STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

वाईटाचा शेवट अटळ..

वाईटाचा शेवट अटळ..

2 mins
236

रस्त्यावर ट्राफीक जाम लागला होता.पुढे कसलीतरी रॅली काढण्यात आली होती.ढोल ताशांचे आवाज येत होते.


"ओह..... काय होते हे,गरम पाण्याचे शिंतोडे उडल्या सारखे वाटले.."


रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रीक्षातील बाई बोलत होती.तेवढ्यातच त्या ढोल ताशांच्या आवाजाला चिरत एक कर्णकर्कश आवाज कानावर पडला..रीक्षावाला खाली उतरून पाहतो तर एक वीस एकवीस वर्षांची तरुणी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून ओरडत होती.बाजुला तिची स्कुटी पडली होती.

एव्हाना लोकांची गर्दी जमा झाली होती... तिच्या वर ॲसिड हल्ला झाला होता...


रीक्षा वाला आणि दोन चार लोकांनी मिळून तिला कशीबशी रीक्षात टाकली..आता तिचा जोरजोरात रडण्याचा आवाज बंद झाला होता.ती बेशुद्ध पडली होती..


रीक्षा सरकारी दवाखान्यात येऊन थांबली.तिथल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला अपघात वार्डात टाकले होते... मुलीच्या पर्स मधुन मोबाईल काढून मिळेल त्या नंबरवर फोन करून कळवण्यात आले होते..

पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांत आईवडील धावतपळत दवाखान्यात दाखल झाले..


"सोनु..सोनु.. कुठे आहे माझी सोनु कशी आहे.?"

आईचा आक्रोश सुरू होता..

"डॉक्टर.. डॉक्टर कशी आहे माझी मुलगी." वडील विचारत होते.


"हे बघा चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला होता म्हणून थोडाफार चेहरा आणि डोळे वाचले आहेत.पन्नास टक्के भाजले आहे.हातालाही थोडीफार इजा झाली आहे..आता ती शुद्धीवर नाही.तिला इंजेक्शन दिले आहे.. लवकरच पुढची ट्रिटमेंट करु..पोलिसांना कळवले आहे येतीलच एवढ्यात..."


"अहो.काय झालं हे, आपली सोन्यासारखी पोर.

कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही..कुणी केलं असेल, का केलं असेल?"

आईचा आक्रांत चालु होता..


सोनु म्हणजे सोनाली हुशार आणि हरहुन्नरी मुलगी अभ्यासात हुशार होतीच पण इतरही गोष्टीत कायम पुढे असायची..वकृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य प्रत्येक ठिकाणी पहिल्या नंबरावर.. नुकतीच बी.ए. ची परीक्षा पास होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती सोबतच एम.ए.ला ॲडमिशन घेतले होते.

 दोन दिवसांपूर्वी कॉलेज च्या बाहेर विनाकारण गर्दी करुन बसणाऱ्या टवाळखोर पोरांनी तिच्या मैत्रिणीची छेड काढली होती.म्हणुन सोनालीने त्यापैकी एकाच्या कानशिलात लावली होती आणि चांगलेच झापले होते..त्या गोष्टीचा राग मनात ठेवून एकाने आज तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले होते..


पोलिस चौकशी सुरू झाली.सोनालीच्या मैत्रिणीने दिलेल्या जबाबावरून त्या टवाळखोर पोरांना अटक करण्यात आली.. नंतर कळले की त्यांपैकी एक मुलगा हा आमदाराचा लहान भाऊ होता.वरुन दबाव आला आणि त्यालाच मोकाट सोडण्यात आले होते.

ज्याने हा हल्ला केला होता..


काही महिन्यांत सोनालीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण चेहरा पुर्णपणे विद्रुप झाला होता..

चेहऱ्यावरील घाव हळुहळु मिटणार होते. पण मनावर आणि अस्तित्वावर झालेल्या आघाताचे काय...


आज चार महिन्यांनी सोनाली कॉलेज ला गेली होती.

पण अंगात बुरखा घालून गेली होती.चेहरा पुर्ण पणे झाकलेला होता म्हणून कुणीही तिला ओळखले नाही..


आजही कॉलेज च्या गेटवर त्या टवाळांची टोळी बसलेली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना पाहुन काहीतरी टॉनटींग करायचे आणि दात विचकुन हसायचे.. 


सोनाली दूर उभी राहुन गंमत पहात होती.हळुहळु एक एक पाऊल पुढे टाकत होती.पर्स मधुन पाण्याची बाटली बाहेर काढली. आणि विजेच्या आवेशाने त्याच्या तोंडावर ओतली ज्याने तिच्या वर ॲसिड फेकले होते.. त्याचा चेहरा जळत होता.तो जिवाच्या आकांताने ओरडत होता.सैरभैर पळत होता..

सोनाली मात्र जोरजोरात हसत होती.. एका राक्षसाचा नायनाट आणि वाईटाचा शेवट केल्याचे तिला समाधान वाटत होते..

पुन्हा तो दुसऱ्या मुलीला ईजा पोहचवु नये म्हणून तिने त्या असुराचा असा शेवट केला होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational