जादू
जादू
मी माझ्या लहानपणी मुंबईत राहत असे, अंधेरीत, तर माझे काका ( चुलत ), गिरगावात. गिरगावात तेंव्हा जादूगार रघुवीर काकांच्या ज्या बिल्डिंग मध्ये राहायचे तेथे राहायचे. लहान मुलांना जादूच्या खेळाचे आकर्षण असते, तसे ते मला ही आवडायचे. आम्ही दर शनिवारी काकांकडे राहायला जायचो व मी काका बरोबर जादूचे खेळ बघायला जायचो.
मी ते खेळ बघून खूप खुश व्हायचो व जादूगार रघुवीर ची स्तुती करत असे. ते बघून एके दिवशी माझ्या वडिलांनी दोन जादू करून दाखवली. मी ते बघून खूप खुश झालो.
माझ्या वडिलांनी सांगितले की जादू दोन प्रकारची असते एक असते हातचलाखी व दुसरी शाब्दिक जादू. हातचलाखी ची जादू झाल्यावर त्यांनी शाब्दिक जादू दाखवली. ती जादू मी तुम्हाला सांगू इच्छितो. नीट लक्ष देऊन ऐका व अनेकांना ही जादू दाखवा.
माझ्या वडिलांनी एक स्टील चा पेला पाण्याने भरलेला व सोबत एक स्टीलची प्लेट आणायला सांगितली. त्यांनी तो पाण्याने भरलेला पेला सगळ्यांना दाखवला व त्यावर ती स्टीलची प्लेट ठेवत असल्याचे सांगितले.
जादू इथून सुरू होते. नीट ऐका शब्द प्रयोग. असे सांगण्यात आले की प्लेट ला हात न लावता पाणी पिऊन दाखवायचे. सगळ्यांनाच तो भीम पराक्रम वाटला. वडिलांनी सगळ्यांना विचारले आणि कोणी तयार होईना.
शेवटी वडील म्हणाले मी पिऊ शकतो, अन् पिऊन दाखवू शकतो. इथे शाब्दिक जादू सुरू होते. प्लेट ला हात न लावता पाणी प्यायचा. वडिलांनी स्ट्राव ( straw) मागवला अन् खोटं नाटक करत पेल्यातील पाणी संपल्याचे सांगितले अन् बघायला सांगितले, कोणीतरी प्लेट वरचं झाकण काढलं अन् वडील पाणी प्यायले. ही आहे शाब्दिक जादू. वडीलांनी प्लेट सरकवली नाही पण पाणी मात्र प्यायले स्वतः चा हात न लावता.
हा जादूचा खेळ माझ्या काकांनी रघुवीर जादूगार समोर मांडला, हा खेळ त्यांनी त्यांच्या प्रयोगात दाखवला.
तुम्ही सुद्धा दाखवा अन् बघा कोण तुम्हाला शब्दात पकडणं का?
