STORYMIRROR

Ajay Balkrishna Chavan

Abstract

3  

Ajay Balkrishna Chavan

Abstract

"मैर्या "

"मैर्या "

3 mins
420

ह्याचा नाव "मयूर". गावात सर्वे ह्याला " मैर्या " म्हणून हाक मारतात. माझी ह्याच्याशी भेट नुकतीच मागील काहीदिवसां पूर्वी झाली. माझे वडील आम्हा सर्वांना सोडून गेले. त्यांच अंतिम विधी व निधना नंतरच कार्य संपवून मी माझ्या बहिणीची गावी गेलो. "शिरंबे" असं साताऱ्या जिल्ह्यातल एक सुंदर गाव आहे. 

वडिलांच्या निधना नंतर फारच हताश होऊन गेलेलो. स्वतःच्या गावी ओळखीचे बरेच लोक निधना बद्दल विचारायचे, ज्याने करून पुन्हा तेच तेच आठवून मला आणि माझ्या परिवाराला फारच त्रास व्हायचा म्हणून मग बहिणीच्या आग्रह वरून आम्ही तीच्या गावी गेलो..तिथे मी "मैर्या" ला पाहिल . मैर्या ७ वर्षांचा आहे आणि शाळेला इयत्ता चौथी ला आहे. ह्याच्या सारखा मस्तीखोर मुलगा मी आज पर्यंत पहिला न्हवता आणि त्या गावात सुद्धा दुसरा कोणी असा नसेल. दिवसभर रानात जाणं मासे पकडणं, खेडकडे पकडणं,आख गाव हिंडत फिरणं हेय त्याचा दिवसभराचा उद्योग. सद्या लोकडोवनमूळे शाळा बंद त्यामुळे अजूनच मोकाट. ह्याच्या बरोबर अजून ४ जन ह्याचे मित्र आहेत. 

ह्याच्या घर म्हणजे एक फार्महाउस आहे. त्याच्या घराच्या बाहेर शापू आंब्याचा मोठ झाड आहे. त्या आंब्या खाली 

मैर्या आणि त्याची गॅंग रोज काहींना काही उद्योग करत राहायचे. कधी पाला पाचोळा आणि काड्या गोळा करून सपार (घर) तयार करायचा कधी झोपला बांधायचा आणि असच बरेच काही खेळ हे सगळे खेळत असायचे. 

मैर्याची बोलायची पद्दत आणि त्यातला बोबडा उच्चार अख्या गावाला हसवायचा. सगळे लोक त्याचं बोलणं ऐकायला त्याला नेहमी बोलवत राही आणि मैर्या रोज सर्वांना हसवत राहि. बहिणी कडे अधून मधून मैर्या कालवण भाजी मागायला यायचा आणि तिथेच बसून जेवायचं त्याला बघून बघून माझाही हताश पना त्याने बर्यापैकी घालवला होता. थोड्यावेळ का होईना त्याला बघून वेगळाच आनंद व्हायचा. हसायला हि खूप यायचा. मैर्या नेहमी हसत राहायचा आणि हस्वत राहायचा. एकदा रात्री जेवणानंतर बहिणी सोबत बोलत असताना अस कळाल कि तो त्याच्या आजी आजोबांन सोबत राहतो. तो ज्या फार्महाउस मध्ये राहतो तेय त्याचं नसून एका मोठ्या उद्योगपतींचा आहे ज्यांनी माणुसकीच्या नात्याने त्याच्या आजी अजोबाना तिथे आत एका खोलीत राहायला दिल होत. त्या आधी मैर्या माझ्या बहिणीच्या घरा समोर पत्र्याच्या एका लहान शेड मध्ये राहायचा. त्याच्या आजीच त्या जागेवेरून भांडण होत असताना त्या उद्योगपती (बापू) ह्यांनी ऐकलं आणि मग राहायला घर नाही म्हणून बापूंनी मैर्याच्या आजी आजोबाना त्यांच्या फार्म हौस वर राहायला सांगितलं. तिथली साफ सफाई वगैरे आणि बाकी काम आजी आजोबा करतात. मैर्याला आई वडील दोन्ही नाही. आई मैर्या १ वर्षाचा असताना वारली आणि वडील कुठे दारू पिउन एक दिवस गेले तेय पुन्हा परतले नाही. त्याची आई वारली आहे हे त्याला माहित आहे. ह्या सर्व प्रसंग वरून माझ्या एक लक्ष्यात आला कि देव प्रसंग देतो तर त्याला सामोरी जायला मदत हि करतो. मैर्या अजून लहान आहे पूण त्याच्या अश्या मस्तीखोर स्वभावाने त्याला त्याच्या दुखस्पद परिस्तिथीचा अभाव होत नाही. हा एक गोष्ट आहे कि त्याला मनातल्या मनात कधी कधी कोणाची तरी आई पाहून काय वाटत असेल हे फक्त त्यालाच माहित! पूर्ण २४ तास हा नेहमी हसत असतो आणि गॅंग जमवून मस्ती करत असतो. त्याला असं खुश पाहून मी माझं दुःख विसरलो. अस पाहायला गेलं तर मैर्यानि मला सुद्धा माज्या त्या कठीण काळात चेहऱ्यावर हसणं आणण्यात मदत केली होती. देवाने ह्याच्या सारखच सर्वांनां बनवाव. मी मैर्याला मुंबईला यायच्या आधी एकदा बहिणीच्या सांगण्या वरून सहज विचारल कि "तुझी आई कुठे आहे? आणि मेर्याने हसत उत्तर दिलं "घरात फोटो आहे त्याच्यात जाऊन बसली आहे बाहेर निघत नाही " आणि मला हसावं कि रडाव हेच काळाला नाही. असा हा आमचा "मैर्या "


Rate this content
Log in

More marathi story from Ajay Balkrishna Chavan

Similar marathi story from Abstract