आजची स्त्री कशी असावी...
आजची स्त्री कशी असावी...
तू कोण आहेस नारी...
तूच सांग तुझी कहाणी...
आजची स्त्री कशी असावी....
कोण कसे असावे त्याने काय बनावे किंवा कसे वागावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मग एक स्त्री कशी असावी हे विचारणारे कोण?..
का?
आजही स्त्री बदलली नाही आहे, तर बदलला आहे तो समाज,आजुुुुबाजूूूूची परीस्थिती,शिक्षण,मानसिकता....
ह्या गोष्टींमुुळेच दिसतो आहे फरक आधीच्या आणि आजच्या स्त्री मध्ये...
म्हणूनच मी फक्त माझी मत सांगणार आहे. ती लादणार तर मुळीच नाही.
स्त्री ने तिला हवे तसे शिक्षण घ्यावे. करीयरचा ग्राफ वर घेऊन जावा.पण कुठलेेही तडजोड करू नये. सामाजिक कार्या मध्ये सहभागी होऊन सहकार्य जरुर करावे.
निर्माता ने स्त्री ची शारिरीक रचना जरी नाजूक केली असली तरी मनाने ती जास्त खंबीर आहे. प्रसंगावधान पणा तिच्या कडे आहे. ती कमकुुुवत अजिबात नाही आहेे .
तिला भावना, चेतना, वात्सल्य पणा पुरुषांच्या तुलनेत जास्त व्यक्त करता येतात. काही वेळेस काही ठिकाणी ह्यला अपवाद आहेे.तरी वरील परिस्थिती बहुतांश खरी आहे.
सांसारीक ,वैैवाहिक जीवनात तिने कसे वागावे हे त्या कौटुंबिक परिस्थिती नुसार ठरवलेले बरे.
पण स्त्री ची बाजू आली की समजूतदारपणाचा मक्ता तिचाच ठरलेला. अगदी चुल न् मुल असे नसले तरी मुुलांचा आणि घरातला कमाचा व्याप बाईकडेच...
नोकरी करणारी स्त्री ची तर तारेवरची कसरत ठरलेेली...
ह्या सर्व मुुुुद्दावर मी स्वमत देण्या चे काम करीन..
नोकरी करणारी स्त्री असेल तर कामाचा पैैैशाचा गर्व करू नये तिने... पैसा आज आहे उद्या..... . पण नाती टिकवावी.
ऑफिस ची कामे जशी कौशल्य पूर्वक शिकते..तशीच घरातील कामे ही तिने शिकावी. स्त्री आणि पुरूष दोघां साठी आहे हा सल्ला. मोठ्यांची मने राखावी. सणवार कुटुंबियांन सोबत साजरेे करावे.संस्कृती जपण्यावर भर द्यावा. किती ही झाले तरी स्त्री ही आधार स्तंभ असते घराचा.
एका स्त्री ने दुसरया स्त्रीला महत्व द्यावेे.
प्रत्येक स्त्री ने स्वरक्षणा साठी काही डिफेन्स ट्रिक्स नक्की च शिकून घ्यावे. स्त्री चे शिक्षण किती ही असु दे तिने आत्मनिर्भर राहण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक स्त्री ने बॅकैत स्वतः चे खाते उघडलेले असावे.
'हुंडाबळी ' ह्यावर विचार करावा...त्या साठी कोणत्याही स्त्री चा बळी जाणार नाही म्हणून समाजात जागृती आणण्याचे प्रयत्न करावा.
स्त्री ला कायदा च्या बाबतीत थोडेसे ज्ञान असावे . ते नेहमीच हिताचे असते. काॅरपोरेट कल्चर मध्ये वावरताना तिला शस्त्र म्हणून कामी येऊ शकते.
आता फॅशन च्या बाबतीत विचार करूया...
प्रत्येक स्त्री ने तिला हवे तसे कपडे घालावे कारण तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या मते स्त्री जर मनाने,स्वभावाने ,आचरणाने सुंदर असली की मघ तिचे बाह्य रूप कोणत्याही वेशभूषे मध्ये खुलून च दिसणार. दुसर्या चे अनुकरण करुन तुम्ही मिडीझ्,शाॅटस, घालणार परंतु कफ्रर्ट फीलिंग नसेल तर काय फायदा... तुम्ही वेस्टर्न फॅशन कॅरी करू शकता तर उत्तमच
तुमचा कॉन्फीडेस 100%असेल तर स्त्री साडीत असो की वेस्टर्न ती सुंदर च दिसणार.
सध्या स्त्री-पुरुष समानते वर जास्त च जोर दिला जात आहे. परंतु सत्य काय ते तुम्ह आम्हा सर्वांना ठाऊक...असो.
मद्य प्राशना च्या बद्दल बोलायचं झाले तर खुप मोठा चर्चाचा विषय ठरेल...म्हणून थोडक्यात आटोपते...
मद्य पिणे, स्मोकींग चे साईड इफेक्टस् स्त्री काय नी पुरुष काय दोघांना ही सेम..
बाई ग तुला झेपेल ना तेवढंच पी ...बाकी तर तु जाणतेसच..
मला सोज्वळतेचा आव आणायचा नाही आहे.. काही स्त्री या घेतात... ते वैयक्तिक आहे.
मातृत्वा च्या बाबतीत ....
ते स्त्री ला निसर्गाकडून मिळालेले वरदान आहे. त्याची अनुभूती अनुभवानेच होणार ते शब्दात मांडणे कठिण... तेव्हा मातृत्वाचा अपमान होऊन देऊ नकोस असे स्त्री ला सांगू इच्छिते.
बाकी स्त्री शक्ती, स्त्री जागृती, स्त्री सशक्तीकरण स्त्री समानता, स्त्री हक्क...हे सर्व तेव्हा च महत्वाचे होणार जेव्हा स्त्री म्हणून ती स्वतः चा सन्मान करणार...इतरांना सन्मान करण्यास भाग पाडणार....
आजची स्त्री ही सन्माननीय असावी, सर्वांसाठी...
धन्यवाद
