वाटे वरती काचा ग
वाटे वरती काचा ग
विलास तू खर प्रेम करतोस माझ्यावर ? होय ग कुमुद ,तुला का पटत नाही? तसे काही नाही घरात बोलणी चालली आहेत माझ्या लग्नाची म्हणुन आता या वर्षी लग्न उरकायच म्हणतात घरी. हे बघ कुमुद आपण पुढच्याच आठवड्यात पळून जावू शहरात आणि लग्न करू. हा विलास हे ठीक आहे. तयारी कर मग थोड़े पैसे दागिणे सोबत घेवून ठेव. चल निघुया आता. असे बोलत कुमुद आणि विलास दोन दिशेने निघुन गेले. छोट्या खेडयात राहणारे विलास आणि कुमुद एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कुमुद एकोणीस वर्षाची तर विलास पंचवीस चा. दिसायला गोरा गोमटा बोलायला गोड.. कोणी ही त्याच्या बोलण्याला लगेच भुलेल असा. काहीच कामधाम न करणारा गावात उनाड पोरां सोबत भटकनारा असा. कुमुद ही दिसायला नाजुक ,सावळी नाके डोळी छान पण अल्लड़ अशी विलास च्या खोट्या प्रेमाला भूलली .
अजुन तरी गावात या दोघां बद्दल कोणाला काही माहित नव्हते. कुमुद ला विलास कसा आहे कसा वागतो हे सगळ माहित होत पण त्याच्या गोड गोड बोलण्या पुढे तिला काही दिसत नव्हते. हे प्रेम नसून निव्वळ आकषर्ण आहे ही गोष्ट कुमुद ला समजत नव्हती. आणि तिचे वय पण लहान. ती विलासच्या गोड बोलणयात वाहवत चालली होती. काही ही करून तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. ठरल्या प्रमाणे कुमुद ने घरातून थोड़े पैसे आणि तिचे दागिने आपल्या कड़े लपवून ठेवले. तिला मोठा आणि एक छोटा भाऊ होता. ही एकटी च होती त्यामुळे घरात लाड़की होती. पण आता ती विलास साठी आई वडीलांना,भावां ना विसरली होती. पुढच्या आठवड्यात घरी आई एकटी असताना कुमुद मैत्रीणि कड़े जाते सांगून घरा बाहेर पडली. जाताना एक चिट्ठी लिहिली. विलास सोबत लग्न करत आहे माझा शोध घेवू नका. विलास तिच्या आधी येऊन थाम्बला होता. दोघ शहरा कड़े जायला निघाले. गाव सोडताना कुमुद चे डोळे भरून आले.घरच्यांची आठवण आली.पण विलास ने समजावले की एकदा लग्न झाले की आपोआप आपल्याला त्यांना स्वीकारावे लागेल. विलास तिला पुण्याला घेवून आला. एका मित्राशी तो फोन वर बोलला आणि कुमुद ला म्हणाला,चल आपण माझ्या मित्राच्या खोली वर राहु मग दोन दिवसात लग्न करू. बर ठीक आहे कुमुद म्हणाली. मग ते दोघे एका चाळी टाइप घरा जवळ आले. तिथे विलास चा मित्र राहत होता. एकच खोली होती ती. आत एक लोखंडी कॉट आणि पाण्याचा एक माठ होता. अगदी कळकट अशी रुम होती. तो मित्र तिथे होता दाढ़ी वाढलेली ,लाल डोळे,मळलेला शर्ट अशा अवतारात होता तो. विलास म्हणाला,कुमुद तू थाम्ब इथे दार लावून घे मी आपल्या लग्ना साठी ची तयारी करून येतो. अरे पण विलास मी इथे एकटी कशी थांबु? अग मी लगेच येतो तू दार बंद करून बस. असे बोलून विलास त्या माणसा सोबत निघुन गेला. कुमुद मनातून फार घाबरली होती तिने पटकन दार लावून घेतले. पहाटे त्या दोघांनी गाव सोडले होते . स्टेशन वर थोडे खाल्ले होते . कुमुद ला तहान लागली होती तिने त्या माठात पाहिले तर थोडं पाणी होत तिथे एक ग्लास होता त्याने पाणी घेतले आणि पिऊन घेतले. भीतीने तिची छाती धडधडत होती. आपण घर सोडून चूक तर नाही ना केली असे तिला वाटू लागले. त्या खोलीत अंधुकसा उजेड होता. कोणी तरी दार वाजवले तिला वाटले विलास आला असेल म्हणून तिने दार उघडले तर तो दाढी वाला माणूस दारात उभा होता त्याच्या हातात एक ग्लास होता आणि दोन पाव होते. त्याने कुमुद कडे हात केला आणि घे म्हणाला. आता पार दुपार टळून गेली होती तिला ही भूक लागली होती. तिने तो चहा आणि पाव घेतला. पुन्हा दार लावून घेतले. चहा आणि पाव खाऊन घेतला. तिच्या कडे फोन नव्हता त्यामुळे ती विलास ला फोन ही करू शकत नवहती.
संध्याकाळ होत आली होती अजून विलास चा पत्ता नवहता तो कुठे गेला असेल याच विचारात कुमुद होती पण तो आपल्याला फसवणार नाही असा विश्वास तिला होता. आता रात्र झाली होती आणि अचानक कोणी तरी खोली चे दार वाजवले तिने घाबरून विचारले कोण आहे? बाहेरून दार उघड इतकाच आवाज आला तिला वाटले विलास आला असेल कदाचित म्हणून तिने दार उघडले समोर एक माणूस आणि एक बाई उभी होती. बाईच्या तोंडात पान होते तिचे ओठ पानांच्या रंगाने लाल भडक झाले होते डोळ्यात भरपूर काजळ आणि लाल असे डोळे त्या बाई ला बघून तिला भीती वाटली. तिच्या सोबत जो माणूस होता तो मवाली गुंड असा दिसत होता. कोण तुम्ही आणि विलास कुठे आहे? तसा तो माणूस तिच्या कडे रोखून बघत हसत म्हणाला, विलास काय तो तर दुपारीच गेला गावाला परत. म्हणजे काय काय बोलता तुम्ही कुमुद ने घाबरून विचारले. त्या विलास ने तुला आम्हाला एक लाखाला विकली आहे ती बाई म्हणाली. नाही विलास असे नाही करणार तो प्रेम करतो माज्या वर कुमुद बोलली. प्रेम आणि विलास तो दर सहा महिन्यांनी तुज्या सारखी एखादी पाखरू गटवतो आणि इथे आम्हाला विकून जातो. तो माणूस म्हणाला. ये चल आता मुकाट्याने म्हणत त्या बाई ने कुमुद च्या दंडाला पकडून ओढले . कुमुद रडत होती अहो मला कुठे नेता तुम्ही मला गावी जाऊ दे परत मला सोडा. ये भवाने तुझे लाख रुपये घेऊन तो विलास गेला आहे तुला जायचे का गावाला मग आधी लाख रुपये टाक मग जा. ती बाई चवताळून बोलली. त्या दोघांनी कुमुद ला ओढत ओढत बाहेर आणली आणि एका रिक्षात बसवले. कुमुद ला विलास चे हे रूप माहित न्हवते आज तिला समजले की विलास ने प्रेमाचे खोटे नाटक केले आणि तिच्या जवळचे दागिने पैसे घेऊन पळाला होता. तिच्या कृत्याचा तिला पश्चाताप होत होता आता ती काही ही करू शकत नवहती . या शहरात तिचे कोणी ओळखीचे ही नवहते. पुढे नशीबात काय वाढुन ठेवले असेल हे तिला ही माहीत नवहते. आई वडिलांना आपण फसवले त्याचीच ही शिक्षा आहे असा ती विचार करीत होती. एके ठिकाणी रिक्षा थांबली. त्या बाई ने तिला दंडाला धरून ओढत नेले.
कुमुद कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पहात होती. ती एक तीन दोन मजली इमारत होती. गॅलरी मध्ये बऱ्याच मुली नटून उभ्या होत्या. कसले तरी गाणे सुरू होते. कुमुद ला समजेना नेमके कुठे आलो आपण? एका फ्लॅट मध्ये ती बाई कुमुद ला घेऊन आली. आणि एका मुलीला बोलवून म्हणाली,घे हिला आणि समजावून सांग. ती मुलगी कुमुद ला घेऊन आतल्या रूम मध्ये आली. कुमुद म्हणाली तू कोण आहेस आणि मी इथे कुठे आले.हे बघ माझे नाव रेश्मा आणि आता इथेच तुला तुझं आयुष्य काढावे लागणार आहे. इथे शरीर विक्री चा धंदा चालतो. नाही नाही मी असले काम नाही करणार कुमुद बोलली. हे बघ तुझे नाव काय रेश्मा ने विचारले. मी कुमुद मी विलास सोबत घर सोडून आले आम्ही लग्न करणार होतो पण त्या विलास ने तुला यांना विकली आणि स्वतः पळून गेला ना कुमुद रेश्मा म्हणाली. हो पण तुला कसे माहीत? कुमुद अग इथे कोणी स्वतः च्या मर्जीने येत नाही ग. मला आई वडील नाहीत म्हणून मी लहानपणापासून काका काकू कडे राहिले पण वयात आले आणि काका च्या वासनेची शिकार झाले. जीवे मारण्याची धमकी देवून तो माझ्यावर अत्याचार करत राहिला आणि एक दिवस इथे आणून विकले मला. पण रेश्मा मला नाही करायचे हे काम मला माझ्या गावी जायचे. कुमुद आता इथून तुझी सुटका नाही आणि बाहेर पडलीस तरी बाहेरचे लांडगे आहेतच तुझे तुकडे करायला. इथून तू पळून गेलीस तरी ही लोक तुला शोधून काढून जीवे मारून टाकतील त्यापेक्षा आहे इथे सुरक्षित आहेस . दोन वेळ पोटभर खायला तरी मिळेल. आज आराम कर उद्या पासून काम सुरू होईल. रेश्मा निघून गेली. कुमुद ला काहीच समजेना काय करावे सुचेना. डोकं बधिर झाले तिचे. दुसऱ्या दिवशी रेश्मा ने तिला कपडे आणून दिले हे घालून चांगले तयार हो असे सांगून गेली. कुमुद तशीच शून्यात नजर लावून बसली. थोड्या वेळाने ती मेन बाई मालकीण आणि तीचा साथीदार जमीर नाव त्याचे आत आले. कुमुद ला तसे बघून मालकीण भडकली. तिच्या केसांना धरून उठवले म्हणाली,समजत नाही तुला रेश्मा काय बोलली ते. मुकाट्याने तयार हो. नाही मी हे काम करणार नाही. तशी एक जोरदार थपपड तिच्या गालावर बसली. मालकीण ने परत दुसरी थपपड मारली. आणि जमीर कडे बघून म्हणाली,जमीर इसे कैसे तयार करना है तू देख अभी,तेरे हिसाब से. मैं चलती हु म्हणत मालकीन तिथून निघून गेली. मग जमीर ने दाराला आतुन कडी लावली. तशी कुमुद बोलली तुम्ही दार का बंद केले मला जाऊ द्या बाहेर म्हणत कुमुद दारा कडे निघाली तसे जमीर ने तिला जोरात ओढली आणि दोन चार फटके मारले तिला. जास्त नखरे करू नकोस पहिले पहिले सगळ्याच पोरी असच करतात मुकाट्याने तयार हो. नाही मी नाही तयार होणार कुमुद म्हणाली. मग जमीर बोलला बघू कशी तयार नाही होत आणि तो त्याचे कपडे उतरवू लागला. तशी कुमुद घाबरली त्याला म्हणाली मला सोडा मला जाऊ दे. पण जमीर ने तिला धक्का देऊन तिथल्या बेड वर ढकलली. त्याच्या आडदांड शरीरयष्टी समोर कुमुद चा निभाव काय लागणार? तिच्यावर त्याने जबरदस्ती केली आणि तिला मारहाण पण केली. दिवसभर तो तिच्या रूम मध्ये होता आणि तिच्या मना विरुद्ध तिच्या वर अत्याचार करत होता. शेवटी त्याचा त्रास सहन नाही झाला कुमुद ला तेव्हा तिने शरणागती पत्करली. दुसऱ्या दिवसा नंतर कुमुद या धंद्याला लागली अगदी मन मारून कारण आता इथून तिची सुटका नवहती. आता जवळजवळ वर्षं होत आले होते कुमुद या धंद्यात पूर्णपणे उतरली होती.
घरची खूप आठवण यायची तिला पण कोणत्या तोंडाने ती घरी जाणार? आता जसे नशिबात लिहिले असेल तसच जगायचं असे तिने ठरवले होते. एक दिवस दुपारी तिला मालकीणीने बाहेर बोलावले हॉल मध्ये सगळ्या मुली जमा झाल्या होत्या. तिथे एक तरुण मुलगा बसला होता . त्याला मालकीण म्हणाली बघ यातली कोणती मुलगी आवडते ती सांग. मग त्या मुलाने सगळ्याजणी वर नजर फिरवली आणि कुमुद कडे बोट दाखवले. तसे मालकीण बोलली कुमुद ले के जा इसे अपने कमरेमें. मग कुमुद त्या मुलाला घेऊन आपल्या खोलीत आली. आणि बेड वर बसून आपली साडी फेडू लागली. तसा तो मुलगा म्हणाला,अहो हे बघा मी तुमच्या कडे दुसऱ्याच कामा साठी आलो आहे. तसे कुमुद त्याच्याकडे बघून म्हणाली म्हणजे मला नाही समजले कोणते दुसरे काम? अहो मी एक कॉलेज चा विद्यार्थी आहे आणि मी" वेश्या आणि त्यांची व्यथा " या विषयावर पी एच डी करत आहे त्या साठी मला तुमच्या कडून माहिती हवी आहे. ते काय असते पी एच डी ? तो अभ्यास आहे पण मला असं सांगून इथे सोडले नसते म्हणून पैसे देऊन इथे आलो . तुम्ही मला मदत करा. कुमुद ला खूप छान वाटले की रोज इथे गिऱ्हाईक येतात ते मजा करायाला आणि हा मुलगा अभ्यासा साठी इथे आला. कुमुद म्हणाली बरे वाटले बघ जगात तुझ्या सारखी चांगली माणसे पण आहेत या वर विश्वास ठेवावा वाटतो. नाहीतर आमच्या मनाचा विचार कोण करत ? तुझे नाव काय ? मी अभिमन्यू . तुमचे नाव काय? मी कुमुद आणि तुला काय आणि कशी मदत करू सांग. हे बघा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन त्याची उत्तरे द्या फक्त. मला एक तास मिळाला आहे तेव्हा आपण सुरु करूयात. हो चालेल म्हणत कुमुद ने आपली साडी परत नेसली. अभिमन्यू म्हणाला,पण एक काम करा आपल्यात जे बोलणे होईल ते कोणाला सांगू नका. नाहीतर मला पुन्हा इथे येऊ देणार नाहीत ही तुमची लोक. हो नका काळजी करू मी नाही सांगणार कोणाला विश्वास ठेवा. बर मग मी आता प्रश्न विचारतो म्हणत अभिमन्यू ने आपल्या बॅग मधून एक नोट बुक आणि पेन काढला. त्याला हवी असणारी माहिती लिहून घेऊ लागला.
कुमुद त्याच्या कडे पाहत होती उंच गोरा एकदम फिट ,व्यवस्थित शेप दिलेली दाढी,सरळ नाक, तांबुस गहिरे डोळे, कपाळावर जखमे ची खूण. खूप स्मार्ट होता अभिमन्यू. कुमुद एकटक पहात होती. आणि अभिमन्यू त्याच्या कामात मग्न होता. यातच एक तास झाला. अभिमन्यू म्हणाला,आता मला निघायला हवे खूप छान माहीती दिलीत तुम्ही. मी परत दोन चार दिवसांनी येईन. हो नक्की या मी मदत करेन कुमुद म्हणाली. मग अभिमन्यू तिथून बाहेर पडला. पण कुमुद अभिमन्यू च्या डोळ्यात स्वहताला हरवून गेली. एक तासाच्या त्याच्या सहवासात जणू त्याच्या प्रेमात पडली. तो परत कधी येईल याची वाट पाहु लागली. अभिमन्यु घरी आला पन कुमुद चा विचार त्याला स्वस्थ बसु देइना. तिची व्यथा ऐकुन त्याला ख़ुप वाईट वाटले होते. इतक्या लहान वयात कुमुद या व्यवसायात फसवून आणली गेली हे तिचे दुर्दवच म्हणावे लागेल. पण अभी ने ठरवले की काहीतरी करून कुमुद ला तिथुन बाहेर काढ़ायचे . आठवडा भर कुमुद अभिमन्यु ची वाट पहात होती.आज तो आला होता. कशी आहेस कुमुद अभी ने विचारले. मी कशी असणार साहेब नेहमी सारखीच. हे बघ तू मला साहेब नको म्हणूस नुसत अभि म्हण. नाही नाही तुमची माझी बरोबरी नाही होऊ शकत. मी साहेबच म्हणेन. कुमुद तू मला तुझा मित्र समज. नाही साहेब मी एक वेश्या आणि तुम्ही चांगलया घरातले दिसता मग आपल्यात मैत्री कशी होऊ शकेल. अग अस काही नसते सगळयात आधी आपण माणूस आहोत. मग माणसां मध्ये मैत्री होऊ शकते की नाही. साहेब तुम्ही खुप वेगळे आहात तुमच्या सारखा विचार कोणी नाही करत. बर तुला काय म्हणायचे ते म्हण अभि बोलला. मग परत तिला काही प्रश्न विचारले आणि तासभर थांबुन अभिमन्यु गेला. कुमुद तर त्याच्या बोलण्याला, दिसन्याला भाळली होती. प्रेमात वहावत चालली होती. इकडे अभिमन्यु ही कुमुद च्यां प्रेमात पडला होता. समाज तिला स्वीकारो अथवा नको स्वीकारो तो मात्र तिला आपली बायको म्हणून स्विकारनार होता. तिला तिथुन कसे बाहेर काढता येईल याचाच विचार तो करत होता. रश्मी कुमुद कड़े आली म्हणाली कुमुद तुला समजले का त्या नंदिता बद्दल . नाही ग काय झाल. कुमुद म्हणाली. अग ती तिच्या एका कस्टमर सोबत काल रात्री पळून गेली. मग काय झाल तिचे कुमुद ने विचारले. तिला आणि तिच्या कस्टमर ला मालकिणी च्या लोकांनी पकड़ले आणि त्या दोघांना मारून कुठल्या तरी दरीत फेकुन दिले. बाप रे खरच मारले का त्यांना कुमुद बोलली. हो ग बाई ही लोक खतरनाक आहेत. कोणी येथून पळून जाण्याचा विचार जरी केला तरी नाही जावू शकणार. ख़ुप पाळत ठेवतात ही लोक आपल्या वर. बाहेर गेलो तरी शोधून काढतील. इतके बोलून रेशमा गेली. कुमुद विचार करू लागली की माझ जगण मरण आता इथेच. इथून सुटका नाही. दोन आठवड्यानी अभि पुन्हा कुमुद कड़े आला.
अभिमन्यु म्हणाला,हे बघ कुमुद माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला इथून बाहेर काढेन हे लोक मागतील तितका मी पैसा द्यायला तयार आहे. नाही साहेब मी तुमच्या लायक नाही आहे. माझे जीवन पुर्णपणे वेगळ आहे. समाजात तुमची बदनामी होईल. सगळे तुम्हाला वाळीत टाकतिल. कुमुद बोलली. तसे काही नाही होणार कुमुद मी लोकांचा विचार नाही करत माझे प्रेम जडले आहे तुझ्यावर .आपण गुपचुप पळून पण जावू शकतो फक्त तू साथ दे मला . नाही हे शक्य नाही ही लोक सैतान आहेत. आपल्याला शोधून मारून टाकतील. उगाच माझ्या मुळे तुमचा जीव मी धोक्यात नाही घालु शकत. कुमुद हाथ जोडून अभि ला म्हणाली. कुमुद मी करेन सगळ मैनेज तू नको काळजी करूस. तशी कुमुद म्हणाली,आम्हा वेश्याना जीव लावण्याचा किंवा प्रेम करण्याचा अधिकारच नाही. तुम्ही खुप चांगले आहात साहेब कोणी ही चांगली मुलगी तुम्हाला मिळेल. मी नाही लायक तुमच्या साठी मला माफ करा. कुमुद मी तुझ्या डोळ्यात पाहिले आहे माझ्या बद्दल चे तुला वाटनारे प्रेमअभि ने पहिल्यांदा तिचा हाथ आपल्या हातात घेतला म्हणाला, माझी तयारी आहे तुझ्याशी लग्न करण्याची मग तू का नाही म्हणतेस. माझ्या डोळ्यात पाहुन सांग की तुझे माझ्या वर प्रेम नाही. मी तुला आवडत नाही. तसा कुमुद ने आपला हात त्याच्या हाता तुन सोडवून घेतला म्हणाली,नाही माझे नाही प्रेम तुमच्या वर. मला कधीच तसे नाही वाटले. म्हणजे तुला याच नरकात जगायचे आहे. मी चांगले जीवन जगायला एक संधी देत आहे ते ही तुला नको आहे. ठीक आहे. आता तुझी किती ही इच्छा असली तरी मी पुन्हा इथे येणार नाही. काळजी घे सव्हताची आणि काही मदत लागली तर हा घे माझा मोबाइल नम्बर कधी ही फोन कर. इतके बोलून अभिमन्यु तिथुन बाहेर पडला. तसा इतका वेळ दाबून धरलेला हूंदका कुमुद च्या तोंडून बाहेर पडला. तिला खुप वाईट वाटले की अभि ला असे तोडून बोललो पण तिचा नाइलाज होता. तिच्या मुळे अभि चे आयुष्य ती धोक्यात घालनार नव्हती. ती कुठे ही गेली असती तरी या लोकांनी त्यांना शोधून काढून जीवे मारून टाकले असते. मी एक वेश्या आहे माझे आयुष्य इथच या नरकात सडुन जाणार. माझ्या सूखा साठी मी अभि चे आयुष्य पणाला नाही लावनार मला माफ कर अभि असे बोलत कुमुद रडत राहिली. तेव्हाच एक कस्टमर तिच्या खोलीत आला. आणि लांडग्या सारखा तिच्या वर तूटन पडला. कुमुद मूक पणे अश्रु ढाळत राहिली....
