सुमनांजली बनसोडे

Tragedy Others

3  

सुमनांजली बनसोडे

Tragedy Others

विरह...

विरह...

2 mins
236


आज हृदयाचे तुकडे तुकडे झाले.. असं काही नाही.. वाट पाहावी म्हणते त्याची.. तो येईल पुन्हा त्याच जुन्या वाटेने.. आज त्याच्या असंख्य आठवणी... हिरवे ओले क्षणही क्षितिजापलिकडे धावत पळण्याचे.. त्याला ओलेचिंब भिजविण्याचे दिवस... पण.. पण वेळ बदलली... संदर्भ बदलले...तो ही बदलला... माझ्या पापण्यांना पुर आले... आता फक्त जखमा... आठवणी.. पुन्हा कधी येईल तो... सारा विस्कटलेला डाव... आभाळ फाटले आता... पण सावरले.. भ्रमिष्टासारखी रानोमाळ फिरले.. तक्रार मांडावीशी वाटली... पण तक्रार कुणाकडे कधी केलीच नाही... करणार तर नाहीच... लिखीत पण असं काही नाही... पुरावा पण ठोस नाही... फक्त अंधाऱ्या रात्री त्यानं दिलेल्या शब्दांवर मी विश्वास ठेवला होता... त्याच्या प्रेमावर जगावं जन्मभर.. पण... पण ते जमलं नाही हो... स्वतःवर तरी करावं...पण तेही कळलं नाही हो... माझी मीच अपराधी... तेव्हा रात्र रात्र जागून काय उपयोग.. तो कालपर्यंत माझा होता.... पण आज... मात्र... असं का बरं.. माझ्या मनातील हे वादळ आता तरी थांबत नाही... 


आता तर फक्त तुझ्या आठवणीवर जगत आहे... पुढे मृत्यु आहे.. म्हणुन चालते आहे खरी.. वेळ भयानक आहे... याची पूर्ण जाण आहेच..पण कधी काळी तो माझ्यात रममाण व्हायचा... यानं आजही माझा जीव सुखावतो...  मी मलाच न्याहाळताना आठवतात त्याचे ते थरार स्पर्श... प्रतिक्षेत आनंद असतो म्हणे... पण कीती दिवस रे... ?

सगळं सगळं संपलं... आता सारी सामाजिक बंधनं तोडून जावं... अगदी दूर.. त्या क्षितीजापलिकडे...

मला तर इथल्या तमाम नात्यांनी दिल्या आहेत खूप साऱ्या जखमा... न पुसणाऱ्या पाऊलखुणा... आणि एक जीवघेणी चौकट... आणि म्हणून या सगळ्या नात्यामधून मुक्त व्हावं वाटतंय आतातरी...


या भयाण रात्री... हुंदका देते आहे... पण कुणासाठी देते मी हा हुंदका...??? का रे मी रडावं...??? कोण आपलं यार.... आणि कोण रे परकं....होतं... ???

दूर क्षितिजापर्यंत तुझ्या आठवणीचे दोर... नको तेव्हा अस्वस्थ करतात... तुला जर समजली असती.. पक्ष्यांची भाषा... आभाळाचा स्वच्छ आरसा... माझ्या मनाच्या भावना... तर तू झालाच नसता दूर.... इतर कुणाचा तरी... 


तुझ्या शब्दावर आजही माझा श्वास जगतोय... तुला डोळ्यात आणि मनाच्या गाभाऱ्यात साठवावं... एवढीच इच्छा आहे... उभं आयुष्य घालून काय मिळालं..निराशेचं पिक अवेळी पदरी पडलं... 

हा पण एक गोष्ट शिकले नक्कीच...

"जर जगायचं असेल सुखा समाधानाने तर लावू नये जीव कोणाला..."

कारण काटे टोचण्याचीच भिती जास्त असते... कित्येक ऋतु आले गेले... प्रत्येक मौसमात मी तुला शोधले... 

कधीकधी आठवण काढतोस म्हणे तू माझी... 

कुणास ठाऊक...?????


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy