मित्रता
मित्रता
श्री कृष्णाला अनेक मित्र होते, गाजलेली मित्राची गोष्ट "सुदामा".
सुदामा अतिशय चांगला व गरीब माणूस होता, जेमतेम बायको मुलांबरोबर दिवस भागवत होता.
एकदा त्याने श्री कृष्णाला जाऊन भेटायचे ठरवले व आपले कसे हाल श्री कृष्णाला सांगावे असे वाटले.
पहिल्यांदाच भेटणार म्हणून पोहे घेऊन जावे श्री कृष्णाला असे सुदामा ला वाटले.
पोहचल्यावर सुदामा ने श्री कृष्णाला पोहे, ते श्री कृष्णाने मटा मटा खाऊन संपवले. श्री कृष्णाने सुदामा ची चौकशी केली. २-४ दिवस तिथे राहून सुदामा ने श्री कृष्णाचा निरोप घेतला. सुदामा ला वाईट वाटत होते की श्री कृष्णाने फक्त आपली फक्त विचारपूस केली पण दिले मात्र काही नाही. आपल्या घरच्या ठिकाणी पोहचल्यावर त्याला सगळे बदललेले दिसले, जुन्या घराच्या ठिकाणी नवीन घर, आंगण, मुलांच्या अंगावर नवीन कपडे, बायकोच्या अंगावर दागिने. सगळाच कायापालट झाला होता. सुदामा ने श्री कृष्णाचे आभार मानले मनातून झालेल्या चमत्काराचा.
आजकाल असे चमत्कार वास्तविक जीवनात होत नाही, पण मित्रांची गरज सगळ्यांनाच भासते स्त्री असो अथवा पुरुष.
म्हणूनच इंग्रजीतून वाक्प्रचार आहे.
" A friend in need is a friend indeed".
