होत. अचानक तिच्या सगळ्या अंगा वरून एक सरसरुन काटा आला आणि एकदम एकदम ती भानावरती आली तिने घड्याळांमध्ये बघितलं तेव्हा अकरा वाजले होते याचा अर्थ पंचवटी एक्स्प्रेस केव्हाच निघून गेलेली होती, आता मुंबईला जाऊन उपयोग नव्हता. 

पंचवटी एक्सप्रेस पकडण्या करिता तीस सात वाजताच नासिक रोड स्टेशन वरती आली होती, गारठा असल्यामुळे चहा पिऊन स्टेशनवरची जायचं ठरवलं, चहा पिऊन झाला आणि मग पुढचं तिला काहीच आठवत नव्हतं. तिने पर्स मधून पैसे काढले व टपरी वाल्याला दिले. टपरीवाला तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होता. तशीच ती घरी परत फिरली. ऑफिस मध्ये तिने तब्येत बरी नाही म्हणून फोन करून टाकला होता तिला घरी परत आलेल बघून तिचे आई-बाबा जरा काळजीत पडले होते.

"काय झालं अनिता ?".

"काय प्रॉब्लेम झाला?".

"की तू गेलीस नाहीस का मुंबईला. . .?".

"गाडी चुकली का. . .?".

एक ना अनेक प्रश्न त्यांनी विचारले. त्यांना तरी काय सांगणार होती अजून ते घाबरून गेले असते.

"नाही साहेबांचा फोन आला होता, ते म्हणाले नाशिक मधलं काम संपलं की मग च ये, मग मैत्रीण भेटली तिच्याशी गप्पा मारण्यात थोडा वेळ गेला, आता उद्या जाईन मी मुंबईला".

आज वेळ निघून गेली होती हे दुसऱ्यांदा घडल होतं. ती मुंबईला सर्विस ला होती, फॅशन डिझाईन मुळे तिला वेगवेगळ्या क्लायंट ना भेटायला यावं लागत असे, त्या मुळे मुंबई, नासिक, धुळे, जळगाव हे सगळे विभाग तीच बघत असे. 

हेडऑफिस मुंबईला होतं. महिन्यातन या तिन्ही चारी ठिकाणी तिला ऑफिसचा काम सांभाळून जावे लागत असे. माहीमला ती PG म्हणून रहात होती. ऑफिस वरळीला होत, आवडीचा जॉब असल्यामुळे ती खूप आनंदात होती, दिवस मजेत चाललेले होते पण या दोन प्रसंगा मुळे ती अस्वस्थ होती. त्याच्या आधी एकदा चर्चगेट स्टेशन वरती असं झालं होतं. स्टेशन वरती आली. अंधेरी लोकल पकडली, पुढं तिला काही आठवत नव्हतं, कोणी तरी आपल्याला हाका मारत आहे एवढेच समजत होत. प्रयत्नपुर्वक तिने आवाजाच्या दिशेने बघितले, मोटरमन होता तो म्हणाला 

"मॅडम तुम्ही उतरला नाहीत का अंधेरी स्टेशन वर..?".

"लोकल यार्डमध्ये आलेली आहे".

त्या माणसाकडे तिने बघितलं तिला काहीच समजत नव्हतं लोकल मध्ये बसलो फक्त आठवत होत. 

तिचं नशीब चांगलं असच म्हणावं लागेल, मोटरमनने तिला लोकल मधून उतरवून अंधेरी स्टेशन पर्यंत आणून सोडलं होतं.

"मॅडम तुम्ही कुठे राहता..?". "तुम्हाला बरं नाही का..?". "तुम्हाला घरापर्यंत मी सोडू का?"

बरेच प्रश्न त्याने विचारले पण त्या एकाही प्रश्नाला तिच्या जवळ उत्तर नव्हतं कारण तिला काहीच आठवत नव्हतं. मोटरमनला थँक्स म्हणून तिने त्याचा निरोप घेतला होता 

"मी इथून जाईन आता...". इतकं कसं बसते बोलू शकली पण हे वाक्य उच्चारायला तिला स्वतःला खूप प्रयास पडले होते. स्टेशनवर गर्दी होती, गर्दीचे लोंढे अंगावरून वाहत होते, जो तो ज्याच्या त्याच्या तंद्रीत होता. प्रत्येकाला घराचे वेध, अचानक सगळ्या अंगावरती तिच्या सरसरून काटा आला होता आणि मग एकदम तिला परिस्थितीचे भान आलो होत. माहीम ऐवजी आपण अंधेरीला सरळ यार्ड पर्यंत गेलो..!.

तिच्या अंगावरून सरसरून काटा आला होता खरंच तो मोटरमन देव माणूस होता, देवा सारखा मदतीला धावून आला होता म्हणून निदान ती अंधेरी स्टेशनवर तरी होती स्टेशनवर चहा प्यायला परतीची लोकल पकडली रूम वरती आली तेव्हा रात्री चे साडे अकरा वाजून गेले होते. नेहा गाढ झोपलेली असावी कारण खूप वेळ त बेल वाजवत होती, नेहा ने दार उघडलं डोळे चोळत ती म्हणाली "किती उशीर...?"

"किती वाजले बघितलीस का तू ???"रात्रीचे साडे अकरा वाजत आलेत, आज इतक्या वेळा ऑफिस मध्येच होतीस का...?".

"की कोणाला भेटायला गेली होती...?". 

तिच्याकडे कुठल्याच प्रश्नांना उत्तर नव्हते सुन्नपणे cot वरती बसली नेहा तिच्या जवळ येऊन बसले आणि म्हणाली

"तुला बरं नाही का..?"

"पाणी देऊ का प्यायला?". 

"चहा पितोस का ?..तू काही खाल्लस का सकाळ पासून?". तिला रडू कोसळले नेहाच्या कुशीत शिरून ती मनसोक्त रडली, नेहाला ते सगळ सांगितलं होतं नेहा म्हणाली,

"उद्या पण डॉक्टरांच्या कडे जाऊ या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या पर्समध्ये यापुढे तू स्वतःविषयी थोडी माहिती तरी लिहून ठेव. उदाहरणार्थ इथला पत्ता घरचा पत्ता ऑफिसचा पत्ता वगैरे आणि आवश्यक फोन नंबर". "आणि साधा फोन वापर.. स्मार्टफोन नकोच.." 

"सध्या आजूबाजूस वातावरण इतकं सुरक्षित नाही, स्मार्टफोन गेलं तर तुझीच सगळीच माहिती messages, mails बँक अकाउंट, paytm... आणि बरच सगळच दुसऱ्याला कळेल". दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली होती सगळ्या टेस्ट करून झाल्या होत्या, सगळ्यात टेस्ट नॉर्मल होत्या, कधीकधी काही लोकांच्या रक्तामध्ये अगदी छोटीशी रक्ताची गुठळी असते knot असते , शरीरामध्ये फिरत राहते तसा कुठलाही pulmonary embolism चे सिंड्रोम पण दिसत नव्हते. Alzheimer ची पण लक्षण नव्हती. डॉक्टरांनी औषधे लिहून दिली होती पण ती बहुतेक सगळी औषधेही झोपेची होती.

मध्ये दिवस बरे गेले होते आणि आज अचानक परत एकदा तिला या प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं होतं केव्हा काय होईल हे समजायला मार्ग नव्हता एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती की अशी विचित्र अवस्था येण्याच्या आधी किंवा त्या अवस्थेतून बाहेर येताना तिचा अंगावरती सरसरून काटा येत असे एवढ एकच लक्षण तेही तिने डॉक्टरांना सांगितलं होतं. पण त्याला काही कुठले समाधानकारक उत्तर असं नव्हतं तिने पर्स मध्ये तिने एका कागदावरती स्वतःला शाळेतल्या मुलासारखा स्वतःचं नाव गाव पत्ता फोन नंबर इत्यादी सगळे लिहून तो कागद पर्समध्ये पटकन सापडेल असा ठेवला होता. 

