झपाटलेली अश्विनी
झपाटलेली अश्विनी
अश्विनीच्या घरी मामा आणि मावशी आली होती. तिचे वडील आणि तिचे मामा दोघेजण हॉलमध्ये पीत बसले होते. अश्विनीसुद्धा तिथेच बसली होती. तसेच तिची आई आणि तिची मावशी किचनमध्ये काम करीत होत्या. तेवढ्यात थंडगार हवेची झुळुक आली आणि अश्विनीच्या पोटात खूप दुखू लागले. सर्वजण खूप घाबरले आणि तिच्या मदतीसाठी आले. तेवढ्यात पुन्हा एकदा थंडगार झुळुक आली आणि तिचे हावभाव बदलले. अचानक ती उठली आणि त्या दोघांच्या जागी जाऊन बसली आणि पुरुषी अंदाजात एक पेग बनवू लागली. सर्वजण आश्चर्यचकित झाले. तिचे वडील तिच्यावर खूप ओरडले. म्हणाले, "काय चाललंय तुझं? गपगुमान ठेव ते खाली." तेवढ्यात तिने तिच्या वडिलांवर एक जळजळीत कटाक्ष टाकला. तिचे वडिल जरा विचलित झाले. कारण जी मुलगी कधी डोळे वर करूनसुद्धा बघत नव्हती ती आता एकदम खुन्नस देऊन बापाकडे बघते. तेवढ्यात तिने स्वतःची नजर दरवाजाकडे वळवली तशी सर्वांच
्याच नजरा दरवाजाकडे खिळून राहिल्याा.पुन्हा एकदा थंडगार हवेची झुळुक आली.सर्वाच्याच अंगावर सरसरून काटा आला. कारण ते दृश्यच तसं होतं.
त्यांना दिसतं की एक टकला, काळा, जाडा, धिप्पाड माणूस, ज्याने हात फोल्ड केलेला गुलाबी मळकट शर्ट आणि पांढरी खळकी मळकी पँट घातलेला माणूस लालबुंद डोळ्यांनी खुन्नस देऊन सर्वांकडे पाहतोय. तेवढ्यात अचानक पुन्हा एकदा थंडगार हवेची झुळुक येते आणि तो माणूस अचानक गायब होतो. सर्वजण खूप घाबरतात. तसेच आश्विनी बेशुद्ध होते. तेेवढ्यात तिचे वडील म्हणतात,"हा माणूस आपल्याच चाळीत राहात होता व काही दिवसांपूर्वीच तो वारला होता. सर्वांना कळून चुकलं की अश्विनीला त्याचंच भूूत लागलं आहे. अश्विनी शुद्धीत आल्यानंतर सर्वजण तिला एका भगताकडे नेतात. दारू, सिगारेट, चकना इ. त्या भूताचा उतारा ते लोक देतात तेव्हा कुुुुठे तिचा पिच्छा सुटतो त्या भूतापासून.