वाढदिवस
वाढदिवस
अलीकडे गेल्या महिन्यात २३ तारखेला मला ६० वर्ष पूर्ण झाले. वाढदिवस साजरा झाला.
त्या बद्दल लिहण्या अगोदर चला जाणून घेऊ या, पूर्वी ६० वर्ष पूर्ण झाल्यावर तो कसा साजरा करायचे. हा दिवस दांपत्यची मुलं मुली आपल्या आई-वडिलांचे लग्न परत लावून देत असे व जो लग्न सोहळा त्यांनी पाहिला नाही त्याचा अनुभव ते घेत असतं. प्रामुख्याने हृया ६०व्या वर्षाचा कार्यक्रमाचा हे आकर्षण असायचे. त्या निमित्ताने नातेवाईकांची भेटी-घाटी होत असंत. त्या काळी ६० वर्ष जगणं मोठी गोष्ट मानली जात असंत. ६० दिव्यांनी औक्षण केले जात असे.
आता माणूस ६० वर्षे अगदी लीलया जीवंत राहतो, काही अपवाद वगळता.
८० वर्ष पूर्ण झाल्यावर देखील सहस्त्रचंद्रदर्शनचा सोहळा साजरा करतात. ८० दिव्यांनी औक्षण केले जाते, सगळे मिळून करतात. या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे तुळाभार करणे. जेवढं माणसाचं वजन तेवढ्या वजनाची देणगी दिली जाते. हा एक अभूतपूर्व सोहळा असतो.
तर माझा ६०व्या वर्षी माझ्या मुलीने व मुलाने जे नातेवाईक व मित्र मंडळी जवळपास राहत नाहीत त्यांच्याकडून विडिओ तयार करून घेतले व ते सगळे मर्ज करून एक पूर्ण १० ते ११ मिनिटांचा विडिओ तयार केला माझ्या नकळत, तसेच ज्यांना त्या दिवशी सहज येणं शक्य होतं असे २५ ते ३० नातेवाईक घरी आले आणि सगळ्यांनी मिळून माझा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी मिळून माझं औक्षण केलं. माझ्या बहिणीने केक आणला होता तो ही कापला गेला. सगळ्यांनी मिळून घरी नाश्ता केला, सगळ्यांची भेट झाली. दिवस कधी संपला कळालेच नाही.
त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरचे बाहेर जेवायला गेलो, त्या शिवाय आजकालचे वाढदिवस साजरे होत नाही. तिथं माझ्या मित्र मंडळींनी माझा वाढदिवस साजरा केला.
अन् ६१व्या वर्षात नविन उमेदीने प्रवेश झाला.