एक साधा फीचर फोन घेऊन आली होती. स्मार्टफोन मधले सगळे कॉन्टॅक्ट त्याच्यात कॉपी केले होते स्मार्टफोन तिने पर्समध्ये ठेवून दिला होता अगदी गरज पडली तरच काढायचा विचार करून घेऊन तिने आईला दुसऱ्या दिवशी स्टेशन वर यायला सांगितलं होतं. परत स्टेशनवर असं काही झालं तर...!!!, पण तसं काही घडल नव्हतं. 

असं करून थंडीच्या दिवसातील हळू हळू वाढणाऱ्या थंडी प्रमाणे तिच्या मनातली भीती ही वाढत चाललेली होती. आई बरोबर असल्यामुळे तिला धीर होता अर्थात तसं काही झालं नाही. नेहमीसारखा ती मुंबईला आली ऑफिस चालू झाल, पण कामात म्हणावं तसं लक्ष मात्र तिचा लागत नव्हतं. नेहाला तिने हे बोलून दाखवल, नेहा म्हणाली "अनिता मला कल्पना आहे, पत्रिका, भविष्य, भाग्य, देव या गोष्टींवर तुझा विश्वास नाही तरीपण आपण एकदा याची पण मदत घ्यायची का.…?"," कारण शेवटी बर होणं महत्त्वाच". "डॉक्टर सगळे करून झाले, मानसोपचार तज्ञ झाले हातात काही चालले नाही", नेहाच म्हणणं तिला पटलं होतं कारण तिला कसेही करून बाहेर पडणं गरजेचे होतं कारण लवकरच जळगाव मध्ये तिला एक मोठं फॅशन डिझाइन्स वर्कशॉप मॅनेज करायचं होतं त्यावेळेला समजा असं काही झालं तर, अनिता ने विचारलं 

"नेहा कोणाकडे जाणारा...?". नेहा म्हणाली "एक जण माझ्या परिचयाचे आहेत, घाटकोपरला असतात ते स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत या क्षेत्रामध्ये त्यांचा बराच अभ्यास असावा असं मला वाटतं आपण त्यांना भेटून येऊ".

दोघी माझ्या समोर बसलेल्या होत्या नेहा ने सुरुवात केली, हे पण सांगितलं होतं की अनिता चा भविष्य, भाग्य,पत्रिका, देव इत्यादी गोष्टींवर विश्वास नाही". अर्थात त्यामुळे मला त्याचा राग यायचा काही कारण नव्हतं मी अनिताला म्हटलं 

"मॅडम तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कपाळा वर विभूती लावली तर चालेल का..?".

अनिता म्हणाली,"हो पण जेव्हा मी इथून बाहेर पडेल तेव्हा मात्र मी ते पुसून टाकेन".

मला तीच हसू आलं. 

"आत्ता आपण स्वामी महाराजांच्या समोर बसलेलो आहोत, आत्ता मी तुमच्या कपाळाला विभूती लावली तर तुमची हरकत नाही ना ...?".

"नंतर तुम्ही पुसून टाका जे दोन अनुभव तुम्हाला येऊन गेले ते मला बघायच आहेत"

ती म्हणाली "पण हे कसे शक्य आहे...?". 

त्यावर ती मी तिला काहीही उत्तर दिलेलं नव्हतं स्वामींच्या समोर असलेली गायत्री च हवन केलेली विभुती हातात घेऊन मी मारुतीरायाचे काही शाबर मंत्र मनात म्हणून तिच्या कपाळाला लावली. 

सरसरून अंगावरती काटा आलेला तिच्या एकंदर हावभाव ह्या वरून कळल.

दोनदा ती या प्रसंगातून गेली होती तोच प्रसंग आता तिथे तयार झालेला होता मी नेहाला म्हटलं "नेहा बघ तिला विचार तिला काही आठवतंय का...?.

अर्थात तिला काही आठवत नव्हतं, काही समजते नव्हतं गोंधळलेल्या अवस्थेत ती सगळीकडे बघत होती, नेहाकडे देखील ते अनोळखी नजरेने बघत होती. 

"आलं माझ्या लक्षात काय झालेल आहे ते. मला एक गोष्ट सांग तेवढ्यात हा कुठले ट्रीपला वगैरे गेले होती का म्युझियम किंवा जुन्या वास्तूत किंवा वाड्यांमध्ये किंवा किल्ल्यावर ट्रेकिंगला वगैरे गेली होती का...?"

नेहा म्हणाली मी तुम्हाला तिला विचारून सांगते पण आता तिला कसं विचारणार कारण परत ती कुठल्यातरी वेगळ्याच आवस्थेत गेलेली आहे".

परत एकदा मी थोडीशी विभूती हनुमान शाबर मंत्र म्हणून तिच्या कपाळावर लावली होती परत एकदा तिच्या सगळ्या अंगा वरती शहारा आला होता आणि त्यातून ती बाहेर आली होती. "अनिता, असंच झालं होतं ना..?, मी विचारलं

अनिता म्हणाली,"अगदी असंच झालेलं पण आत्ता तुम्ही काय केलं होतं..?".

मी म्हटलं तो प्रश्न जास्त महत्वाचा नाही ईश्वरी कृपेने तू इतपर्यंत असलीस हे तुझं नशीब समज". नंतर नेहाला मी जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न तिला विचारला तेव्हा ती म्हणाली 

"हो आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो". "तिथे काही तुला विचित्र अनुभव आला का?".

"नाही","आमची ट्रीप खुप सुरेख झालेली होती".

अनिता तुला आता मी एक प्रश्न विचारणार आहे ह्या प्रश्नामुळे तुला वाटेल ockward वाटेल, तुझा गैरसमज होऊ शकेल..","राग येईल". 

"ते सहन करण्याची तुझी ताकद असेल तरच मी तुला प्रश्न विचारतो, मला एक गोष्ट सांग ज्या वेळेला तू गेली होतीस त्या वेळेला ट्रेकिंग रूट वर कुठे बाथरूमला बसली होतीस का..?".

"एखाद्या बाभळीच्या झाडाखाली वगैरे, नीट आठवून सांगा करण ट्रेकिंग रूट वरतीच काही टॉयलेट बाथरूमची सोय नसते तुला काही आठवतं का?, प्रयत्नपूर्वक आठव संध्याकाळचे चार-साडेचार तेव्हा वाजले होते, आणि तू एका बाभळीच्या झाडाखाली बाथरूम करता गेलेली व करत असलेली दृश्य माझ्या डोळ्यासमोर जेव्हा मी तुझ्या कपाळावर विभूती लावली तेव्हा दिसलं". अनिताला एकदम तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला परत येताना अचानक "नेचर्स कॉल" त्या मुळे तिच्याबरोबर असलेल्या मित्र-मैत्रिणींना थोडासा थांबायला सांगून ती आडबाजूला त्याकरता गेलेली होती परत येताना तिच्या अंगावरती सारखे शहारे येत होते पण नंतर नंतर ते गेले. 

"आता तू ठरव ती तुला यातून बाहेर पडायचं की हा त्रास सहन करायचा...?".

