विश्वास
विश्वास
गर्भातील पिल्लाचे पोट भरावे म्हणून ती हत्तीण उपाशीतापाशी गावात आली होती. तिला विश्वास होता मनुष्यप्राणी 'अतिथी देवो भव' मानतो आणि भुकेल्याला कधीच विन्मुख पाठवित नाही.
त्याने तिला फक्त विन्मुखच नाही पाठविले तर स्फोटके भरलेला अननस खाऊ घालून तिच्या पिल्लासहित यमसदनी पाठविले. तेव्हाच जंगलातील समस्त प्राणीजातीचा माणूस आणि माणुसकीवरचा विश्वासच उडाला.
