Ajay Chavan

Abstract

4.2  

Ajay Chavan

Abstract

वाढदिवस

वाढदिवस

3 mins
497


मी वांगणी नावाच्या एका खेडेगावात राहतो. आमच्या गावा बाहेरून मुंबईला जाणाऱ्या हायवेला जोडणारा एक रस्ता आहे.. तिथेच रस्त्याचा कडेला आमची चहाची एक लहानशी टपरी आहे. बाबा होते तेव्हा मी कधी कधी यायचो इथे. बाबा २ आठवडे झाले वारले. त्या नंतर आता मी १ आठवडा झाला इथे यायला लागलो. आमचं घर ह्या टपरीवरच चालत होत. बाबा मागे म्हणत होते कि टपरी बंद करणार आहे म्हणून. हल्ली पूर्वी सार्खी लोक रस्त्याच्या कडेला थांबून चहा पीत उभी नाही राहत. सर्व पुढे हायवे शेजारी हॉटेल मध्ये जातात. मला सद्य पर्याय नाही म्हणून ८वी तुन शाळा बंद करून मी टपरी वर यायला लागलोय जे काही पैसे येतील थोडेफार तेय घरात होतील. खरचायला काहीच नाही सध्या. आई सुद्धा शेतात भांगलायला जाते रोज चे २०० रूपे हाजरी मिळते. 

बाबा खरंच बोलत होते. दिवस भर काही जास्त पैसे नाही मिळत. कधी १०० कधी ७० कधी ६०. पूण सध्या काही आले तरी त्याची तेवढीच गरज आहे. आज माझा वाढदिवस आहे, बाबा म्हणाले होते ह्या वर्षी बर्थडेला मला " पिझ्झा " घेऊन येणार. आईला आणि बहिणीला माझा वाढदिवस लक्ष्यात हे नाही. लक्ष्यात राहणार तरी कस नुकतेच बाबा आम्हाला सोडून गेले त्याच दुःख घरात कोणाला हे दुसर काही आठवून देत नाही. आजच्या दिवशी " पिझ्झा" मिळाला नस्ता तरी चालल असत पूण "बाबा" जायला नको हवे होते. आज सकाळपासून नुसता बसलोय चहा टोपात असाच आहे. मीच २ वेळा पिलाय.

 दुपारी एक च्या सुमारास.. ४ ते ५ मोटरसायकल वाले आले आणि चहा बिस्कीट खाऊन गेले. ६० रुपय मिळाले. नशीब तेवढे तरी नाहीतर आज वाटत होत काहीच नाही मिळणार.मी पप्याला पूण सांगितलं होतं कि तुला एक भाग पिझ्झा मधला खाऊ घालीन तो हे रोज बोलायचा मला "अजय्या पिझ्झा फिक्स ना" माझ्या मूळे त्याला हे लागून राहिलेल्या आशेचा आज घात झाला. २.३० च्या सुमारास मी आई ने दिलेलं बेसन पिठाची पोळी आणि भाकरी टपरीच्या शेजारी चिंचेच्या झाडा खाल्ली बसून खाल्ली. इथे ह्या झाड खाली वेगळाच गारवा असतो. मी दुपार नंतर इथेच बसून असतो टपरीत आत फार गरम होतं. ७ वाजले दुपार नंतर अजून ४० रुपय चा धंदा झाला एकांतरीत १०० रूपै जमले. मी रोज सारख आवरायला घेतल टपरी बंद करून घरी जायची तयारी केली, सायकल काढली आणि वळवली तेवढ्यात मागून हाक ऐकू आली... 

"ए पोरा थांब थांब"!! मी मागे वळून पहिल तर एक दादा मोटरसायकल वरून आला. त्याने गाडी स्टॅन्ड वर लावली. आणि मला विचारला "बाळू मामा" जे इथे चहा विकतात ते कुठे आहेत घरी गेले का आज लवकर आणि तू कोण आहेस इथे काय करतोयस.मी तुला टपरी ला काही तरी करताना पहिला काय करत होतास नक्की, बाळू मामा माझ्या ओळखीचे आहेत.

मी त्या दादाला म्हणालो.. दादा मी त्यांचा मुलगा, आता ते नाही मीच इथे चहा विकतो ते २ आठवडा झाले वारले. 

दादाला ऐकून फारच वाईट वाटलं त्याचा चेहरा पडला. तो म्हणाला, माझे मामा वारले म्हणून मी गावी गेलो होतो कालच आलो त्यामुळे ह्या बाबतीत मला काही माहित नाही. मी त्यांना ठीक आहे म्हणालो आणि निघतो म्हणून सांगितलं अंधार जास्त झाला तर गावाकडचा पुढचा रस्ता दिसत नाही.

दादा म्हणाला "अरे थांब" आणि त्यांनी त्याच्या बॅग मधून काहीतरी बॉक्स काढला. दादाने मोबाइल टॉर्च लावून मला दाखवल आणि मी पहिल, तो "पिझ्झा" चा बॉक्स होता. मी त्या बॉक्स कडे पाहतच राहिलो आणि मला दादाच बोलणं ऐकू येत होत. तो म्हणत होता "ह्या महिन्यात मागे तुझ्या बाबांनी मला पैसे दिले होते. ते मला म्हणाले होते कि २५ तारखेला माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याला पिझ्झा खायचा आहे त्यांनी कधी खाल्ला नाही आहे, माझ्या कडे पुढे महिन्या भरात पैसे राहतील नाही राहतील म्हणून तू आधीच घेऊन ठेव आणि मला २५ तारखेला संध्याकाळी पिझ्झा आणून दे म्हणजे घरी जाताना मी घेऊन जाईन. 

दादा म्हणाला "मी पुढे मोठ्या गावात पिझ्झाच्या दुकानात काम करतो. दादानी मला पिझ्झा दिला आणि तो निघून गेला. मी साइकलवर बसून घराकडे निघालो आणि पुढचा रास्ता दिसेनासा झाला "अंधारमुळे नाही, डोळ्यात इतक पानी साठल होत कि समोरची वाट त्यात बुडून गेली होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract