विरह त्या जाईचा
विरह त्या जाईचा


एक रामनगर नावाचं राज्य होतं.ते राज्य दिसायला खूप सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले असे मोठे राज्य होते.
त्या राजाचे नाव कुलभूषण असे होते आणि राणीचे नाव मंदाकिनी असे होते.त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.आणि
त्या राज्यातील सर्व लोकांना ते आवडायचे.
तो राजा आणि राणी खूप शूरवीर आणि धाडसी होते.त्यांनी खूप लढाया जिंकल्या होत्या, त्यामुळे आजुबाजुला असणारे राजे त्यांच्या विरुद्ध लढाई करायला घाबरायचे.
एक दिवशी मंदाकिनीने एका मुलीला जन्म दिला.ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तिचं नाव जाई असं ठेवलं गेलं.
जाई दिसायला एकदम फुलासारखी होती. जाई वर मंदाकिनीचं आणि कुलभूषणचं खूप प्रेम होतं
पण काही काळाने हे दोघे पण त्रस्त झाले.कारण खूप दिवस झाले यांनी लढाई केली नव्हती.आणि आजुबाजूच्या राज्यां बरोबर संबंध पण चांगले होते, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पण लढाई करणं अवघड होतं. तेव्हा त्यांनी एकमेकांबरोबर लढाई करण्याचं ठरवलं.पण त्यांच्यातल्या लढाईचा निर्णय करणार कोण ? हा प्रश्न होता.
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी एका फुलासारख्या मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी तो निर्णय तिला करायला सांगितला. ते दोघे शूरवीर असल्याने कोणीही माघार किंवा हार मानायला तयार नव्हते. त्यांची ति लढाई खूप काळ चालली.पण या मध्ये सगळ्यात जास्त त्रास आणि वितंबना हि जाईची होतं होती.तिने खूप ओरडून सांगायचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज मात्र त्यांच्या पर्यंत पोहचलाच नाही. तिचं ते रडणं, दुःख आणि तिची ती होणारी घालमेल कधीच त्यांना समजली नाही. नंतर ती स्वतः एका जंगलात जाऊन स्वताच्या विश्वात राहायला लागली.पण यांची लढाई संपली नाही.
जाईने नंतरही खूप वाट पाहीली, पण तिची ती अवस्था मात्र तशीच राहिली.