Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

वहिनीची आई आता माझीही...

वहिनीची आई आता माझीही...

2 mins
274


लग्न झालं आणि विभा दूर गेली.आईचं काळीज नेहेमीच तुटायच लेकीसाठी परक्या ठिकाणी कसं होणार पोरीचं...पण संस्कारच तसे होते विभावर सगळं आनंदान निभावत होती.नंतर लगेचच विराजच लग्न झालं आणि प्रियाच्या रूपाने विभाला वहिनी पेक्षा जवळची सखी मिळाली.प्रियाने लवकरच सगळ्यांना आपलंसं केलं आणि दोन्ही मुले आनंदाने संसारात रमलेली पाहून आईसुद्धा निश्चिंत झाली.


काही वर्षांनी विभा परदेशी गेली तसा आई मुलीचा सहवास कमी झाला...अचानकपणे विसाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे विभाला मुलासाठी परत यावं लागलं..एकटी विभा मुलाला घेऊन कसं मॅनेज करणार या काळजीत असतानाच प्रिया आणि विराजच्या भक्कम आधारावर विभा भारतात आली. प्रियाच आणि विभाचं बोंडींग अगदी छान होतं तिने स्वतःच्या आणि नणंदेच्या मुलांत कधीच भेदभाव केला नाही. सुरुवातीला विभा आणि यश विरजच्या घरात राहत होते पण जागेच्या अडचणीमुळे जवळच एक घर घेऊन तिकडे शिफ्ट झाले.


आई बाबा आणि मुलं सतत विभाकडे येऊन जाऊन असतं. इतक्या वर्षांनी मिळत असलेला सहवास सगळ्यांसाठीच आनंददायी होता. प्रियाला भाऊ नव्हता म्हणून तिचे आई वडील सुद्धा जवळच घर घेऊन राहायला आले.दोन्ही घर जवळ जवळ असल्यामुळे प्रियाचे आई वडील आणि प्रिया सतत एकमेकांकडे येत असतं..नाही म्हणायला आईला ही गोष्ट रुचत नव्हती...घर म्हटल की भांड्याला भांड लागणारच...तसाच या ही घरात होतं...


सगळं छान चालू असताना अचानक काही ध्यानी मनी नसताना अगदी ठणठणीत असणाऱ्या वीभाच्या आईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं...हळूहळू तब्येत सुधारू लागली...आई तब्येतीने एकदम फिट असल्यामुळे कोणाला तशी काहीच काळजी नव्हती...पण अचानक आईची तब्येत बिघडू लागली .... डॉक्टरांनी 'आता काहीच आशा नाही ' अस सांगितल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली...


प्रिया, विभा आणि विराज अगदी खचून गेले. बाबांना यातलं फारसं काहीच सांगितलं नव्हतं...हॉस्पिटल मधून सगळे सरळ प्रियाच्या आईकडे गेले...इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटला...आणि आता विभाने प्रियाच्या आईच्या कुशीत आईची माया अनुभवली...नंतरचे काही अवघड दिवस प्रियाच्या आईने विभालासुद्धा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं आणि एक नवीन आगळ नातं तयार झालं...


काळाने घाव घातला आणि विभाने आईला कायमचं गमावलं...त्या परिस्थितीत सगळ्यांना सांभाळलं ते प्रियाच्या आईने...तेव्हापासून नकळत विभासुद्धा प्रियाच्या आईला 'आई' म्हणू लागली...एक आगळं वेगळं सुंदर आई मुलीच अतूट नातं परमेश्वराने विभासाठी तयार केलं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational