वीज...
वीज...
ती खिडकीशी बसून मुसळधार कोसळणारा पाऊस विमनस्कपणे बघत होती. एवढ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरात वीज कडाडली आणि आगीचा लोळ तिच्याकडे झेपावला. पण ती मुळीच घाबरली नाही.
कारण लग्न झाल्यापासून तिच्या हळव्या मनावर अशा वीजा रोजच कोसळत होत्या आणि त्या झेलता झेलता तिचे मन जळून कधीच खाक झाले होते.