त्या एका क्षणाने आणि त्याची मनस्थिती पूर्ण बदललेली होती ती म्हणाली ,"कसेही करून मला यातून बाहेर पडायचे तुम्ही सांगाल ते करायची माझी तयारी आहे, तुमची जी काही असेल ती fee देण्याची माझी तयारी आह"

मी अनिताला हात पाय धुवायला सांगितले व चटई वरती बसवलं तुला काही करायचं नाही तू फक्त शांतपणे बस घाबरू नकोस असं म्हणून हातात विभूती घेऊन अनिताच्या कपाळावरती लावली आणि तिने डोळे उघडले होते तिच्या चेहऱ्यावरती थोडेसे रागीट भाव होते ती अनिता नव्हतीच एक सेंद्रिय दैवत होत, मी त्या दैवताला म्हणालो "या मुलीच्या हातून चूक झाली तिच्या हे लक्षात नाही आलं तिच्या बाभळीच्या झाडाखाली तुमचं स्थान आहे, माझी तुम्हाला विनंती की तुम्ही तिला सोडून द्या". 

त्यावरती अनिता म्हणजे तिच्या तोंडून ते दैवत घोगऱ्या आवाजात म्हणाल "तिला मी सोडणार नाही हिने माझ्या अंगावरती मूत्रविसर्जन केलय आता तिला ठार मारल्याशिवाय मी शांत राहणार नाही".

तेव्हा मी त्या दैवताला विनंती केली की "तुमचा अधिकार मोठा आहे तुमचं स्थान तिला माहिती नव्हतं तिच्या हातून ही चूक नकळत झालेली आहे ते स्थान अनिता कडून आपण बांधून घेऊ म्हणजे इतर कोणाकडून नाही पुन्हा अशी कधी चूक होणार. आणि तुमचा योग्य तो सन्मान असेल तो ही मुलगी अमावस्येला येऊन त्या स्थानावर करेल मग तर तुमची हरकत नाही ना...?". त्याने म्हणजे आनिताने परत एकदा माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल "अविनाश तुमच्या मागे स्वामींचा अधिष्ठान दिसत आहे त्यांच्या विषयी असलेल्या आदरामुळे व तुम्ही केलेल्या विनंती मुले मी या मुलीला सोडून देईन पण माझं स्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात यावं आणि माला सन्मानपूर्वक माझा नैवेद्य येत्या अमावस्येला दिला जावा म्हणजे यापुढे मी तिला कधीही त्रास देणार नाही".

अनिताच्या ठिकाणी जे दैवत होतं त्या दैवताला देखील मी नमस्कार केला त्यांचे आभार मानले. अनिता एकदम भानावर आली झालेला सगळा प्रसंग नेहाने मोबाईल वरती व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता नेहाला मी सगळं समजावून सांगितलं त्याप्रमाणे त्या दैवता करता सगळी व्यवस्था करण्यात आली या विश्वात विविध स्तरावर अशी अनेक दैवते असतात त्यापैकी काही दैवतांचा पृथ्वीवर देखील वास असतो अशा दैवतांना सेंद्रिय दैवत असं म्हणतात. काही दैवत ही मदत करणाऱ्या पैकी असतात तर काही दैवत ही तामस स्वरूपात असतात चुकून अनिताच्या हातून तो गोंधळ झाल्यामुळे ते दैवत नाराज झाले. दार वाजलं तेव्हा पुन्हा दोघी दारात उभ्या होत्या अनिताचा चेहरा अतिशय प्रसन्न होता त्या दोघांना मला नमस्कार करायचा होता अर्थात मी स्वतः असं काही केलेलं नव्हतं जे काही झालं होतं ते स्वामींच्या सत्तेने आणि त्यांच्या कृपेने झालेला होत. त्यामुळे नमस्कार मी त्याना स्वामींना करायला सांगितला आणि आणि त्याला म्हणालो "तुला आठवतं तू म्हणाली होतीस की तुमची जी काही fee असेल तीही द्यायला मी तयार आहे..?".

अनिता म्हणाली,"हो मला आठवते..".

"मग ऐक ..".

दोघी स्तब्ध झाल्या होत्या. 

मी त्यांना म्हटलं "आज पासून तुम्ही दोघांनी मरेपर्यंत रोज अकरा माळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा हीच माझी fee". एवढं बोलून दोघीं चा मी निरोप घेतला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract