Meenakshi Kilawat

Inspirational

3.1  

Meenakshi Kilawat

Inspirational

वेळेची गुंतवणूक

वेळेची गुंतवणूक

3 mins
865


 क्षमतेच्या बळावर विश्वात अनेक व्यक्तींनी अनेक कार्य सिद्धीस नेले आहे. ज्या व्यक्ती यशस्वी आहेत, त्यांच्याकडे वेळ नसतो.कारण ती व्यक्ती वेळ खर्च करीत नसतात,तर ती व्यक्ती वेळेची गुंतवणूक करीत असतात.त्याचप्रमाणे वेळेची गुंतवणूक करणारे व्यक्ती धनलाभापेक्षा ही अधिक पटीत यश संपादन करीत असतात. क्षमता ही प्रत्येकात असते.तो व्यक्ती त्याचा कसा वापर करतो त्यावर अवलंबून असते

      तसेच ज्या व्यक्ती बेकार असतात, त्याच्याकडे ही वेळ नसतो,मात्र ते ही कुठेतरी फालतू कामात वेळ खर्च करीत असतात.चांगल्या कामासाठी खर्च केलेला वेळ लगेच आपणास फळ देत नाही,परंतू तो रबरी चेंडूसारखा उंचीवर पोहचवण्याची क्षमता निश्चितच ठेवत असतो.  

      "अमेरिकेची वूल्मा रूडाल्फ" लहाण असतांना नऊ रोगांनी ग्रस्त होती.तिला निट चालतासुद्धा येत नव्हते.खेळण्याची आवड असूनसुद्धा ती खेळू शकत नव्हती.मात्र ती खचली नाही. जिद्द आणि ध्येय गाठण्यास तिने आधी तनामनात क्षमता तयार केली होती.

    "कशी ही परिस्थिती आली तरी तिच्यावर मात करण्याची क्षमता हिंमत अंगी असणे आवश्यक आहे. "वुल्मा रूडॉल्फने चालण्याचा प्रयत्न केला नसता ,तर ती "ऑलिम्पिंकमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवू शकली नसती".आपल्यातील क्षमतेवर विश्वास ठेवला. स्वता:ला ओळखले. आणि आवश्यकते नुसार त्याचा योग्य वेळी योग्य वापर तिने केलाय.

   "१९६०च्या रोम ऑलिंम्पिकमध्ये तीन सुवर्णपदक तिने जिंकले.जगाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. अफाट यश संपादन केले होते. तिने आधी आपल्या सुंदर कार्याचे नियोजन व वेळेची गुंतवणूक पद्धतशीर करुन उंचांक गाठला व आपल्या आयुष्यात ध्येयाला महत्व दिले.आणि अशक्य वाटणारे कार्य करून सिद्धिस नेले.ती जर जागेवर खिळली असती तर.? किंवा आपल्या स्वास्थाला घेवून बसली असती तर.? ती उंच भरारी घेवू शकली असती कां ? अपंगत्वावर मात करून क्षमतेला,सामर्थ्याला आपल्यात भिनवून एकएक सिढी चढून यश संपांदन केले. कालपेक्षा आज चांगला परफाँर्मस दाखवत गेली. तिच्या वेदनेने तिला मानसिकरीत्या कणखर बनवले. तीने दाखवून दिले जगास,की जिद्दीच्या बळावर कोणत्याही बाबीवर विजय मिळवता येतो. व यश संपादन करता येत.  

      अशीच एक अजून आपल्या अपंगावर मात करुन दिल्लीत कॉमनवेल्थ गेममध्ये आलेली मुलगी. "डँनिएल ब्राऊन" फक्त २२ वर्षाची होती. भारतात आली असतांना तिला व्हिलचेअरवर बसुवूनच आणलेली होती. तिला उभ रहायला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत असे. तिला अजीबात चालता येत नव्हते. एका असाध्य रोगाने तिच्या पायाला अपंगत्व आले होते. तीरंदाज "डँनिएल ब्राऊन" तिनेपण वेळेची गुंतवणूक करुन आपली क्षमता ओळखली. आणि आपली वाट शोधली.याच डँनिएलने २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पीकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पीकमध्ये सुवर्ण पदक जिंकून आपल्या देशाचे नाव उंच केले. तिने सांगितले होते की,रोज सकाळी उठल्यावर पायात असंख्य वेदना होतात.सराव हा रोजच करायचा असतो.आता मला वेदनेची सवय झालेली आहे."परंतू मी वर्तमान काळात जगते आहे.तिने म्हंटले भूतकाळ ही माझ्यासाठी प्रेरणादाई आहे".पण कालपेक्षा आज मी चांगला परफाँर्मस करते.माझ्या वेदनेनेच मला मानसिकरीत्या कणखर बनवले आहे. जिद्दिने कोणत्याही बाबीवर विजय मिळवता येतो. आणि अशक्य काहिच नाही. सराव, लगन,मेहनत,करुन आपण जगही जिंकू शकतो.

     कित्येकांनी तिच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले,व चुकीची माहिती दिली,पण ती अडीग राहीली.ज्याचे ध्येय व स्वप्न ठरलेले असते. आणि जीद्द असते अश्या व्यक्तीला कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. म्हणुन जे काम हाती घेतले ते पुर्ण करण्याकरीता समुळ शक्तीनिशी प्रयत्न करावा. अपयशाची भिती सुद्धा जवळ येवू देवू नये. केवळ यशाचा आणि यशाचाच विचार करा. तुम्ही जसे तुम्हाला पाहता तसच तुम्ही घडत जाता.

    "कशी ही परिस्थिती आली तरी तिच्यावर मात करण्याची हिंमत अंगी असणे आवश्यक आहे."वुल्मा रूडॉल्फने चालण्याचा प्रयत्न केला नसता ,तर ती "ऑलिम्पिंकमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवू शकली नसती".आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवण्याची आणि आवश्यकते नुसार त्याचा योग्य वेळी योग्य वापर करणे गरजेचे आहे.....

    "कुणी व्यक्तीला जिद्द असेत तर तो आपली क्षमता वाढवू शकतो." व आपले ध्येयप्राप्त करू शकतो.हे ही तितकेच खरे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational