King Pratik Shinde

Horror Thriller Others

4.0  

King Pratik Shinde

Horror Thriller Others

वाम पिशाच!

वाम पिशाच!

2 mins
345


सरिता ही नेहमी प्रमाणे अंगणात तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. सरिता ही 14 वर्षाची एक निरागस मुलगी, अगदी साधीभोळी. तसेच ती एकुलती एक असल्यामुळे आईवडिलांची खूप लाडकी होती. तर ती नेहमीप्रमाणे अंगणात खेळत, बागडत होती. तिची आई व्हरांड्यात तिचं काम करीत होती. तसे तिच्या आईचे तिच्यावर लक्ष होते. पण तिची आई थोड्या वेळासाठी घरात गेली. नेमके त्याच वेळेस सरिता खेळता खेळता एकटीच घरामागील असलेल्या माळरानावर असलेल्या पडीक, जीर्ण झोपडीजवळ आली. तेवढ्यात तिला कुजबूजण्याचा आवाज येतो. तसेच तिला असे वाटते की अगदी हळू आवाजात कोणीतरी तिला बोलावत आहे. तिला असा भास होतो की कोणीतरी झोपडीतून तिच्याकडे टक लावून पाहत आहे. तिला असे वाटताक्षणीच तिच्या अंगावर सर्रकन काटा येतो. अचानक हवेतील गारवा वाढतो. आजूबाजूच्या परिसरात अगदीच स्मशान शांतता पसरते. तो परिसर जणू अचानकपणे बदलला होता.


झोपडीतील कुजबूज जणू आता वाढली होती. तिच्या धडधडत्या ह्रदयापेक्षा आता झोपडीतील तिला बोलावणारा आवाज आता तीव्र झाला होता. ती घाबरून परत घरी जाण्यासाठी घराची वाट शोधत असते. ती जेथून आली होती तेथील पाऊलखुणासुद्धा मिटलेल्या असतात. तिला संपूर्ण परिसर एकसारखा असल्याप्रमाणे भासतो. ती बराच वेळ चालत असते परंतु चकवा लागल्याप्रमाणे ती पुन्हा पुन्हा त्याच जागी येते. सभोवतालच्या वातावरणात आता काळोख पसरत चालला होता. तसेच आता सभोवताली चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. मध्येच अचानकपणे वटवाघळे पंखांचा फडफड आवाज करत तिच्या डोक्यावरून उडून जातात आणि तेवढ्यात तिला कोल्हेकुई ऐकू येते.


आधीच एकंदरीत हा सर्व प्रकार पाहून ती बिचारी घाबरलेली असते, त्यात भरीस भर म्हणून अचानक त्या झोपडीचं ते जीर्ण झालेलं दार आपोआप खुलतो आणि एक घोगरा आवाज तिला ऐकू येतो. ती खूप घाबरलेली असते पण कोणीतरी माणूस इथे आहे हा विचार करून तिला जरा धीर येतो. झोपडीतील व्यक्ती घोगऱ्या आवाजात म्हणते की, "तू इतक्या अंधाराची ह्या वेळी इथे काय करत आहेस? लवकर आत ये. बाहेर ह्या वेळी जंगली जनावरे हिंडत असतील."


...तसेही तिला घरचा रस्ता शोधता शोधता खूप उशीर झाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror