Bhartesh Masalkar

Others

3  

Bhartesh Masalkar

Others

प्रेमचंद आणि सायबीन

प्रेमचंद आणि सायबीन

2 mins
46


हि गोष्ट प्रेमचंद आणि सायबीन यांच्यातील मैत्रीची व प्रेमाची आहे. प्रेमचंद हे हरिद्वार चे रहिवासी होते. त्यांचं संपूर्ण बालपण हरिद्वार येथे गंगा नदीच्या सानिध्यात गेले होते. प्रेमचंद ना लहानपणापासून पाळीव प्राण्यांना सांभाळायला व त्यांचे पालन पोषण करायला आवडत होते. पण घरातील हालाखीची परिस्थिती असल्याने ते नीरा रेल्वे स्थानकावर चहा विकायचे. एक दिवशी त्यांनी लहान कुत्रीला पाहिले, ती खूप दिवस उपाशी असल्याने तिला जागेवरून हलता पण येतं नव्हते. प्रेमचंद ने तिला खायला आणुन दिलं आणि काही दिवसांनी त्यांच्या मध्ये मैत्री झाली. नंतर ते तिला आपल्या सोबत घरी घेऊन आले. त्यांच्या घरी ते एकटेच राहत होते. आता त्यांना एक सोबती मिळाला होता. ते कधीच एक मेकांना सोडून राहत नसे. त्या कुत्रीचा रूबाब पाहून प्रेमचंद ने तिचं नाव सायबीन ठेवले होते. तिचा रंग काळा आणि आवाज खूप जोरदार होता. तिला पाहून कोणालाही घाम फुटेल असं तिचं देहं होतं. प्रेमचंद ने सांगितलेलं सगळ्या गोष्टी ति ऐकायची. एके दिवशी प्रेमचंद काशीला देव दर्शनाला निघाले होते, पण तिथं सायबीन‌ला घेऊन जाणें अवघड होते. तिचा डोळा चुकवून ते काशीला निघाले पण काही अंतर पुढे आल्यावर त्यांनी गाडीच्या आरशातून पाहिले की सायबीन‌ धांवत धांवत त्यांचा पाठलाग करत होती. हे पाहून प्रेमचंदला वाईट वाटले ‌आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रु बरसले. सायबीनला घेऊन काशीला जाऊन देव दर्शन केलें आणि प्रतिच्या मार्गाला लागले. तेव्हा त्यांची गाडी चोरांनी अडवली आणि प्रेमचंद ला मारायला सुरुवात केली. तेव्हा आपला जीव धोक्यात घालून सायबीन‌‌ ने प्रेमचंदचा जीव वाचवला. घरी आल्यावर सायबीन ने काही सुंदर पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे प्रेमचंद खूप आनंदी होता, परंतु तो आनंद फार काळ टिकला नाही. त्या पिल्लांना रोग असल्याने त्यांना इंजेक्शन देऊन मारायला लागलं. आपल्या पिल्लांच्या विरहाने ती व्याकूळ होऊन रडत बसली. व तीनं अन्न पाण्याचा त्याग केला. त्यामुळे तिचं शरीर खालावत चाललं होतं. हे सर्व पाहून प्रेमचंदना खूप त्रास आणि वाईट वाटतं होतं की ते सायबीन‌ साठी काही करू शकत नव्हते.

एके दिवशी ते सकाळी सायबीनला घेऊन फिरायला गेले तेव्हा सायबीन ने त्या अंधाराकडे पाहून एका जागी उभीं राहून भुंकायला सुरुवात केली. माघारी आल्यावर त्याच संध्याकाळी तिने जीव सोडला. त्या रात्री प्रेमचंद खूप रडले, त्या दोघांन मध्ये खूप प्रेम आणि मैत्री होती.. प्रेमचंदला या धक्क्यातून सावरायला काही महिने गेले. सायबीन आज नसली तरीही तिचा विसर पडला नाही.. आजही प्रेमचंद च्या मनात तिच्या बद्दल तेवढंच प्रेम आहे.


Rate this content
Log in