nits Shelani

Abstract Inspirational

3.6  

nits Shelani

Abstract Inspirational

उखाणा...

उखाणा...

3 mins
205


आपल्या हिंदू संस्कृतीत सण सोहळे भरपूर आहेत.

प्रत्येक सणाच्या मागे काहीना काही शास्त्र, पौराणिक महत्त्व किंवा आयुर्वेदिक कारण नक्कीच असते.


आता श्रावण महिनाच च घ्या... त्या महिन्यांत मंगळागौरी खेळ असतात.मग गौरी- गणपती, नवरात्री, दसरा दिवाळी,संक्रांत. 

लग्नाचे ही सत्र सुरू होते. 


तुम्ही सांगतील की हे सर्व तर आम्हाला ठाऊक आहे ह्यात काय विशेष...!!


हो सांगते मी....माझा लेखनाचा विषय आहे आपली संस्कृती आणि त्या मध्ये एक छोटासा भाग येतो तो म्हणजे "उखाणा"


हो हो उखाणा.... आता ह्यात काय आहे लिहिण्यासारखे...


ऊखाण्यात, एखादी स्त्री आपल्या नवराचे

नाव घेते छोट्या चारोळी मधून.


ही तर पारंपारिक पध्दत जी खुप पूर्वी पासून चालत आली आहे.


हल्लीच म्हणाल तर काय.... मुली सरळ नावानेच हाक मारतात नवऱ्याला..

मग आता त्यांना कुठे राहिले आहे ऊखाणाचे महत्त्व. 


चला मी एक प्रसंग सांगते तुम्हाला...


माझ्या मैत्रीणीच्या घरी मंगळागौरीची पुजा होती .

तिथे पुजा, खेळ, जेवण सगळेच होते. मस्त मज्जाच मज्जा होती. अनेक वयोगटातील स्त्रिया तयारी करून उपस्थितीत होत्या. मंगळागौरीचे खेळ मस्त चालू होते.

इतक्यात 'उखाणा घ्या ग पोरींनो' असा आवाज आला आणि नववधू काय तर जुन्या वधु पण गोंधळून गेल्या होत्या. नाव कसे घ्यायचे... मी तर पाठ पण नाही केले.तर दुसरी म्हणे, 'मला नाही जमत ते नाव घेणे वैगरे '


मी हे सगळे पाहुन मनातच हसत होती. कारण ह्या विषयावर मला काही तरी लिहावं असे सुचले होते.


मग मी पुढाकार घेतला आणि एक उखाणा घेतला...


ज्या घरात नाही होत स्त्रियांचा अपमान 

त्या घरात असते नेहमी लक्ष्मीचे स्थान...

....रावांच्या घरात मला मिळतो गृहलक्ष्मीचा मान.


सर्वांना खुप आवडला आणि मला पण काही लिहून पाठवा अश्या फर्माईशही आल्या. मी ही सर्वाना हो सांगून टाकले. फंक्शन झाले आणि मी घरी आले.

सांगितल्या प्रमाणे सगळ्यांना माझे उखाणे सॅन्ड ॲप केले. 


आता मला ह्या विषयावर लिहायचे होते.


ऊखाणा म्हणजे नुसते यमक जुळवून केलेली चारोळी नाही आहे.


त्या शब्दातून एक भावना व्यक्त होत असते.


हल्ली नवर्‍याचे नाव सहजपणे घेतले जाते. त्याला नावाने किंवा टोपणनावाने ही हाक मारण्यात येते.


पण तरीही ...ज्या वेळी प्रसंगामध्ये सर्वांच्या समोर एखादी स्त्री ऊखाण्यातून नवर्‍याचे नाव घेत असते ना... त्या वेळी ती त्याच्या नावाला, त्याचे आपल्या जीवनात असलेल्या स्थानाला मान देत असते.


नवर्‍याचे महत्त्व जस्टीफाय करत असते.


ती सहजच नाव घेताना लाजली ही जाते.


नवर्‍याला ही लग्नात उखाणा घ्यायला सांगतात कारण त्याला ही बायकोचे नाव सर्वांसमोर मानाने घ्यायचे असते. 


ही एक मजा आहे,ती टिकवून रहावी असे मला वाटते.

उखाणा हा सौभाग्यवतीचा एक दागिना आहे.


म्हणूनच नाव घ्या सांगितले की शिकलेल्या बायकांनी बुचकळ्यात न पडता नाव घ्यावे.


काही काही उखाण्यातून समाज जागृती चा संदेश ही दिला जातो.


मला वाटते की, मी माझ्या ह्या लेखातून माझ्या परीने महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.


आता काही उखाणे जे परंपरागत चालत आले आहेत ते आणि काही जे मी बनवले आहेत 

ते इथे मांडत आहे.

नक्की वाचा आणि बोला ही.


शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून,

...रावांचे नाव घेते सर्वाचा मान राखून...


मंगल देवी,मंगल माते वंदन करते तुला...

....रावांचे नाव घेते आशिर्वाद ते मला..


पावसाच्या सरींचा होता वर्षाव जोरात,

फुलुनी पिसारा मोर नाचे वनात,

मी सौभाग्यवती होऊन, आली.......च्या जीवनात


लिंबू पिळून बनवला स्पेशल मसाला सोडा...

...रावांचे नाव घेतले आता तरी वाट सोडा...


कपाळी लावते मी लाल लाल कुंकू...

....रावांशी झाले लग्न, सगळ्या देवांना माझा थॅंक्यू.


येता निवडणूक,जोरात चालू होतो प्रचार...

...रावांचे नाव घेते, कोणते ही येऊ दे सरकार...


नाव घ्यायला नवर्‍याचे ,

लागत नाही मला वेळ

.....रावांचे घेतले नाव

आता सुरू करू 

मंगळागौरी चे खेळ..


राधेसंग गोकुळात रास खेळे,

माझा श्री कृष्ण हरी

.... राव वाट पाहत असतील,

मला जाऊ द्या ना घरी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract